Showing posts with label उघडा डोळे. Show all posts
Showing posts with label उघडा डोळे. Show all posts

Saturday, March 21, 2026

उघडा डोळे,बघा नीट.......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
उघडा डोळे,बघा नीट
गल्लीत आहेत;दिल्लीत आहेत,
गावोगावी आणि शहरा शहरात आहेत.
आता तरी उघडा डोळे बघा नीट,
जिकडे तिकडे कॅप्टन खरात आहेत.
भांडेफोड झाली; जन्मठेप झाली,
तरीही श्रद्धा अंधभक्तांच्या उरात आहेत.
असे कितीतरी लिंगपिसाट बाबा,
अजूनही अंधभक्तांच्या देवघरात आहेत.
बुवा तिथे बाया; बाया तिथे बुवा,
सगळे उघडे तमाशे ऐन भरात आहेत!
कसलाही पक्षीय भेदभाव न करता,
राजकारणी त्यांच्या दारा दारात आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9223
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
21 मार्च 2026

 

Tuesday, December 20, 2022

उघडा डोळे,ऐका नीट, मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

उघडा डोळे,ऐका नीट

उथळ पाण्याला खळखळाट फार,
सगळीकडे असेच होऊ लागले.
विरोधकांबरोबर समर्थकही,
आजकाल अडचणीत येऊ लागले.

असे मात्र मुळीच नाही,
आमचाच अंदाज ठोकळ आहे !
विरोध आणि समर्थन,
सगळेच आजकाल पोकळ आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6667
दैनिक पुण्यनगरी
20डिसेंबर2022
 

Thursday, March 10, 2022

उघडा डोळे,ऐका नीट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

उघडा डोळे,ऐका नीट

आधी कॅसेट, मधी सी.डी.
आता पेन ड्राईव्ह आहे.
आधी लपून छपून होते
आता सगळे लाईव्ह आहे.

ज्याच्या त्याच्या पुराव्यांना,
अगदी वेगवेगळे वेटेज आहे.
सीसीटीव्ही कॅमेरा सांगतो,
हे तर माझेच फुटेज आहे.

पुराव्यांची चढाओढ तरी,
शंका मात्र एक आहे!
आंखों देखा हाल पाहूनही ,
दावे होतात,हे फेक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6433
दैनिक पुण्यनगरी
10मार्च 20229
 

Tuesday, April 28, 2020

उघडा डोळे,वागा नीट

आजची वात्रटिका
-------------------------------------
उघडा डोळे, वागा नीट
सारे जग धास्तावलेले,
पण आम्हांला किती मस्ती आहे?
फक्य आम्हाला सोडून जगाला,
कोरोनाची प्रचंड धास्ती आहे.
ज्यांना ज्यांना मस्ती होती,
कोरोना तिथे तिथे जोमात आहे !
ना चालली दुवा,ना चालली दवा,
आज प्रत्येक देश कोमात आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7269
दैनिक झुंजार नेता
28एप्रिल2020
-----------------------------
#कोरोना

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...