Tuesday, February 18, 2020

शास्रीय सत्य

आजची वात्रटिका
----------------------------------------
शास्रीय सत्य
ज्याला त्याला वाटत असते,
आपले बोलणे साधार आहे.
स्वतः च्या शास्त्राचा,
ज्याला त्याला आधार आहे.
कुणाचे शास्त्र म्हणजे,
विज्ञान आणि विज्ञान असते !
पोथ्या-पुराणांना शास्त्र म्हणणे,
अज्ञान एके अज्ञान असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7211
दैनिक झुंजार नेता
18फेब्रुवारी2020

No comments:

बंडखोरांच्या टोळ्या ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- बंडखोरांच्या टोळ्या  कुणी परत यायला लागले,  कुणी परत जायला लागले.  ज्यांना पक्षात घेणार नव्हते,  त...