Monday, February 17, 2020

शिवबाची शिवशाही.वा।त्र।टि।का
----------------------------------------
शिवबाची शिवशाही......!
राजेशाहीचे नाव जरी
स्वराज्याची ग्वाही होती.
लोकशाहीस प्रेरणा देणारी
शिवबाची शिवशाही होती
स्वराज्य संकल्पक बाप,
दृढनिश्चयी आई होती.
आत्मभान जागविणारी
शिवबाची शिवशाही होती.
समता अन मानवतेची
रात्रंदिवस द्वाही होती.
सह्याद्रीचा माथा उंचविणारी
शिवबाची शिवशाही होती.
ना जातीभेद, ना धर्मभेद
प्रजानिष्ठा ठायी ठायी होती.
स्वामीनिष्ठेने भारलेली
शिवबाची शिवशाही होती
आत्मभानाची पेटती मशाल
जिथे स्वराज्याची घाई होती
शत्रूस चळाचळा कापविणारी
शिवबाची शिवशाही होती.
मातीस फाटाफुटीचा शाप,
जरी आपसात दुही होती.
त्या सर्वाना मिटविणारी
शिवबाची शिवशाही होती.
हे पडती शब्द अपूरे
याहूनही बरेच काही होती!
स्वातंत्र्याची गाथा रचणारी
शिवबाची शिवशाही होती!!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-2853
दैनिक पुण्यनगरी
19फेब्रुवारी 2012
----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
https://suryakantdolase.blogspot.in
--------------------------------------------------
#आजच्या_वात्रटिका-#सूर्यकांत_डोळसे

No comments:

कोरोना युग