Tuesday, November 30, 2021

नाचते रहो....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

नाचते रहो....

याची नाही तर त्याची,
त्याची नाही तर ह्याची असते.
उमेदवारीच्या तिकिटासाठी,
अशीच नाचा नाची असते.

जसे पाहिजे तसे,
नाचकाम करून घेतले जाते !
पक्का नाच्या भेटताच,
गळ्यात तिकीट घातले जाते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7772
दैनिक झुंजार नेता
30नोव्हेंबर 2021

 

खूण -गाठ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

खूण -गाठ

नवे बॅनर ,नवे फोटो,
हीच पक्षांतराची खूण आहे.
इथून तिथून सगळीकडेच,
हाच राजकीय गुण आहे.

रिकाम्या जागी नवे नाव,
त्याच घोषणा,तेच नारे असतात!
ज्यांची एकमेकांशी पडते गाठ,
ते काल-परवाचेच सारे असतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6337
दैनिक पुण्यनगरी
30नोव्हेंबर2021

 

Monday, November 29, 2021

पक्षपात.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

पक्षपात

कोणताही विरोधी पक्ष,
लोकशाहीचा पालक वाटतो.
कोणताही सत्ताधारी पक्ष,
लोकशाहीचा मालक वाटत.

हे विधान शंभर टक्के खरे,
पण कायमचे फसलेले आहे!
पक्षपात यामुळेच होतो की,
कोण कुठे बसलेले आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6336
दैनिक पुण्यनगरी
29नोव्हेंबर2021

 

धमाल आणि कमाल...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
धमाल आणि कमाल
कुणाला मिळेल पेट्रोल,
कुणाला दारूचा घोट नाही.
ज्याला हे पाहिजे आहे,
तो काही भिकार चोट नाही.
कोरोना लसीकरणाच्या,
सक्तीची ही कमाल आहे !
कोरोनाच्या नावावर,
दहशत आणि धमाल आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7772
दैनिक झुंजार नेता
29नोव्हेंबर 2021

 

Sunday, November 28, 2021

सोस बाबा सोस...मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
------------------------

सोस बाबा सोस

सत्ता कुठलीही असो,
अनेकांना तिचा सोस असतो.
सत्ता हाती आली की,
कुठे कुणाचा पायपोस असतो?

माज आणि मस्तवालपणा,
हा सत्तेचा मूलभूत गुण आहे!
सत्तेला नसते स्थैर्य,
उठता बसता भुणभूणआहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-7771
दैनिक झुंजार नेता
28नोव्हेंबर 2021

कोरोना अलर्ट...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कोरोना अलर्ट

कुणी म्हणतो,बहुरंगी
कुणी म्हणतो चावट आहे.
पुन्हा एकदा जगावर,
लॉक डाऊनचे सावट आहे.

काही वास्तव,काही अफवा,
आपण अनुभवी झालो आहोत!
जसा कोरोना पचवला,
जसा कोरोना रूचवला,
तसा तो उकळून प्यालो आहोत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6335
दैनिक पुण्यनगरी
28नोव्हेंबर2021

 

Saturday, November 27, 2021

मज्जाच मज्जा..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------ मज्जाच मज्जा

नालायकांमुळे लायकांची,
हकनाक किंमत कमी होते.
नालायकांचे वाढते महत्त्व,
लायकांची हिंमत कमी होते.

लायक असतात एकटे,
नालायकांच्या मागे फौज असते!
हेही नालायक,तेही नालायक,
इथेच तर खरी मौज असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-77
दैनिक झुंजार नेता
27नोव्हेंबर 2021

 

सवयीचे गुलाम..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
सवयीचे गुलाम
अडलेले असो वा नसो,
हरीला पाय धरायची सवय आहे.
ते हेही बघत नाहीत,
गाढवाचे नेमके किती वय आहे?
उकांड्यावरच्या गाढवांनाही,
ते गोपाळराव करून टाकतात !
गाढवांनी कितीही लाथाडले तरी,
ते सारे गृहीत धरून टाकतात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6334
दैनिक पुण्यनगरी
27नोव्हेंबर2021

 

Friday, November 26, 2021

संविधानाचा भावार्थ...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

संविधानाचा भावार्थ

संविधान भजले पाहिजे,
संविधान गाजले पाहिजे.
संविधान पुजता पुजता,
संविधान रुजले पाहिजे.

हक्काएवढेच कर्तव्यालाही,
वेळोवेळी जागले पाहिजे.
संविधानाला धन्य वाटेल,
असेच आपण वागले पाहिजे.

सविधान म्हणजे व्रत आहे,
संविधान म्हणजे राष्ट्रपंथ आहे !
भारतीयत्व हा राष्ट्रधर्म,
संविधान म्हणजे राष्ट्रग्रंथ आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7769
दैनिक झुंजार नेता
26नोव्हेंबर 2021

 

बिहार पॅटर्न .... मराठी वात्रटिका

  आजची वात्रटिका --------------------- बिहार पॅटर्न जसे कर्म तसे फळ, हे लगेच प्रत्यक्षात आले. महाराष्ट्रात जे कमावले, ते बिहारमध्ये गमावले ग...