Thursday, February 27, 2020

मराठी बाणा

आजची वात्रटिका
----------------------------------------
मराठी बाणा
मराठी वृत्त वाहिन्यावाले,
असे काही बोलतात मराठी.
मराठीची एवढी चिरफाड की,
जसे काही सोलतात मराठी.
स्वतःच्या अहंकारापोटी,
अनेकजण टाळतात मराठी.
माय मराठीशी प्रतारणा करून,
इंग्रजीवर भाळतात मराठी.
दुराभिमान नको,अभिमान हवा,
कुठे समजतात मराठी?
नव्या पिढीची तोडली नाळ,
कुठे उमजतात मराठी ?
आचारू मराठी,प्रचारू मराठी,
बोलवू मराठी,फुलवू मराठी !
माय मराठीचे लेकरे म्हणून,
पेलवू मराठी,डोलवू मराठी !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5729
दैनिक पुण्यनगरी
27फेब्रुवारी 2020

No comments: