Saturday, February 29, 2020

यशाचे मोजमाप

आजची वात्रटिका
----------------------------------------
यशाचे मोजमाप
पैसा जसा वरदान आहे,
तसा पैसा शाप आहे.
लौकिक आणि अलौकिकालाही,
पैशाचेच मोजमाप आहे.
पैशात मोजल्याशिवाय,
यश हे यश मानले जात नाही !
अलौकिकाची सर कधी,
लौकिकाला चुकूनही येत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7222
दैनिक झुंजार नेता
29फेब्रुवारी2020

झिंग झिंग झिंगाट

आजची वात्रटिका
----------------------------------------
झिंग झिंग झिंगाट
यांना दंगवले जात आहे,
त्यांना झिंगवले जात आहे.
कुठली तरी नशा देऊन,
सर्वांना गुंगवले जात आहे.
सर्वत्र झिंग झिंग झिंगाट आहेत,
झिंगलेले बुंग बुंग बुंगाट आहेत !
पोळ्या भाजणारांचे कार्यक्रम,
एकदम चिंग चिंग चिंगाट आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5731
दैनिक पुण्यनगरी
29फेब्रुवारी 2020

Friday, February 28, 2020

व्यवस्थापन


वैज्ञानिक तोटा

आजची वात्रटिका
----------------------------------------
वैज्ञानिक तोटा
विज्ञानाचा आधार देत,
थापा मारायला लागले.
अंधश्रद्धांचा प्रसार,
विज्ञानाने करायला लागले.
निरक्षरांपेक्षा साक्षरांचाच,
यात सिंहाचा वाटा आहे !
हा केवळ सामाजिक नाही,
तर वैज्ञानिक तोटा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5730
दैनिक पुण्यनगरी
28फेब्रुवारी 2020

Thursday, February 27, 2020

पाठराखण

आजची वात्रटिका
----------------------------------------
पाठराखण
कुठे बांगड्या खणखणू लागल्या,
कुठे किडे वळवळू लागले.
राजकीय नेत्यांच्या पाठराखणीला,
आता बायका-पोरेही पळू लागले.
कुठे कावकाव,कुठे चिवचिव,
तर कुठे टिवटिव रंगली आहे !
नात्या-नात्यातली रेशीम गाठ,
पहिल्याएवढी कुठे चांगली आहे?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7220
दैनिक झुंजार नेता
27फेब्रुवारी2020

मराठी बाणा

आजची वात्रटिका
----------------------------------------
मराठी बाणा
मराठी वृत्त वाहिन्यावाले,
असे काही बोलतात मराठी.
मराठीची एवढी चिरफाड की,
जसे काही सोलतात मराठी.
स्वतःच्या अहंकारापोटी,
अनेकजण टाळतात मराठी.
माय मराठीशी प्रतारणा करून,
इंग्रजीवर भाळतात मराठी.
दुराभिमान नको,अभिमान हवा,
कुठे समजतात मराठी?
नव्या पिढीची तोडली नाळ,
कुठे उमजतात मराठी ?
आचारू मराठी,प्रचारू मराठी,
बोलवू मराठी,फुलवू मराठी !
माय मराठीचे लेकरे म्हणून,
पेलवू मराठी,डोलवू मराठी !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5729
दैनिक पुण्यनगरी
27फेब्रुवारी 2020

Wednesday, February 26, 2020

रिटर्न गिफ़्ट

आजची वात्रटिका
----------------------------------------
रिटर्न गिफ़्ट
कुटूंबासहित ट्रम्प तात्या,
भारतात येऊन गेले.
रिटर्न गिफ़्ट म्हणून,
पाकिस्तानला दम देऊन गेले.
अमेरिकेसाठी पाकिस्तान
हे तर 'ट्रम्प कार्ड' आहे !
पुतनामावशी प्रेम,
हा अगदी चपखल वर्ड आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5728
दैनिक पुण्यनगरी
26फेब्रुवारी 2020

बायकालॉजी

आजची वात्रटिका
----------------------------------------
बायकालॉजी
जरा ट्रम्प यांच्याकडून तरी शिका,
कसे बायकोला घेऊन फिरत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असूनही,
बायकोसाठी किती करत आहेत .
हे ट्रम्प कार्ड फेकून मारताना,
बायकोची नजर हसरी होती !
मी बायकोला कसे सांगू,
भारतात जी बायको येऊन गेली,
ती पहिली नाही;तर तिसरी होती !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7219
दैनिक झुंजार नेता
26फेब्रुवारी2020

Tuesday, February 25, 2020

शिणवटा

आजची वात्रटिका
----------------------------------------
शिणवटा
मराठी वाचवा,मराठी वाचवा,
तेव्हढ्यापुरता गलका होतो.
इंग्रजाळलेल्या मराठी माणसाचा,
तेवढाच शीण हलका होतो.
शीण हलका करण्यासाठीच,
माय मराठीचा वापर आहे !
आपल्या नतद्रष्टपणाचे,
उगीच इंग्रजीवरती खापर आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7218
दैनिक झुंजार नेता
25फेब्रुवारी2020

बोबडे बोल

आजची वात्रटिका
-----------------------
बोबडे बोल
माय मराठीची लक्तरे
पुन्हा पुन्हा लोंबू नका.
मराठी वाचवायची तर
इंग्लिश स्कूलमध्ये कोंबू नका.
तुम्हाला तरी माहिती आहे का
तिथे नेमके काय आहे?
माय मराठीच्या नरडीला
आवळलेला टाय आहे.
माय मराठीचा अभिमान बाळगताना
इंग्रजी आंटीचा द्वेष नाही!
पुन्हा आरडाओरडा करू नका,
मराठी संस्कृती शेष नाही!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
चिमटा-4656
दैनिक पुण्यनगरी
27फेब्रुवारी 2017

झुंडशाही

आजची वात्रटिका
----------------------------------------
झुंडशाही
ज्याच्या त्याच्या खांद्यावर,
झुंडशाहीचा झेंडा आहे.
आपल्याच पायावरती,
आपल्या हाताने धोंडा आहे.
एकदा झुंडशाही भिनली की,
विचारांचा अविचार होऊन जातो !
अर्थाचा अनर्थ घडवून,
सोयीनुसार प्रचार केला जातो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5727
दैनिक पुण्यनगरी
25फेब्रुवारी 2020

Monday, February 24, 2020

मायाजाल

आजची वात्रटिका
----------------------------------------
मायाजाल
विरोधक आणि समर्थकांना वाटते,
आपणच खरे खंदे आहोत.
तरी त्यांना ठाऊक असते,
जेवढे खंदे तेवढेच अंधे आहोत.
एकमेकांचे रहस्य असे,
बेमालूमपणे झाकले जाते !
द्वेषाबरोबर प्रेमाचेही मायाजाल,
आजूबाजूला टाकले जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7217
दैनिक झुंजार नेता
24फेब्रुवारी2020
----------------------------------------
चिमटा-5726
दैनिक पुण्यनगरी
24फेब्रुवारी 2020

बायकोचा थरथराट

आजची वात्रटिका
----------------------------------------
बायकोचा थरथराट
तुलाही एक कप भर,
मलाही एक कप भर.
रामप्रहरीच बायकोला म्हटले,
चल पटकन तिर्थ कर.
आम्ही चहाला तीर्थ म्हणतो,
बायको मला चहा देऊ लागली.
शुगर वाढल्यासारखी,
बायकोला थरथरी येऊ लागली.
चहाटळपणाने मी म्हणालो,
तिथले दृष्टांत इथे देत जावू नको !
कुणाच्या किर्तनातली कॉमेडी,
एवढी मनावर घेत जाऊ नको !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5726
दैनिक पुण्यनगरी
24फेब्रुवारी 2020

Sunday, February 23, 2020

कायापालट

आजची वात्रटिका
----------------------------------------
कायापालट
झेंडे,दांडे आणि गोंडे
यांची अदलाबदली आहे.
जुने टाकून,नवे होण्याची,
आयती संधी साधली आहे.
कुणाची मान उंच,
कुणाची मान झुकली आहे!
वर सांगायला मोकळे झाले,
आम्ही कात टाकली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7216
दैनिक झुंजार नेता
23फेब्रुवारी2020

टाळीचे वाक्य

आजची वात्रटिका
----------------------------------------
टाळीचे वाक्य
समाजकारण हा विषय
बोलण्यापूरताच उरला आहे.
सत्ताकारण हा एकच अजेंडा,
राजकारणात मुरला आहे.
राजकारणातून समाजकारण,
हे फक्त टाळीचे वाक्य आहे !
सत्ताकांक्षा वाढल्याने वाटत नाही,
यापुढे ते कुणाला शक्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5725
दैनिक पुण्यनगरी
23फेब्रुवारी 2020

Saturday, February 22, 2020

वाचाळांचे ताळतंत्र

आजची वात्रटिका
----------------------------------------
वाचाळांचे ताळतंत्र
जिकडे बघावे तिकडे
कसल्या तरी आगी आहेत.
वाचाळवीर आणि आगलावे,
त्याच्यात अग्रभागी आहेत.
वाचाळवीरांच्या तोंडाला,
जणू नवे तोंड फुटले आहे !
आंधळ्या पाठीराख्यामुळे
त्यांचे ताळतंत्र सुटले आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

लावारिस धमकी

आजची वात्रटिका
----------------------------------------
लावारिस धमकी
छोट्या छोट्या गोष्टी
मोठ्या करायला लागले.
शंभर विरुद्ध पंधरा,
अश्या कोट्या करायला लागले.
शंभरला पंधरा भारी,
अशी त्यांची टिमकी आहे !
ज्याला कुठेच थारा नाही,
अशी लावारिस धमकी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5724
दैनिक पुण्यनगरी

Friday, February 21, 2020

फॅशन शो

आजची वात्रटिका
----------------------------------------
फॅशन शो
आजच्या तरुणाईची फॅशन,
नेमकी सांगू कशी आहे?
त्यांचे कपडे म्हणजे,
जणू काही एसी आहे.
हवा येण्या-जाण्याचा,
बंदोबस्त अगदी चोख आहे.
फाटक्या जीन्स पँटीना,
नको नको तिथे भोक आहे.
आजकालचे तरुण-तरुणी,
नव्या फॅशनचे वेडे आहेत !
अजून अंगावर कपडे आहेत,
हे उपकार काय थोडे आहेत ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7214
दैनिक झुंजार नेता
21फेब्रुवारी2020

इंग्रजी बोले मराठीला

आजची वात्रटिका
----------------------------------------
इंग्रजी बोले मराठीला
माझ्यामुळे तुझी अवस्था,
समजू नकोस तंग आहे.
मी आण्टी असले तरी,
तूच खरी 'मदर'टंग आहे.
माय मरो,मावशी जगो,
असे होऊच शकत नाही.
माझे मार्केट फुल असले तरी,
तुझी सर येऊच शकत नाही.
कोणतीही मातृभाषा,
हीच खरी ज्ञानभाषा आहे !
तू अभिजात होशीलच,
पण मला ज्ञानभाषेची आशा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5723
दैनिक पुण्यनगरी
21फेब्रुवारी 2020

Thursday, February 20, 2020

कॉपी पेस्ट

आजची वात्रटिका
----------------------------------------
कॉपी पेस्ट
एकमेकांच्या देखत
परस्परांना टोप्या असतात.
अगदी राजरोसपणे,
परीक्षेत कॉप्या असतात.
केजीपासून पीजीपर्यंत
कॉप्याचे वाढते प्रमाण आहे !
त्याने वाईट वाटून घेऊ नये,
ज्याच्याजवळ इमान आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7213
दैनिक झुंजार नेता
20फेब्रुवारी2020

मिथ्या समर्थन

आजची वात्रटिका
----------------------------------------
मिथ्या समर्थन
कुणाचेही मिथ्या समर्थन,
तोंडावर आपटणारे असते.
साप सोडून देऊन,
भुईला धोपटणारे असते.
जिथे कुठे मिथ्या समर्थकांची,
झुंडीमागे झुंड असते !
उघड सत्य नाकारणारी झुंड,
वैचारिकदृष्ट्या षंढ असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5721
दैनिक पुण्यनगरी
20फेब्रुवारी 2020

Wednesday, February 19, 2020

ऑफिसियल 'विक'नेस

आजची वात्रटिका
----------------------------------------
ऑफिसियल 'विक'नेस
ज्यांना कामाची आवड,
त्यांना वेळेचा तुटवडा आहे
दुसरीकडे आनंदी आनंद,
कारण काय तर,
पाच दिवसांचा आठवडा आहे.
सरकारी आठवड्याचे दिवस,
असे दिवसेंदिवस घटू लागले !
पाच दिवसांचाच आठवडा हवा,
साडेपाचवाल्यांनाही वाटू लागले !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7212
दैनिक झुंजार नेता
19फेब्रुवारी2020

शिव न्याय

आजची वात्रटिका
----------------------------------------
शिव न्याय
रांझ्याच्या पाटलाच्या औलादी,
आज सर्वत्र माजत आहेत.
कित्येक दुर्दैवी आया-बहिणी,
तेवता तेवता विझत आहेत.
राजांच्या शिवशाहीचा आदर्श,
लोकशाहीने घ्यायला हवा.
झटपट चौकशी करून,
गुन्हेगाराला न्याय द्यायला हवा.
लोकशाहीतही शिवशाहीसारखा,
जबर वचक बसला पाहिजे !
माजलेल्या नरपशूंना
टकमक टोक आणि चौरंगा,
डोळ्यासमोर दिसला पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5720
दैनिक पुण्यनगरी
19फेब्रुवारी 2020

Tuesday, February 18, 2020

शास्रीय सत्य

आजची वात्रटिका
----------------------------------------
शास्रीय सत्य
ज्याला त्याला वाटत असते,
आपले बोलणे साधार आहे.
स्वतः च्या शास्त्राचा,
ज्याला त्याला आधार आहे.
कुणाचे शास्त्र म्हणजे,
विज्ञान आणि विज्ञान असते !
पोथ्या-पुराणांना शास्त्र म्हणणे,
अज्ञान एके अज्ञान असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7211
दैनिक झुंजार नेता
18फेब्रुवारी2020

धार्मिक थयथयाट

आजची वात्रटिका
----------------------------------------
धार्मिक थयथयाट
धर्मांधाच्या थयथयाटाचा,
अगदी एकच ठेका आहे.
अधूनमधून अफवा पेरतात,
आपल्या धर्माला धोका आहे.
दुसऱ्याचा अधर्म दाखवून,
आपला अधर्म पूजला जातो !
अधर्माचा गाजावाजा झाल्याने,
नेमका अधर्म माजला जातो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5719
दैनिक पुण्यनगरी
18फेब्रुवारी 2020

Monday, February 17, 2020

शिवबाची शिवशाही.



वा।त्र।टि।का
----------------------------------------
शिवबाची शिवशाही......!
राजेशाहीचे नाव जरी
स्वराज्याची ग्वाही होती.
लोकशाहीस प्रेरणा देणारी
शिवबाची शिवशाही होती
स्वराज्य संकल्पक बाप,
दृढनिश्चयी आई होती.
आत्मभान जागविणारी
शिवबाची शिवशाही होती.
समता अन मानवतेची
रात्रंदिवस द्वाही होती.
सह्याद्रीचा माथा उंचविणारी
शिवबाची शिवशाही होती.
ना जातीभेद, ना धर्मभेद
प्रजानिष्ठा ठायी ठायी होती.
स्वामीनिष्ठेने भारलेली
शिवबाची शिवशाही होती
आत्मभानाची पेटती मशाल
जिथे स्वराज्याची घाई होती
शत्रूस चळाचळा कापविणारी
शिवबाची शिवशाही होती.
मातीस फाटाफुटीचा शाप,
जरी आपसात दुही होती.
त्या सर्वाना मिटविणारी
शिवबाची शिवशाही होती.
हे पडती शब्द अपूरे
याहूनही बरेच काही होती!
स्वातंत्र्याची गाथा रचणारी
शिवबाची शिवशाही होती!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-2853
दैनिक पुण्यनगरी
19फेब्रुवारी 2012
----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
https://suryakantdolase.blogspot.in
--------------------------------------------------
#आजच्या_वात्रटिका-#सूर्यकांत_डोळसे

थाळी फेक

आजची वात्रटिका
----------------------------------------
थाळी फेक
शिव भोजन थाळीनंतर,
दीनदयाळ थाळी आहे.
धक्क्यावर धक्के बसायची,
तुमची आमची पाळी आहे.
त्यांचा आणि यांचासुद्धा,
हेतुही जवळ जवळ एक आहे !
जी चाललीय स्पर्धा,
तिचे नाव 'थाळी-फेक' आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7210
दैनिक झुंजार नेता
17फेब्रुवारी2020

जाहीर आवाहन

आजची वात्रटिका
----------------------------------------
जाहीर आवाहन
तिघे तिघे बसले सत्तेवर,
चौथ्याचा सत्तेवर डोळा आहे.
पाडापाडीच्या आव्हानाने,
आमच्याच पोटात गोळा आहे.
आव्हान-प्रतिआव्हानासाठी,
नवे नवे कारण शोधू नका !
सगळे मिळून सत्तेत बसा,
पण मध्यावधी मात्र लादू नका !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5718
दैनिक पुण्यनगरी
17फेब्रुवारी 2020

Sunday, February 16, 2020

'मुद्दे' माल

आजची वात्रटिका
----------------------------------------
'मुद्दे' माल
हेही लोकांना खेळवू लागले,
तेही लोकांना खेळवू लागले.
कार्यकर्त्यांसोबत मुद्देही,
राजरोसपणे पळवू लागले.
सर्वांच्या राजकारणाचा
सारखाच मुद्देमाल आहे !
तरीही प्रत्येकजण सांगतोय,
फक्त आमचीच लाल आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7209
दैनिक झुंजार नेता
16फेब्रुवारी2020

चिथावणी ते बतावणी

आजची वात्रटिका
----------------------------------------
चिथावणी ते बतावणी
कुणी चिथवायला लागले,
कुणी फितवायला लागले.
कुणाला सतवायला लागले,
कुणाला गुतवायला लागले.
जसे ते चिथावणीखोर आहे,
तसे फितावणीखोर आहेत !
त्यांचा तमाशा रंगात आलाय,
कारण ते बतावणीखोर आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5717
दैनिक पुण्यनगरी
16फेब्रुवारी 2020

Saturday, February 15, 2020

सेम टू सेम

आजची वात्रटिका
----------------------------------------
सेम टू सेम
व्हॅलेंटाईन डे येतो,
व्हॅलेंटाईन डे जातो.
समर्थक आणि विरोधक,
दोघांकडूनही साजरा होतो.
कुणी द्वेष व्यक्त करतो,
कुणी प्रेम व्यक्त करतो !
आंधळे प्रेम,आंधळा द्वेष,
सेम टू सेम व्यक्त करतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7208
दैनिक झुंजार नेता
15फेब्रुवारी2020

शिवभोजन थाळी

आजची वात्रटिका
----------------------------------------
शिवभोजन थाळी
झुणक्याच्या हातावर
भाकरीची टाळी आहे.
कालचे आपण म्हणजे,
शिवभोजन थाळी आहे.
आपल्या महाविकासाचे
नातेही खूप समांतर आहे !
फरक एवढाच की,
आज आपले नामांतर आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5716
दैनिक पुण्यनगरी
15फेब्रुवारी 2020

Friday, February 14, 2020

सरकारी 'पंच'वडा

आजची वात्रटिका
----------------------------------------
सरकारी 'पंच'वडा
आठवड्याला सप्ताह म्हटले,
सप्ताहाला आठवडा म्हटले गेले.
आठवडा पाच दिवसांचा झाल्याने,
आंनदाचे तुफान उठले गेले.
आधीच उल्हास असून,
त्यात हा फाल्गुन मास आहे !
बचत आणि कार्यक्षमता वाढीची,
सरकारला नव्याने आस आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7207
दैनिक झुंजार नेता
14फेब्रुवारी2020

प्रेमसूत्र

आजची वात्रटिका
----------------------------------------
प्रेमळ सल्ला
ज्याला जिंकता जिंकता
दुसऱ्यासाठी हारता येते.
तोच खरा भाग्यवंत,
त्यालाच खरे प्रेम करता येते.
प्रेम म्हणजे सहजीवन,
जे एकट्याच्या मनावर नाही.
प्रेमाने जनावराचा माणूस व्हावा,
माणसाचे जनावर नाही.
प्रेम म्हणजे जाळणे नाही,
प्रेम म्हणजे जळणे आहे.
कुणाकुणाचा गैरसमज होतो,
प्रेम म्हणजे खेळणे आहे.
ना हिशोब,ना व्यवहार,
प्रेम निरागस मूल आहे !
प्रेम म्हणजे कठोर तपश्चर्या,
प्रेम उंबराचे फुल आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5715
दैनिक पुण्यनगरी
14फेब्रुवारी 2020

प्रेमळ सल्ला


Thursday, February 13, 2020

बुवाबाजी

आजची वात्रटिका
----------------------------------------
बुवाबाजी
वरून कीर्तन,आतून तमाशा,
असेच वाटायला लागले.
बुवा तिथे बाया,
हेसुद्धा पटायला लागले.
कुणी बुक्का लावतो आहे,
कुणी चंदन लावतो आहे !
नासक्या कांद्यांचा पराक्रम,
साधू-संतांना भोवतो आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7206
दैनिक झुंजार नेता
13फेब्रुवारी2020

हातचलाखी

आजची वात्रटिका
----------------------------------------
हातचलाखी
दगडाला दगड,
तलवारीला तलवार,
ते बोलतात रेटून.
दगड आणि तलवारीला
हात आणतात कुठून?
रिकाम्या हातांसाठी,
उदयोग सोडून हे धंदे असतात !
नेहमी त्यांच्या बंदूकीला,
दुसऱ्यांचेच खांदे असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5714
दैनिक पुण्यनगरी
13फेब्रुवारी 2020

Wednesday, February 12, 2020

'आप' बिती

आजची वात्रटिका
----------------------------------------
'आप' बिती
राष्ट्रवादापेक्षा विकासाचीच
दिल्लीमध्ये ख्याती आहे.
हात मोडला,गळ्यात पडला,
ही तर 'आप बिती'आहे.
जे दिल्लीत झाले,
ते गल्लीतही होऊ शकेल !
पण अहंकार बाजूला ठेवून,
एकत्र कोण येऊ शकेल ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7205
दैनिक झुंजार नेता
12फेब्रुवारी 2020

प्रापंचिक फॉर्म्युला

आजची वात्रटिका
----------------------------------------
प्रापंचिक फॉर्म्युला
मुलगा हवा की मुलगी?
त्याचा फॉर्म्युला रेडी आहे.
कुणी म्हणतो प्रबोधन,
तर कुणी म्हणतो,
ही 'स्टँड अप कॉमेडी 'आहे.
आंबे खा...आंबे,
गुरुजींचाही कल्ला आहे !
परामार्थाबरोबर प्रपंचाचाही,
किर्तनातून सल्ला आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5713
दैनिक पुण्यनगरी
12फेब्रुवारी 2020

Tuesday, February 11, 2020

काळाचा महिमा

आजची वात्रटिका
----------------------------------------
काळाचा महिमा
कुणी जागेवरून हटले की,
त्याची जागा मोकळी असते.
क्षेत्र कोणतेही असो,
काही काळ तिथे पोकळी असते.
कुठलीही पोकळी असो,
फार काळ मोकळी रहात नाही !
काळाचा महिमा असा की,
तो कुणाची वाट पहात नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7204
दैनिक झुंजार नेता
11फेब्रुवारी2020

निर्भया...सॉरी

आजची वात्रटिका
----------------------------------------
निर्भया...सॉरी
इतिहासात जाळून मारल्या,
तेंव्हा त्या सती झाल्या.
आपल्या देशात निर्भया,
दुर्दैवाने अती झाल्या.
द्रौपदीचा श्रीकृष्ण,
इथे कोण होऊ शकतो ?
आपण मेणबत्त्या पेटवून,
फक्त श्रद्धांजल्या वाहू शकतो .
कसलाच वचक नसल्याचे
गैरफायदे घेतले जात आहेत !
निष्पाप निर्भयांचे बळी घेऊन,
नरपशू निर्भय होत आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5712
दैनिक पुण्यनगरी
11फेब्रुवारी 2020

Monday, February 10, 2020

नवा 'राज' मार्ग

आजची वात्रटिका
----------------------------------------
नवा 'राज' मार्ग
फक्त असे नाही की,
मोर्चाला मोर्च्याने उत्तर आहे.
सोबतच तलवारीला तलवार,
अन पत्थराला पत्थर आहे.
जुना दांडा,नवा झेंडा,
घुसखोरांना शुक शुक आहे !
टाकलेल्या नव्या रुळावरून,
रेल्वे इंजिनाची झुक झुक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7203
दैनिक झुंजार नेता
10फेब्रुवारी2020

व्हॅलेंटाईन सप्ताह

आजची वात्रटिका
----------------------------------------
व्हॅलेंटाईन सप्ताह
दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात,
प्रेमिकांचा राबता असतो.
अखंड प्रेम नामाचा,
फेब्रुवारीत सप्ता असतो.
सप्ताहातील प्रत्येक दिवशी,
वेगवेगळी कृती असते!!
त्या मदनांचेच बाण उपयोगी,
ज्यांच्या नशिबी रती असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5711
दैनिक पुण्यनगरी
10फेब्रुवारी 2020

Sunday, February 9, 2020

चेंडूची फुले


ऑनलाईन भक्ती

आजची वात्रटिका
----------------------------------------
ऑनलाईन भक्ती
ज्यांच्याकडे पैसा-पाणी,
त्यांच्यासाठी फाईन झाले.
माणसांबरोबर देवही,
हल्ली ऑनलाईन झाले.
जशी ऑनलाईन दर्शन बुकींग,
तशी ऑनलाईन देवपूजा आहे !
ऑनलाईन प्रसादातही,
एक वेगळीच मजा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7202
दैनिक झुंजार नेता
9फेब्रुवारी2020

बदलती 'राज' मुद्रा

आजची वात्रटिका
----------------------------------------
बदलती 'राज' मुद्रा
कालची 'राज-मुद्रा'आगळी होती,
आजची 'राजमुद्रा' आगळी आहे.
कालची घुसखोरी वेगळी होती,
आजची घुसखोरी वेगळी आहे.
काल उठवलेले रान वेगळे होते,
आज वेगळे रान उठवत आहेत !
काळ काढलेल्या ब्ल्यू प्रिंट,
आता कुठे आठवत आहेत ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5710
दैनिक पुण्यनगरी
9फेब्रुवारी 2020

Saturday, February 8, 2020

व्हॅलेंटाईन डे


आलटी-पलटी

आजची वात्रटिका
----------------------------------------
आलटी-पलटी
कुणाची आलटी, कुणाची पलटी,
कुणाकुणाची तर कल्टी आहे.
तरीही सांगत राहतात,
उलटी भूमिका कशी सुलटी आहे.
त्यांच्या उलट सुलट भूमिकाही,
त्यांना सरळसोट वाटतात !
आपणच फक्त साव आहोत,
बाकीचे त्यांना चोट वाटतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------
फेरफटका-7201
दैनिक झुंजार नेता
8फेब्रुवारी2020

पचनक्रिया

आजची वात्रटिका
----------------------------------------
पचनक्रिया
तेच पटवून देतात,
राजकारणात
काहीही अशक्य नसते.
तत्वहीन तडजोडीनंतर,
हेच टाळीचे वाक्य असते.
जश्या भूमिका बदलतात,
तसे तत्वज्ञान रचले जात असते!
दुसऱ्याकडे बोट दाखविले की,
स्वत:चेही पचले जात असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5709
दैनिक पुण्यनगरी
8फेब्रुवारी 2020

Friday, February 7, 2020

लॉबिंग

आजची वात्रटिका
----------------------------------------
लॉबिंग
कुठल्याही क्षेत्रामध्ये जा,
एकच समस्या उभी आहे.
कुठेही जाऊन बघा,
ज्याची त्याची लॉबी आहे.
जिथे लॉबी आहे,
तिथे लॉबिंग रुजलेली असते !
तुम्हांला एकटे पाडले जाते,
जिथे लॉबिंग माजलेली असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7200
दैनिक झुंजार नेता
7फेब्रुवारी2020

दैनिक वात्रटिका19मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -286वा

दैनिक वात्रटिका 19मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -286वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1-fbx6QEScldHj2QiABT650...