Showing posts with label चिमटा. Show all posts
Showing posts with label चिमटा. Show all posts

Wednesday, July 14, 2021

दबाव आणि प्रभाव

आजची वात्रटिका
--------------------

दबाव आणि प्रभाव

कुणाचा दबाव गट असतो,
कुणाचा प्रभाव गट असतो.
दबाव गटापेक्षा प्रभाव गटाचा,
सगळीकडेच वट असतो.

म्हणून दबाव टाकण्यापेक्षा,
प्रभाव टाकता आला पाहिजे!
दबावाने नाहीतर प्रभावाने,
हिशोब चुकता झाला पाहिजे!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6205
दैनिक पुण्यनगरी
14जुलै2021

 

Monday, March 8, 2021

जागतिक पोळा

आजची वात्रटिका
----------------------

जागतिक पोळा

तिच्या मान,सन्मान,
आणि अस्तित्वावर
बारा महिने कानाडोळा असतो.
म्हणूनच आठ मार्च म्हणजे
जागतिक पोळा असतो.

किर्त्या-आरत्या गाऊन,
तिची पूजा आणि मजा होते !
ती होती तिथेच राहून,
फक्त आठ मार्चची ये जा होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
चिमटा-6081
दैनिक पुण्यनगरी
8मार्च2021

 

Saturday, March 6, 2021

वादग्रस्त आत्महत्या

आजची वात्रटिका
----------------------
वादग्रस्त आत्महत्या
कुणी म्हणतो संशयास्पद,
कुणाला वाटते मिथ्या आहेत.
एकापाठोपाठ एक,
वादग्रस्त आत्महत्या आहेत.
संशयास्पद आत्महत्यांच्या,
कहाण्या मोठया करूण आहेत.
आत्महत्यांच्या राजकारणासाठी,
कुणी कुणी बाह्या सारून आहेत.
आत्महत्यांनी प्रश्न वाढतात,
मूळ प्रश्न काही मिटत नाहीत !
आत्महत्या केलेले जीव,
मृत्यूंतरसुद्धा सुटत नाहीत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा-6079
दैनिक पुण्यनगरी
6मार्च2021

 

Friday, March 5, 2021

तडजोड

आजची वात्रटिका
----------------------

तडजोड

काल टळाटळा बोलणारे,
आज अचानक मुके झाले.
कालचे जळजळीत सूर,
आज अचानक फिके झाले.

कुणाला भीती आहे,
कुणाची ही नीती आहे !
सत्य आणि वास्तव,
जगजाहीरपणे सती आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6078
दैनिक पुण्यनगरी
5मार्च2021
---------------

 

Thursday, March 4, 2021

टार्गेट

आजची वात्रटिका
----------------------

टार्गेट

पेट्रोल आणि डिझेलमुळे,
आधीच जो तो बेजार आहे.
त्यात आता गॅस सिलेंडरचे,
टार्गेट एक हजार आहे.

गॅस हजार रूपयांकडे,
जोमाने पावले टाकीत आहेत !
आता मीही सेंच्यूरी मारतो,
पेट्रोलमागे डिझेल घोकीत आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
चिमटा-6077
दैनिक पुण्यनगरी
4मार्च2021

 

Sunday, February 28, 2021

शाळाप्रिय कोरोना


 आजची वात्रटिका

----------------------

शाळाप्रिय कोरोना

शाळांच्या मुळावरती
कोरोनाचे चाळे आहेत.
शाळा नीट उघडेपर्यंत,
पुन्हा नव्याने टाळे आहेत.

आंदोलने, सभा,लग्न,
यांच्याकडे मात्र पाठ आहे!
आतुरलेल्या लेकरांच्या,
भविष्याची वाट आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6074
दैनिक पुण्यनगरी
28फेब्रुवारी2021

Thursday, February 25, 2021

कोरोनाचे हास्य

आजची वात्रटिका
----------------------
कोरोनाचे हास्य
एकतर सत्तेची मस्ती,
किंवा लोकप्रियतेचा माज आहे.
जे लोकांना दिसले,
ते तर जंगल राज आहे.
आडातच नव्हते तर,
पोहऱ्यात आलेच कसे !
सगळा गडबड गोंधळ बघून,
कोरोना गालातल्या गालात हसे!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6071
दैनिक पुण्यनगरी
25फेब्रुवारी2021

 

Wednesday, February 24, 2021

झुंडशाही

आजची वात्रटिका
----------------------

झुंडशाही

सज्जन वाटणारी जनता,
जेंव्हा आडदांड होते.
तेंव्हा साधी गर्दीही,
अचानकपणे झुंड होते.

झुंडगर्दी आणि गुंडागर्दी,
दोघांनाही मग बहर येतो !
न्यायाचा मुडदा पडून,
अन्यायाचा कहर होतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6070
दैनिक पुण्यनगरी
24फेब्रुवारी2021

 

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...