Showing posts with label मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, March 3, 2023

बुक्स ते नोटबुक्स..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

बुक्स ते नोटबुक्स

लवकरच शालेय बुक्स,
चक्क नोटबुक्स होणार.
दप्तराचे ओझे कमी झाले,
हे एकदाचे फिक्स होणार.

पुस्तकांचे चौभाजन होवून,
पुस्तकच वहीचे पान होणार.
पालकांच्या खिशाला मात्र,
दप्तराचा आर्थिक ताण होणार.

पाठीवरचे गेले;खिशावर आले,
असे खुशाल म्हणू शकतात!
पालकांबरोबर विरोधकही,
नव्या ओझ्याने कण्हू शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8191
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
3मार्च2023
 

विनंतीवजा इशारा.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

विनंतीवजा इशारा

सामान्य भारतीय माणसे,
आजकाल जोरात दचकू लागले.
एकमेकांच्या विरोधात,
नेते काहीच्या बाही पचकू लागले.

नेत्यांनी नेत्यांची इज्जत राखावी,
उगीच नको तेवढे ताणू नका !
सामान्य भारतीय माणसांवरती,
हक्कभंग करायची वेळ आणू नका!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6737
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
3मार्च2023
 

Tuesday, February 21, 2023

अदृश्य महाशक्ती....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

अदृश्य महाशक्ती

सत्ता असून आमदार गेले,
आमदार पाठोपाठ खासदार गेले.
आमदार खासदारांनाविना,
नगरसेवक आणि नगराध्यक्ष नेले.

आजी गेले, माजी नेले,
राजी नसूनसुध्दा नाविलाने गेले.
नाविलाजा पाठोपाठ चिन्ह गेले,
चिन्हासोबत पक्ष आणि नाव गेले.

होत्याचे चक्क नव्हते झाले,
नव्हत्याचे चक्क होते झाले!
एवढे सारे अनर्थ म्हणे,
एका,अदृश्य महाशक्तीने केले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
फेरफटका-8182
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
21फेब्रुवारी 2023
 

Tuesday, December 20, 2022

उघडा डोळे,ऐका नीट, मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

उघडा डोळे,ऐका नीट

उथळ पाण्याला खळखळाट फार,
सगळीकडे असेच होऊ लागले.
विरोधकांबरोबर समर्थकही,
आजकाल अडचणीत येऊ लागले.

असे मात्र मुळीच नाही,
आमचाच अंदाज ठोकळ आहे !
विरोध आणि समर्थन,
सगळेच आजकाल पोकळ आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6667
दैनिक पुण्यनगरी
20डिसेंबर2022
 

Tuesday, October 25, 2022

दिवाळीचा शिमगा,,, मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

दिवाळीचा शिमगा

राजकारण्यांचे पराक्रम,
चमत्कारिक ठरू शकतात.
अगदी दिवाळीचाही शिमगा,
राजकारणी करू शकतात.

कधी शिमगा,कधी दिवाळी,
कधी कधी तर कॉकटेल असते!
वाट्टेल तशी बोंबाबोंब करूनही,
त्यांचे मात्र ऑल इज वेल असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6615
दैनिक पुण्यनगरी
25ऑक्टोबर2022

 

Monday, October 24, 2022

नुकसानीची भरपाई,,,मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

नुकसानीची भरपाई

सत्ताधारी आणि विरोधक,
शेतकऱ्यांच्या बांधावर येतात.
शेतकऱ्याला मदत द्यायची सोडून,
तेच परस्परांना फैलावर घेतात.

शेतकऱ्यांच्या दुःखापेक्षा,
त्यांचे राजकारण मोठे होत जाते!
चॅनल चॅनलच्या गरड्यात,
वास्तवातले दुःख खोटे होत जाते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6614
दैनिक पुण्यनगरी
24ऑक्टोबर2022

 

Monday, October 17, 2022

अनुकंपा,,, मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

अनुकंपा

उशिरा का होईना लक्षात येते,
जे आधीच यायला पाहिजे.
कोणतीहीही पोटनिवडणूक,
बिनविरोध व्हायला पाहिजे.

ते राजकारण कसे खेळतील?
याचा विचार न केलेलाच बरा !
विरोध नको,बिनविरोध नको,
थेट अनुकंपा धोरण जाहीर करा!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8071
दैनिक झुंजार नेता
17ऑक्टोबर2022

 

Sunday, August 21, 2022

खेल खेल में... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

खेल खेल में...

पब्जी आणि लुडोला,
समजू नका आंडू पांडू.
गोट्या खेळता खेळता,
म्हणाला विटी दांडू.

दहीहंडीचे भाग्य,
आपल्याही वाट्याला येवो !
आंधळ्या कोशिंबीरीसोबत,
आपलाही राष्ट्रीय खेळ होवो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8020
दैनिक झुंजार नेता
21ऑगस्ट2022

Tuesday, August 9, 2022

घोटाळ्यांचा बेंडबाजा, मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

घोटाळ्यांचा बेंडबाजा

घोटाळ्यावर घोटाळे,
घोटाळ्यांना भरती आहे.
कुणाचे झाले स्वप्नभंग,
कुणाची मात्र स्वप्नपूर्ती आहे.

घोटाळ्यांचे घोटाळ्यांशी,
अनैतिक असे नाते आहे.
घोटाळेबहाद्दर बघून,
अक्कल पेंड खाते आहे.

आपला खाऊ,सगळे खाऊ,
आपल्याच बापाची पेंड आहे!
प्रत्येक घोटाळा म्हणजे,
जणू ठसठसते बेंड आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6553
दैनिक पुण्यनगरी
9ऑगस्ट2022

 

Monday, August 8, 2022

झेंडा आहे,घर नाही..., मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

झेंडा आहे,घर नाही...

कुणाला घर आहे;झेंडा नाही,
कुणाला झेंडा आहे;घर नाही.
गरीब बिचाऱ्या भारताला,
श्रीमंत इंडियाची सर नाही.

इंडियात आणि भारतात,
कुठलीच एकवाक्यता नाही !
घर असेल तर झेंडा मिळेल,
मात्र झेंड्यासाठी घर मिळण्याची,
कुठलीच शक्यता नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8006
दैनिक झुंजार नेता
8ऑगस्ट2022

 

Saturday, July 30, 2022

नवी सुभेदारी...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

नवी सुभेदारी

स्थानिक राजकारण म्हणजे
संस्थानिकांचे स्वराज्य असते.
पार्टी - बिर्टी असले काही,
सगळे काही त्याज्य असते.

वर वरती पक्षाचे लेबल,
खाली संस्थानिकांची ताबेदारी असते!
आपण ज्याला लोकशाही म्हणतो,
ती तर नवी सुभेदारी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8000
दैनिक झुंजार नेता
30जुलै2022

 

Thursday, July 28, 2022

गटारीचे बोल, मराठी वात्रटिका

मराठी वात्रटिका
---------------------

गटारीचे बोल

राजकारणावर भाष्य करायला,
मुळीच अडले नाही माझे खेटार.
गाळातून तोंड वर करीत,
गटारीवरती ओरडली गटार.

राजकारणात जो तो नंगा आहे,
विश्वास आणि निष्ठेला ठेंगा आहे.
आपल्याहीपेक्षा जास्त,
राजकारणात गटारगंगा आहे.

जो तो कायमच तुंबलेला,
किड्यांसारखे उतले मातले जाते!
बारा महिने तेरा त्रिकाळ,
आपल्यामध्ये तोंड घातले जाते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6542
दैनिक पुण्यनगरी
28जुलै 2022

 

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...