आजची वात्रटिका
-------------------------
हायजॅकिंग
भले भले लोकसुद्धा,
अशावेळी क्रॅक होतात.
जेंव्हा हायजॅक होतात उत्सव,
राष्ट्रपुरुष हायजॅक होतात.
आपण फक्त बघतो,
कुणी कुणाला पळवले आहे?
खरा अर्थ असा असतो,
कुणी कुणाला लोळवले आहे?
पळवा पळवी,लोळवा लोळवी,
हा नेहमीच कार्यक्रम असतो !
आपण लोकांनां खेळवतो,
हाही त्यांचा निव्वळ भ्रम असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------ ---------
फेरफटका-7946
दैनिक झुंजार नेता
1जून2022
No comments:
Post a Comment