Saturday, June 18, 2022

इलेक्शन इलेक्शन .... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

इलेक्शन इलेक्शन

जुळवाजुळवी सुरू असते,
पळवापळवी सुरू असते.
मित्रांबरोबर शत्रूंचीही,
खेळवाखेळवी सुरू असते.

कुणाला खेळवले जाते.
कुणाला पळवले जाते.
विजयाची आशा दाखवून,
कुणाला लोळवले जाते.

मग कुणी चावळू लागतात,
मग कुणी बावळू लागतात!
संशयकल्लोळ निवळू लागताच,
कुणी पुन्हा मुठीआवळू लागतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6503
दैनिक पुण्यनगरी
18जून 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...