Friday, June 10, 2022

निषठेचा फुगा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

निषठेचा फुगा

कुणाला आवडतात,
कुणाला ते आवडत नाहीत.
निष्ठा दर्शनाची संधी,
कार्यकर्ते कधी दौडत नाहीत.

कार्यकर्त्यांची निष्ठा,
अगदी साठून असते.
सुखापेक्षा दुःखात,
निष्ठादर्शन उठून दिसते.

निष्ठा दाखवता दाखवता,
कधी संयम सुटला जातो!
निष्ठेचा फुगा मग,
फटदिशी फुटला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7955
दैनिक झुंजार नेता
10जून2022
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...