Thursday, June 23, 2022

नॉट रिचेबल ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
नॉट रिचेबल
तुम्ही नसते आरोप,
स्वतः वर ओढवून घेऊ नका.
तुम्ही कुठेही असाल तर,
नॉट रिचेबल राहू नका.
कव्हरेज एरिया सोडायला,
त्यामुळेच तर बंदी असते !
नॉट रिचेबल म्हणजे,
तुमच्या बंडाची नांदी असते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7967
दैनिक झुंजार नेता
23जून2022

 

No comments:

भविष्यवाणी ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------- भविष्यवाणी अजूनही या प्रश्नांची उत्तरे, कुणालाच मिळाले नाहीत. जगाचे भविष्य सांगणाऱ्यांना, स्वतःचे मृत्...