Monday, June 20, 2022

अंकशास्त्र .... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

अंकशास्त्र

परिषदेच्या निवडणुकीवर,
आपण काय विधान करावे?
त्यांचा त्यांनाच भरवसा नाही,
आपण काय निदान करावे?

कुणाला मटका,कुणाला फटका,
कुणाला तर उघड दगा आहे !
अंकशास्त्र जुळवता जुळवता,
सर्वांच्या डोक्याचा भुगा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6507
दैनिक पुण्यनगरी
20जून 2022

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...