आजची वात्रटिका
------------------------
फॅडीस्ट आणि मॅडीस्ट
सवंग आणि उथळ प्रसिद्धीचे,
आजकाल भलतेच फॅड आले.
जे जे चांगले वाटत होते,
आजकाल ते तेच मॅड झाले.
फॅडीस्ट आणि मॅडीस्टांचे,
धाडीस्ट भलतेच वाढते आहे!
त्यांना झाडावर चढविणारांची,
त्यांच्यासोबतच विकेट पडते आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------
फेरफटका-7760
दैनिक झुंजार नेता
19नोव्हेंबर 2021

No comments:
Post a Comment