Sunday, June 26, 2022

सुरत - ए - हाल... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

सुरत - ए - हाल

बंडवाल्यांची सुरत बघून,
आसामच्या चहाला उकळी आहे.
चहापेक्षाही किटली गरम बघून,
कुणाची खुललेली पाकळी आहे.

सुरत म्हणाली महाराष्ट्राला,
इज्जतीची अशी लुटालूट नको.
लोकशाहीच्या प्रतिष्ठेचा,
लबाडांकडून काथ्याकूट नको.

भक्ती,युक्ती आणि महाशक्ती,
यांचीच महाचर्चा होऊ लागली!
पहाटच्या शपथविधीची आठवण,
कटू असूनही सर्वांना येवू लागली!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6512
दैनिक पुण्यनगरी
26जून 2022

 

No comments:

daily vatratika...29jane2026