Saturday, November 13, 2021

समाज कंटक...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

समाज कंटक

कितीही नाकारले तरी,
एक सत्य त्रिवार सत्य असते
कोणताही समाजकंटक,
हे समाजाचेच अपत्य असते.

काट्याचे कुरूप होण्यापूर्वीच,
ते मुळापासून खणले पाहिजेत !
समाजानेच सगळे समाजकंटक,
वठणीवरती आणले पाहिजेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
13नोव्हेंबर2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...