Friday, November 26, 2021

एस. टी.संपायण,मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

एस. टी.संपायण

सदाभाऊच्या 'खो'त,
गोपीचंदनाचे टिळे.
वाहक बोले चालकाला,
आपण वेडे की खुळे?

गुण आणि रत्न बघून,
सदा वर ते फिदा झाले.
वकिली सल्ला देत देत,
आझाद पंछी जुदा झाले.

डायव्हरशन सांगू लागले,
पुढे धोक्याचे वळण आहे!
जात्यात आणि सुपातही,
विलीनीकरणाचे दळण आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6333
दैनिक पुण्यनगरी
26नोव्हेंबर2021

 

No comments:

daily vatratika...29jane2026