Sunday, June 26, 2022

शिवसेना 'बी'जारोपन... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------- शिवसेना 'बी'जारोपन शिवसेनेच्या ' यु ' टर्नला, नीट करायचे ठरले आहे. म्हणूनच उभा नांगर घालून, शिवसेनेचे नवे ' बी ' पेरले आहे. एकहाती आणि एकनाथी, बंडाचा भगवा झेंडा आहे ! आंडू पांडू आणि बंडू सांगेल, हा कुऱ्हाडीचा नवा दांडा आहे !! -सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------- फेरफटका-7968 दैनिक झुंजार नेता 26जून2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...