आजची वात्रटिका
---------------------
बंडाची घूस
बंड जेवढे स्वयंस्फूर्त असते.
तेवढीच त्याला फूस असते.
सगळे उकरून झाल्यावर दिसते,
ती बंडखोरीची घूस असते.
तिथे उकरायला मजा येते,
जिथे पाया भुसभुशीत असतो !
बंडखरापेक्षा फूसखोरच,
कितीतरी खुशीत असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7968
दैनिक झुंजार नेता
24जून2022
No comments:
Post a Comment