Saturday, June 11, 2022

इस्कोट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------
इस्कोट
कुणी धर्मवेडे असतील तर,
कुणी धर्मशहाणे असायला हवेत.
कुणी विस्कटत असतील तर,
कुणी आवरताना दिसायला हवेत.
दुर्दैवाने हे होताना दिसत नाही,
त्यामुळे चर्चा फिस्कटू लागतात !
कुणी सावरायला लागले की,
कुणी नव्याने विस्कटू लागतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7956
दैनिक झुंजार नेता
11जून2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...