Thursday, June 23, 2022

बंडाचा इतिहास... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
बंडाचा इतिहास
राजेशाही असो, वा हुकूमशाही,
बंडखोरी कुणाला चुकलेली नाही.
बंडखोरांच्या बंडांमधून,
लोकशाहीसुद्धा हुकलेली नाही.
बंडखोर नायकांच्या पाठीमागे,
बंडखोर अनुयायांचा जत्था आहे !
निष्ठा आणि भूमिका सबकुछ झुठ,
बंडखोरीचे खरे कारण सत्ता आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
सूर्यकांती
23जून 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...