आजची वात्रटिका
---------------------
क्रॉस व्होटिंग
त्याने बाजी मारलेली असते,
यानेही बाजी मारलेली असते.
ते करतात क्रॉस व्होटिंग,
लोकशाही मात्र हारलेली असते.
एकमेकांच्या विजयात,
त्यांचा लाख मोलाचा वाटा आहे!
लोकशाहीच्या पराभवापेक्षा,
त्यांना स्वतः चा विजय मोठा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7966
दैनिक झुंजार नेता
21जून2022
No comments:
Post a Comment