Thursday, December 31, 2009

स्वागताचे निमित्त

***** आजची वात्रटिका *****
***********************

स्वागताचे निमित्त

मावळत्याचे दु:ख,
उगवत्याचा आनंद,
ग्लासा-ग्लासात फेसाळला जातो.
निमित्ताचा फायदा घेत
जो तो तनामनाने उसळला जातो.


नववर्षाचे स्वागत तर
जल्लोषात झाले पाहिजे !
याचा अर्थ असा नाही,
त्यासाठी प्याले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळ्से,पाटोदा (बीड)

Wednesday, December 30, 2009

राकेश पवारच्या निमित्ताने

***** आजची वात्रटिका *****
***********************

राकेश पवारच्या निमित्ताने

त्यांचा दोष एवढाच
ते जन्माने पारधी आहेत.
’ध’ चा ’मा’ करणारे
आमच्यातच गारदी आहेत.

संशयाच्या भूताने
आम्ही पछाडलेलो आहोत.
हा याचाच पूरावा की,
आम्ही पिछाड्लेलो आहोत.

कधी कोंबड्या,कधी बकर्‍या,
कधी रानातील कणसं आहेत !
आम्ही शोधतो निमित्त
विसरतो तीसुद्धा माणसं आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, December 29, 2009

रॉंग नंबरचा चमत्कार

***** आजची वात्रटिका *****
**********************

रॉंग नंबरचा चमत्कार

आलेले रॉंग नंबर
कुणालाही छळू शकतात.
पण आलेल्या रॉंग नंबरमुळे
लग्नही जुळू शकतात.

अनघटीत अनपेक्षित
असेच तर घडले आहे !
रॉंग नंबर आणि मिसकॉलचे प्रमाण
तेंव्हापा्सूनच वाढले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, December 28, 2009

पिच रिपोर्ट

***** आजची वात्रटिका *****
***********************

पिच रिपोर्ट

पिच उसळणारी असेल तर
सावधगिरीने वागत चला.
रंगाचा भंग होऊ नये यासाठी
प्रथम पिच रिपोर्ट बघत चला.

एकदा पिचचा अंदाज आला की,
ती आपणहून साथ देऊ लागते !
पिच रिपोर्ट किती महत्त्वाचा आहे
हेही तुमच्या ध्यानात येऊ लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, December 27, 2009

ढकलाढकल

***** आजची वात्रटिका ****
*********************

ढकलाढकल

करायचे तर काहीच नाही
वरवरचा पोतारा असतो.
बॅकलॉगच्या रोगावर
पॅकेजचा उतारा असतो.

उतार्‍यावर उतारे
उतरून टाकले जातात !
पॅकेजच्या नावावर
चालू दिवस धकले जातात.

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Saturday, December 26, 2009

अतृप्त बकासूर

***** आजची वात्रटिका *****
**********************

अतृप्त बकासूर

सैनिकांच्या शवपेट्यापासून
पोलिसांच्या जॅकेटपर्यंत
खाणारांना काहीच पुरले नाही.
सिमेंटपासून शेणापर्यंत
खायचे काहीच उरले नाही.

बकासूरांना बकासूरांचे
सोय म्हणून झाकावे लागते !
तृप्तीचे ढेकर आले तरी
कधी तरी ते ओकावे लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, December 25, 2009

पॅकेजची बंडलबाजी

***** आजची वात्रटिका *****
**********************

पॅकेजची बंडलबाजी

नीट विचार केला की,
बरोबर जाणवले जाते.
जुन्याला नवे लेबल लाऊन
नवे पॅकेज बनवले जाते.

बॅकलॉग कायम राहून
पॅकेजची रक्कम वाढते आहे !
वाढत्या बंडलबाजीची सवय
सर्वांनाच जडते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड

थंडी: काही संदर्भ

***** आजची वात्रटिका *****
**********************

थंडी: काही संदर्भ

थंडी...थंडी...आणि थंडी
कुणाच्या ओठी फक्त जप असतो.
कुणाच्या ओठी ग्लास-बाटली
कुणाच्या वाफाळता कप असतो.

थंडीला असे कपाप्रमाणेच
बाटलीमध्ये बुडवता येते.
थंडी असते एक नशा
ती तना-मनात चढवता येते.

ज्याला न उपाय काही
त्याला थंडी सोसावी लागते !
थंडीचा आनंद द्विगुणीत करण्या
हक्काची शेकोटी असावी लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, December 23, 2009

नो कॉमेंट्स

***** आजची वात्रटिका *****
***********************

नो कॉमेंट्स

स्वच्छतागृहातल्या भिंतीवर
लोक नको तेवढी घाण करतात.
दुसरीकडे जागा नसल्यासारखी
तिथे बदामातून बाण मारतात.

स्वच्छतागृहातील भिंतीना
असे नको ते बघावे लागते !
सचित्र कॉमेंट्स वाचत वाचत
बिचार्‍यांना जगावे लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, December 21, 2009

हे मुकुंदराजा.....

***** आजची वात्रटिका *****
************************

हे मुकुंदराजा.....

तुमचे कवीपण
खरोखरच आद्य होते आहे.
तुमच्या ब्रॅंडचे म्हणे
लवकरच मद्य येते आहे.

आद्यकवी नंतर मद्यकवी
असे लेबलही जोडले जाईल !
तुमच्या नावाने चिअर्स करीत
बाटलीचे सील फोडले जाइल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

गळीताचे धान्य

***** आजची वात्रटिका *****
************************

गळीताचे धान्य

विद्यार्थी सांगू लागले,
हे सरकारमान्य आहे.
ज्वारी,बाजरी,मका
हे गळीताचे धान्य आहे.

विद्यार्थ्यांचा हा युक्तीवाद
कोणता शिक्षक टाळू शकतो ?
तेलाऐवजी धान्यतून
आपण दारू तर गाळू शकतो !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Friday, December 18, 2009

कसाबवाणी

***** आजची वात्रटिका ****
**********************

कसाबवाणी

कसाब काय बोलेल
याचा मर्यादा राहिलेली नाही.
त्याने म्हणे आयुष्य़ात
एके-४७ पाहिलेली नाही.

कसाबच्या तोंडामध्ये
अहिंसेची भाषा आहे !
कसाबची बतावणी म्हणजे
न्यायव्यवस्थेचा तमाशा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, December 17, 2009

भिंतीला कॅमेरे असतात

***** आजची वात्रटिका *****
***********************

भिंतीला कॅमेरे असतात

उठसूठ कुणालाही
स्टिंगमध्ये पकडू लागले.
खाजगीत बोलतानाही
आता शब्द आखडू लागले.

स्टिंग ऑपरेशनची फॅशन
दिवसेंदिवस दृढ होते आहे !
भिंतीला कॅमेरे असतात
अशी म्हणही रूढ होते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

असली-नकली

***** आजची वात्रटिका *****
*********************

असली-नकली

असली काय?नकली काय?
पंचायत होऊन बसली आहे.
नकलीचा रूबाब असा की,
वाटते तेच असली आहे.

रेशन कार्डपासून,व्हिसापर्यंत
इथे पाहिजे ते नकली आहे !
तिथे तिथे हे घडू शकते,
जिथे जिथे नियत विकली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, December 16, 2009

ज्याची त्याची हिटलिस्ट

***** आजची वात्रटिका *****
***********************

ज्याची त्याची हिटलिस्ट

ज्याने त्याने आपल्या मनात
क्रमवारी लावलेली असते.
आपापली हिटलिस्ट
तयार करून ठेवलेली असते.

कोणाकडेच हिटलिस्ट नाही
असे गृहीत धरता येणार नाही !
सर्वांची अडचण अशी की,
ती जगजाहिर करता येणार नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, December 15, 2009

लाल फितीचा कारभार

***** आजची वात्रटिका *****
***********************

लाल फितीचा कारभार

त्यांनी लुटायचे ठरविले तर
कसे सांगावे काय काय लुटतात?
बिचार्‍या फायलींनाही
अचानकपणे पाय फुटतात.

काहींना पाय फूटतात,
काही फायली दाबल्या जातात !
फाय़लींच्या सरकासरकीवरच
त्यांच्या खुर्च्या उबल्या जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, December 14, 2009

चळवळींचे स्टंट

****** आजची वात्रटिका *****
************************

चळवळींचे स्टंट

चळवळी कमी झाल्या
सगळी स्टंटबाजी आहे.
भुकेला कोल्हा तर
फक्त काकडीला राजी आहे.

तडजोडीत गुंतलेले
चळवळीची चाके आहेत !
ज्यांच्या विरुध्द लढायचे
तेच पाठीराखे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, December 13, 2009

पक्षीय उपेक्षा

***** आजची वात्रटिका *****
***********************

पक्षीय उपेक्षा

नकार आणि होकार
दोघातले अंतर कळत नाही.
वाट बघून बघुनही
समीकरण जुळत नाही.

एकतर्फी प्रेम म्हणजे
एकतर्फी प्रेम असते !
राजकारणी असो वा सामान्य
सगळ्यांचेच सेम असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, December 12, 2009

ओळख परेड

****** आजची वात्रटिका *****
************************

ओळख परेड

नेत्यांच्या वाढदिवसाला
पुरवण्या सजल्या जातात.
डिजीटलच्या साईझवरून
पक्षीय निष्ठा मोजल्या जातात.

ने्त्यांचे वर,कार्यकर्त्यांचे खाली
चेहरे झळकले जातात !
डिजीटल बोर्डवरूनच
कार्यकर्ते ओळखले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (

Thursday, December 10, 2009

ओबामाची मल्लिनाथी

***** आजची वात्रटिका *****
***********************

ओबामाची मल्लिनाथी

जिथे शांततेचा नोबेल
जाहिर स्विकारला गेला.
तिथेच गांधीवाद
जाहिर नाकारला गेला.

गांधीजींच्या अहिंसेवर
जणू ही मल्लिनाथी आहे !
युद्धानंतरच्या शांततेला
स्मशानच साथी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, December 9, 2009

शेतकर्‍यांचा संवाद

***** आजची वात्रटिका *****
**********************

शेतकर्‍यांचा संवाद

आपणच मद्यसम्राट होऊ
उगीच विदेशी घ्यायची कशाला?
तु बाजरीची गाळ,
मी ज्वारीची गाळतो
उगीच हातभट्टी प्यायची कशाला?

पोटाच्या भूकेला
दारूसोबत जाळता येईल !
ज्वारी-बाजरी संपली की,
पुढे मक्याचीही गाळता येईल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

अरे रामा......

***** आजची वात्रटिका *****
*********************

अरे रामा......

आता तुम्हीच सांगा
काय गौण? काय प्रधान आहे ?
फुटला का फोडला?
फक्त चर्चेलाच उधाण आहे.

मूळ मुद्दे गौण झाले
नको ते मुद्दे प्रधान होत आहेत !
आपल्या मूर्खपणाचा फायदा
अतिरेकी घेत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड) .

दारूबंदीची ऐशीतैशी

***** आजची वात्रटिका *****
***********************

दारूबंदीची ऐशीतैशी

पिणारे पित आहेत
आम्हांला मात्र चढू लागली.
दारूड्यांबरोबर कारखान्यांची
संख्यासुद्धा वाढू लागली.

लिकर काय ?वाईन काय ?
मद्यार्काचाच डेरा आहे !
दारूबंदीच्या धोरणाला
उत्पादन शुल्काचा फेरा आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, December 8, 2009

अप्रेक्षणीय

****** आजची वात्रटिका *****
************************

अप्रेक्षणीय

येईल तो दिवस
वृत्तवाहिण्या साजरा करतात.
मुलाखती आणि बातम्यांसाठी
गुन्हेगारांनाही मुजरा करतात.

आपण बिचारे प्रेक्षक
आपण त्यांना काय बोलू शकतो ?
पॅरोलवर सुटलेला आरोपीही
त्यांना मुलाखतीसाठी चालू शकतो !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, December 7, 2009

कसोटीचे रंग

****** आजची वात्रटिका *****
************************

कसोटीचे रंग

कसोटीतला रटाळपणा टाळून
त्यातही रंग भरता येतो.
उगीच रखडत बसण्यापेक्षा
कसोटीचाच ट्वेंटी-२० करता येतो.

ट्वेंटी-२०चा आनंद
तुम्ही कसोटीत घेऊ शकता.
सर्वात मोठा फायदा हा की,
तुम्ही फॉलोऑन देऊ शकता.

खेळाचा आनंद सांगतो
कोण किती रसिक आहे ?
कसोटी हेच तर
क्रिकेटचे बेसिक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Sunday, December 6, 2009

चळवळीचा ताळेबंद

***** आजची वात्रटिका *****
**********************

चळवळीचा ताळेबंद

ज्याला जसे वाटता येईल
तसे बाबासाहेब वाटले आहेत.
चळवळीच्या पाठीराख्यांनी
आपले दुकाने थाटले आहेत.

पुढे तर नेलीच नाही,
मागे मागे ओढीत आहेत !
चळवळीचे हिशोब सारे
सध्या तरी बुडीत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, December 5, 2009

दूरदर्शन वृत्तांत

****** आजची वात्रटिका *****
***********************

दूरदर्शन वृत्तांत

मराठी वृत्तवाहिन्या
पुरत्या इंग्रजाळलेल्या आहे्त.
आईचे दूध सोडून
इंग्रजीवर भाळलेल्या आहेत.

डोळे उघडून नीट बघा
जरी जग जिंकण्याची आस आहे !
दुसर्‍याची बोली,दुस‍र्‍याचा बाणा
हेच धोरण २४ तास आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Friday, December 4, 2009

त्रिशंकू अवस्था

***** आजची वात्रटिका *****
*********************

त्रिशंकू अवस्था

लिंबु-टिंबूच्या हाती
सत्तेचा तंबू असतो.
मोठ्यांची कनात
यांचा मात्र बांबू असतो.

इटुकले-पिटूकले
त्यामुळेच धिटूकले होतात !
वाट्टेल त्या भावाने
लिंबु-टिंबू विकले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Thursday, December 3, 2009

आपापली व्यवस्था

***** आजची वात्रटिका *****
***********************

आपापली व्यवस्था

डोळ्याला झापडं लावा
दिसतेय ते मुळी पाहू नका.
माशांशी वैर धरायचे तर
पाण्यामध्ये राहू नका.

पाठीशी नसतो कोणी
ज्याची त्याला पडलेली आहे !
व्यवस्था ही व्यवस्था असते
बोलू नका ती सडलेली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, December 2, 2009

शोधा म्हणजे सापडेल

***** आजची वात्रटिका *****
**********************

शोधा म्हणजे सापडेल

आमच्या अज्ञानाची
यासारखी दुसरी दुर्दशा नाही.
आम्हांला कालपरवा कळाले
हिंदी आमची राष्ट्रभाषा नाही.

आम्हांला अंधारात ठेऊन
त्यांनी बरेच काही साधले आहे !
आता शोधावे लागेल
आमच्यावर काय काय लादले आहे ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड) .

Tuesday, December 1, 2009

पॅटर्न ते पेटर्न

***** आजची वात्रटिका *****
*********************

पॅटर्न ते पेटर्न

कालचे सारे पॅटर्न
आज पून्हा खोटे झाले.
काल विरोधात लढलेल्यांचे
आज साटेलोटे झाले.

नवा दिवस, नवी समीकरणे,
हेच राजकीय सत्य आहे !
मनी पुढे सज्जना,
सारे सारे मिथ्य आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 30, 2009

अहवालांचे नशिब

***** आजची वात्रटिका *****
**********************

अहवालांचे नशिब

चौकशी अहवालांचा काळ
हमखास वाढवला जातो.
एकाने दडवला जातो,
दुसर्‍याकडून फोडला जातो.

वाढणे,दडणे आणि फोडणे
हे आयोगाच्या भाळी असते !
आ वासून बघण्याची
जनतेवरती पाळी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

प्रगतीचे राजमार्ग

***** आजची वात्रटिका *****
***********************

प्रगतीचे राजमार्ग

मिंधेजी व्हा,लाचारेश्वर व्हा,
प्रगतीचे मा्र्ग खुले होतील.
तुमच्यावरच्या टिकांचे
आपोआप मग फुले होतील.

कणा मोडलेला असतानाही
देखाव्यापुरते ताठ व्हा.
तुमचे पोवाडे ऐका्यचे तर
तुम्ही दु्सर्‍याचे भाट व्हा.

खर्‍याचे काहीच खरे नसते
खोटेपणा करता आला पाहिजे !
नाक घासता घासताच
लाळघोटेपणा करता आला पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, November 28, 2009

सारेच ’स्मिता’स्पद

***** आजची वात्रटिका *****
*********************

सारेच ’स्मिता’स्पद

घर फिरले की,
घराचे वासे फिरू लागतात.
एकाने काही केले की,
दुसरेही तसे करू लागतात.

आंधळ्या कोशिंबिरीचाच
सगळा हा खेळ आहे !
भाऊबंदकीच्या राजकारणात
ही ’स्मिता’स्पद वेळ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

बळीच्या बकर्‍याचे मनोगत

***** आजची वात्रटिका *****
*********************

बळीच्या बकर्‍याचे मनोगत

हा निव्वळ योगायोग
माझ्यात खूप मांद आहे.
त्यांना खुणावतोय तो
माझ्या माथीचा चांद आहे.

सार्‍यासोबत मीसुद्धा
शेवटी अल्लास प्यारा होईल !
हजारोंची देऊन कमाई
माझा मरणसोहळा न्यारा होईल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

हल्ला-गुल्ला

***** आजची वात्रटिका *****
*********************

हल्ला-गुल्ला

पत्रकारच पत्रकारितेला
पाण्यात पाहू लागले.
वैयक्तिक शत्रूत्त्वावरून
पत्रकारितेवर हल्ले होऊ लागले.

शत्रूने शत्रूवर केलेला हल्ला
पत्रकारितेवरचा हल्ला नसतो !
हाती डफडे असल्यामुळे
उगीचच आपला कल्ला असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, November 27, 2009

ॠणमुक्ती

***** आजची वात्रटिका *****
*********************

ॠणमुक्ती

चांगली भाषणं झॊडली म्हणजे
आपण देशभक्त होत नाही.
फक्त श्रद्धांजल्या वाहून
आपण ॠणमुक्त होत नाही.

देशभक्ती प्रासंगिक नको
ती मनामनात भिनली पाहिजे !
ती दाखवायची गरज नाही
बघणार्‍यांनी जाणली पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 26, 2009

ज्वाला बने ज्योती

***** आजची वात्रटिका *****
*********************

ज्वाला बने ज्योती

२६/११ नंतर पेटलेली
ती आग,आग राहिली नाही.
तेंव्हा जी आली होती
ती जाग,जाग राहिली नाही.

हा महिमा काळाचा की,
आम्हीच विसराळू आहोत?
आम्हांस ना देणे-घेणे कशाचे
आम्ही फक्त दिवसपाळू आहोत?

त्या लवलवत्या ज्वालांच्या
पुन्हा ज्योती झाल्या आहेत.
नका करू कुणी खुलासे,
सार्‍या गोष्टी ध्यानी आल्या आहेत.

झटका भोवतालची राख
आतले निखारे धगधगु द्या !
दुश्मनांची हिंमत होईल कशी?
त्यांना हे निखारे बघू द्या !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

Wednesday, November 25, 2009

चौकशी अहवाल

***** आजची वात्रटिका *****
***********************

चौकशी अहवाल

नवर्‍यावर विश्वास नसतो,
बाकी जगाचा मात्र आदर करते.
नवर्‍याच्या चौकशी अगोदरच
बायको कृती अहवाल सादर करते.

बायकोचा एकसदस्यीय आयोग
तसा पूर्वग्रह्दुषित असतो
ठरवून काढलेले निष्कर्ष
नवरा बिचारा सोशित असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, November 24, 2009

चुकीचा संदेश

***** आजची वात्रटिका *****
******************* **

चुकीचा संदेश

जिवंत समाधी घेणे
ही संतपदाची अट असू नये.
कुणी समाधी घेतली की,
त्याचे संतपद घट असू नये.

एकाचे पाहून दुसरा
जिवंत समाधी घेऊ शकतो !
कुणाची इच्छा नसली तरी
चुकीचा संदेश जाऊ शकतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

मुद्दयाची गोष्ट

***** आजची वात्रटिका ******
************************

मुद्दयाची गोष्ट

राजकारण्यांची जातच
नको तेवढी चाभरी असते.
कधी चर्चेत मंदिर,
कधी चर्चेत बाबरी असते.

जीवन-मरणाचे प्रश्न
बाजूला ठोकरले जातात !
राजकीय डावपेच म्हणून
सोयीचे मुद्दे उकरले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 23, 2009

स्त्रीमुक्तीची व्याख्या

****** आजची वात्रटिका *****
***********************

स्त्रीमुक्तीची व्याख्या

नवर्‍यापासून मुक्त होण्यालाच
आज स्त्रीमुक्ती म्हटले जाते.
त्रासलेले नवरे भेटले की,
अनुभवाने अधिक पटले जाते.

स्त्रीमुक्तीबरोबर पुरूषमुक्तीचीही
आंदोलने उभी राहू लागली.
आमच्यासारख्या बघ्यांची तर
आयती करमणूक होऊ लागली.

फक्त नवर्‍यालाच नाही तर
परंपरेलाही नाकारायचे आहे !
मुक्त होणे म्हणजे तरी काय?
जे चांगले ते स्विकारायचे आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, November 22, 2009

रामशास्त्री ते दामशास्त्री

***** आजची वात्रटिका *****
**********************

रामशास्त्री ते दामशास्त्री

लोकशाहीचे आधारस्तंभ
पैशाला पासरी आहेत.
रामशास्त्री सांगु लागले,
आमच्यातच दामशास्त्री आहेत.

याचेच शास्त्रीय विश्लेषण
रामशास्त्री करायला लागले !
लेखणी नावाचे शस्त्र
बुमरॅंग ठरायला लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, November 21, 2009

महानगर ते आयबीएन

***** आजची वात्रटिका *****
************************

महानगर ते आयबीएन

तेंव्हा घडले,आताही घडले
पुन्हा तेच सगळे आहे.
पत्रकारितेच्या हल्ल्यातले
फक्त माध्यम वेगळे आहे.

असल्या भ्याड विकृतीला
विचारांनीच झुकवायला हवे !
ठोकशाहीशी झुंजताना
आपल्याही आत डोकवायला हवे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, November 20, 2009

२६/११ ते २०/११

***** आजची वात्रटिका *****
**********************

२६/११ ते २०/११

कुणाचाही कुणावर असो
शेवटी हल्ला हा हल्ला असतो.
आपण गप्प बसलो की,
भ्याडांचा असा पल्ला असतो.

हेही खरे की,
करावे तसे भरावे लागते.
दु:ख याचे की,पत्रकारालाच
हल्ल्याचे समर्थन करावे लागते.

विचारांनीच विचारांना
निश्चितपणे मारले पाहिजे !
आता पत्रकारांनीच
पत्रकारितेला तारले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 19, 2009

कपड्यांचे कुर्बान

***** आजची वात्रटिका *****
********************************

कपड्यांचे कुर्बान

पोस्टरवरुनच प्रश्न पडतो
पुढून कसे दिसत असेल?
जशी ज्याची नजर आहे
त्याला तसे दिसत असेल.

आपण बघतो;त्या दाखवतात,
लज्जेने नजर चोरली पाहिजे !
करिनाच्या उघड्या पाठीवर
कौतुकाची थाप मारली पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

माकडमेवा

****** आजची वात्रटिका *****
**********************

माकडमेवा

सरकारी कार्यालयात
सामान्यांचे खिसे कापले जातात.
गांधी बाबांची माकडं होऊन
हितसंबंध जपले जातात.

कान,डोळे आणि तोंड
यांच्यावरती हात असतात !
टोळ्या-टोळ्यांनी माकडं
सरकारी मेवा खात असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).

Tuesday, November 17, 2009

स-माजवादी सत्कार

***** आजची वात्रटिका *****
**********************

स-माजवादी सत्कार

मुंबईत बेतालपणा,
लखनौ मध्ये गरळ आहे.
खाजवून खरूज काढल्याचा
अर्थ तर सरळ आहे.

भाषॆच्या नावावरती
विषारी फुत्कार केला गेला.
केवळ एका शपथेसाठी
जाहिर सत्कार केला गेला.

हा केवळ सत्कार नाही,
हे तर आगीत तेल आहे !
जे विकले जाते,
त्याचाच जहिर सेल आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

नोबॉल आणि फ्री ही्ट

***** आजची वात्रटिका *****
*********************


नोबॉल आणि फ्री ही्ट

सचिनचा योग्य चेंडूही
नोबॉल ठरवला गेला.
आंतर्राष्ट्रीय लौकिकही
राजकारणात हरवला गेला.

दोघांत सामना सुरू
तिसर्‍यावरती फ्री हीट आहे !
मराठीच्या संकुचितपणाचा
मराठी मनास विट आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 16, 2009

व्होट बॅंक ऑफ मराठी

***** आजची वात्रटिका ****
*********************

व्होट बॅंक ऑफ मराठी

आपणच मराठीचे रक्षक
सैनिकांचे स्वत:कडे बोट आहे.
मराठीचा मुद्दा म्हणजे
जणू बॅंक ऑफ व्होट आहे.

सैनिकांच्या आंदोलनावरती
फार्सच्या शंका-कुशंका आहेत !
आता सैनिकांच्या टार्गेटवरती
रेल्वेनंतर बॅंका आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, November 15, 2009

नट्यांचे कपडे

***** आजची वात्रटिका *****
**********************

नट्यांचे कपडे

वरून खालीच नाही तर
खालुनही वर सरकू लागल्रे.
फॅशनच्या नावाखाली
नको नको तिथे टरकू लागले.

घालाणार्‍यांना नसली तरी
बघणार्‍यांना लज्जा वाटते आहे !
कुणाचे चेहरे आंबट तर
कुणाला फुकटची मज्जा वाटते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

सांघिक निष्कर्ष

***** आजची वात्रटिका *****
*********************

सांघिक निष्कर्ष

पराभवाच्या कारणांचे
आत्मचिंतन रंगलेले आहे.
सांघिक निष्कर्ष निघाला
भाजपाचे घर दुभंगलेले आहे.

सर्जरीच्या सूचनेनंतर
हा मूळावरतीच घाव आहे !
टिकेची हौस भागवता भागवता
मिशीवरतीही ताव आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, November 14, 2009

पालकांसाठी.....

****** आजची वात्रटिका *****
***********************

पालकांसाठी.....

मुलांना बडवणे म्हणजे
मुलांना घडवणे नाही.
आपली स्वप्ने लादून
त्यांची उर्मी दडवणे नाही.

मुलांत मूल होऊन
मुलांना मुलवता यावे.
आकाशाची उंची दाखवून
मुलांना फुलवता यावे.

मुले रेसचे घोडे नाहीत
त्यांची दौड करू नका !
मुलांना मुलेच राहू द्या
त्यांना अकाली प्रौढ करू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 12, 2009

विधानसभेची दैनंदिनी

***** आजची वात्रटिका *****
*********************

विधानसभेची दैनंदिनी

कधी यांचे सैनिक असतात,
कधी त्यांचे सैनिक असतात.
गोंधळाचे कर्यक्रम तर
विधानसभेत दैनिक असतात.

इतरांसाठी गोंधळ,
त्यांच्यासाठी त्या लढाया आहेत !
कुणी हारले नाही तरी
त्यांच्या जिकल्याच्या बढाया आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, November 11, 2009

बाळ-बुद्धी

***** आजची वात्रटिका *****
*********************

बाळ-बुद्धी

शपथेनंतर आता
वेगळीच आफत आहे.
बाळबुद्धीच्या उल्लेखाने
वातावरण तापत आहे.

न लागलेली चापटही
कानठाळीत बसली आहे !
नको नको त्यांचीही
बाळबुद्धी दिसली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, November 10, 2009

अस्मितेचे नवनिर्माण

अस्मितेचे नवनिर्माण

कुणीही इथे येऊन
आज मी मी करतो आहे.
प्रादेशिक अस्मिता बाळगणे
हाही देशद्रोह ठरतो आहे.

पण मूळ मुद्दा सोडून
नको तो मुद्दा फोकस होवू नये !
आपल्या अस्मितेचाही
चूकुनसुध्दा आकस होवू नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

हाय अल्ला ‍ऽऽ

***** आजची वात्रटिका *****
**********************

हाय अल्ला ‍ऽऽ

आता मात्र पाकिस्तानची
खरोखरच कीव आहे.
अतिरेक्यांनी दाखवून दिले
पाकिस्तानचा केवढूसा जीव आहे.

वैर्‍याच्याही वाट्याला
असले दिवस येऊ नयेत !
आत्मघाती निर्णय
कधी चुकूनही घेऊ नयेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 9, 2009

अशी ही खपवाखपवी

***** आजची वात्रटिका *****
**********************

अशी ही खपवाखपवी

भगवा खांद्यावर घेणारा
मराठी माणुस गुणाचा आहे.
पाठेत खुपसला खंजिर ज्याने
तो अग्रलेख कुणाचा आहे ?

माहित असले तरी
त्यास लपवू लागले !
कुणीही कुणाच्या नावावर
हल्ली अग्रलेख खपवू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, November 8, 2009

खाते वाटप

***** आजची वात्रटिका *****
**********************

खाते वाटप

जनतेपेक्षा नेतृत्वाशी
जशी जशी नाती असतात.
तशी तशी पदरात
मंत्रीपदाची खाती असतात.

पक्षीय दृष्टीकोन तर
सांगायला विहंगम असतो !
नात्या-गोत्या-खात्याचाच
खरा त्रिवेणी संगम असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, November 7, 2009

तोल मोल के बोल

***** आजची वात्रटिका *****
**********************

तोल मोल के बोल

मोबाईलच्या तालावर
लोक डॊलायला लागले.
अगदी सेकंदाच्या भावाने
लोक बोलायला लागले.

जरी बडबड कमी होऊन
आता दूरसंवाद वाढतो आहे !
तरी माणसापासून माणुस
मोबाईल हळुहळू तोडतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, November 5, 2009

सचिन नावाचा हिमालय

***** आजची वात्रटिका *****
***********************

सचिन नावाचा हिमालय

काढलेल्या प्रत्येक धावेला
विक्रमाचेच रूप घ्यावे लागते.
हे ऐर्‍या-गैर्‍याचे काम नाही
त्याला सचिनच व्हावे लागते.

सचिन बनणे सोपे असते,
सचिन म्हणून टिकता आले पाहिजे !
मास्टर-ब्लास्टर असूनही
रोज नवे शिकता आले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

सचिन नावाचा हिमालय

***** आजची वात्रटिका *****
***********************

सचिन नावाचा हिमालय

काढलेल्या प्रत्येक धावेला
विक्रमाचेच रूप घ्यावे लागते.
हे ऐर्‍या-गैर्‍याचे काम नाही
त्याला सचिनच व्हावे लागते.

सचिन बनणे सोपे असते,
सचिन म्हणून टिकता आले पाहिजे !
मास्टर-ब्लास्टर असूनही
रोज नवे शिकता आले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

वंदे मातरम

***** आजची वात्रटिका *****
**********************

वंदे मातरम

काही काही किडे
मुद्दाम डोक्यात सोडले जातात.
कुणी मानीत नसले तरी
उगीच फतवे काढले जातात.

सच्चा राष्ट्रप्रेमी
लावालावीला फसू शकत नाही !
देशापेक्षा मोठे
दुसरे काहीच असू शकत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, November 4, 2009

विजयी पराभव

***** आजची वात्रटिका *****
**********************

विजयी पराभव

निवडून आले म्हणजे जिंकले
या विधानात फारसे तथ्य नाही.
जी आकडेवारी मिरवली जाते
तिच्यातही फारसे सत्य नाही.

लोकशाहीत पद्धत म्हणून
हे असत्य स्विकारलेले आहे !
विरोधकांच्या मतांची बेरीज सांगते
त्यांना बहूमताने नाकारलेले आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

दक्षता सप्ताह

***** आजची वात्रटिका *****
**********************

दक्षता सप्ताह

सरकारी कार्यालयात
दक्षता सप्ता चालु असतो.
कार्यालयात देणे-घेणे बंद
घरी हप्ता चालु असतो.

दरवर्षी घेतलेली शपथ
आठवड्यानंतर मोडली जाते !
जशी दारूड्यांकडून दारू
वेळोवेळी सोडली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, November 2, 2009

एका गारूड्याचे मनोगत

***** आजची वात्रटिका *****
**********************

एका गारूड्याचे मनोगत

भोंदूबाबा आणि आमच्यात
असा कोणता फरक आहे ?
त्यांच्या वाट्याला स्वर्ग
आमच्या वाट्याला नरक आहे.

असे का म्हणून आम्ही
कधीच कुणाशी भांडत नाहीत !
हातचलाखीच्या जीवावर
धर्माचा बाजार मांडत नाहीत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

विधानसभेच्या ’वित्तं’ बातम्या

***** आजची वात्रटिका *****
************************

विधानसभेच्या ’वित्तं’ बातम्या

डोळे मिटून मांजरी
दूध पित होत्या.
बोक्यांच्या जाहिराती
प्रायोजित होत्या.

इलेक्शन स्पेशलचे
कव्हरेज पॅक होते.
बाजारबसवीपेक्षाही
यांचे धंदे झ्याक होते.

जिने बोंबाबोंब करायची
तीच तर मुकी होती !
पिवळीजर्द पत्रकारीता
हिच्यापुढे फिकी होती !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, November 1, 2009

भक्तीपुराण

***** आजची वात्रटिका *****
**********************

भक्तीपुराण

राजकारण्यांना नेहमीच
मागे कुणी तरी उभा लागतो.
अध्यात्माचे सोंग आणण्यासाठी
मागे कुणी तरी बाबा लागतो.


जेवढे भक्त मोठे,
तेवढा गुरु मोठा होत जातो.
भोवती पाळीव प्राणी जमताच
मठाचाही गोठा होत जातो.

आंधळे भक्त,आंधळी भक्ती
मेंदूचीही जागा मोकळी होते !
हवेतून आंगठीच काय ?
थेट सोन्याची साखळी येते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, October 31, 2009

बेइमानी

***** आजची वात्रटिका *****
**********************

बेइमानी

महाराष्ट्राच्या विधानसभेत
महिलांचे ३ टक्के प्रमाण आहे.
सावित्रीच्या महाराष्ट्राचे
हेच तर इमान आहे.

त्याही स्वयंभू नाहीत,
शोभेच्याच भावल्या आहेत !
बाप,लेक,नवरा,
यांच्याच तर सावल्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

१३ मेरा साथ

***** आजची वात्रटिका *****
**********************

१३ मेरा साथ

महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे
प्रयत्न जणू भावले गेले.
कुठे रूळावर,कुठे मुळावर
रेल्वे इंजिन धावले गेले.

कुणाचा चेहरा काळवंडलेला,
कुणाचा चेहरा तेज:पुंज आहे !
मातोश्रीकडून आबाळ होताच
सांभाळण्यासाठी कृष्णकुंज आहे !!

-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा (बीड)

Friday, October 30, 2009

साई,सुट्ट्याss

***** आजची वात्रटिका *****
**********************

साई,सुट्ट्याss

बाबांनो,ऎकले का?
म्हणाल,हे सत्य नाही.
कुणी कसे वागावे ?
याचे साधे पथ्य नाही.

तशी प्रजा नाही,
जसा इथला राजा आहे !
मनामध्ये श्रद्धा तरी
डोक्यामध्ये भेजा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

निकालाचा संदेश

***** आज़ची वात्रटिका *****
**********************

निकालाचा संदेश

लोकशाहीत एकच सत्य
सदा सर्वकाल असत नाही.
सत्तेच्या विरोधात
नेहमीच निकाल असत नाही.

विरोधासाठी विरोध नको
त्यातही सुसूत्रता असावी लागते !
देणारात दानत असली तरी
घेणारात पात्रता असावी लागते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

राजकीय पॅटर्न

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय पॅटर्न

अभद्र युत्या करून
राजकीय समेट घडवला जातो.
नव्या राजकीय पॅटर्नचा ढोल
मोठमोठ्याने बडवला जातो.

पॅटर्नच्या नावाखाली
अनैतिकही नैतिक होऊन जाते !
आंधळ्याचे पीठ
कुत्रे डोळ्यादेखत खाऊन जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, October 29, 2009

धृतराष्ट्र ते भिष्माचार्य

***** आजची वात्रटिका *****
**********************

धृतराष्ट्र ते भिष्माचार्य

कुणी भिष्माचार्य म्हटले तरी
धृतराष्ट्रासारखे वागत आहेत.
संजय जे जे दाखविल
तेवढेच फक्त बघत आहेत.

कौटुंबिक महाभारताचा
हाच खरा पंचनामा आहे !
शरपंजरी भिष्माचार्यांना कळेना
कोण खरा शकुनी मामा आहे ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

काका ते मामा

***** आजची वात्रटिका *****
**********************

काका ते मामा

सख्खे ते सख्खे
चुलत ते चुलत आहेत.
लेक आणि लेकीपोटी
काका पुतण्याला भुलत आहेत.

पक्ष कोणताही असो
सगळीकडेच हेच जाणवू लागले !
बघता बघता काका
पुतण्याला मामा बनवू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, October 28, 2009

९९ चा फॉर्म्युला

***** आजची वात्रटिका *****
**********************

९९ चा फॉर्म्युला

लोकांनी दिले तरी
तुला का मला आहे.
आघाडीच्या सरकारला
युतीचा फॉर्म्युला आहे.

आपल्याच ताटात ओढण्यावर
ज्याचे त्याचे लक्ष आहे !
यात गंमत अशी की,
उंदराला मांजर साक्ष आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, October 20, 2009

कारभारी दमानं....

***** आजची वात्रटिका *****
***********************

कारभारी दमानं....

प्रत्येकाच्याच मनात आस
मुंबईतल्या वर्षाची आहे.
दिल्लीतल्या वार्‍या सांगतात
ही तयारी बारश्याची आहे.

कुणीच नावे ठेवणार नाहीत
ज्याला जे पाहिजे ते करू द्या !
बारश्याच्या नियोजनापूर्वी
मधुचंद्राचा जोडीदार ठरू द्या !!

-सूर्यकाम्त डॊळसे,पाटोदा (बीड)

सनातन सत्य

***** आजची वात्रटिका *****
**********************

सनातन सत्य

बॉम्बस्फोटांचे बॉम्बस्फोटांशी
जुळणारे धागे असतात.
अधर्म सांगणारे अतिरेकी
बॉम्बस्फोटांच्या मागे असतात.

अतिरेकी सांगतात तो धर्म
तसूभरही खरा नसतो !
धर्मांध हे सैतान असले तरी
कोणताही धर्म बुरा नसतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

कार्यकर्त्यांनो सावधान

***** आजची वात्रटिका *****
**********************

कार्यकर्त्यांनो सावधान

आता पूर्वीसारख्या
थापा मारून चालत नाहीत.
मतदान यंत्रं काही
खोटे बोलत नाहीत.

वाटलेली दारू घोट घेईल
असे प्रकार टळले पाहिजेत !
खाल्ल्या मिठाचे,घेतल्या नोटाचे
हिशोब तरी जुळले पाहिजेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, October 19, 2009

निकालाची प्रतिक्षा

***** आजची वात्रटिका *****
**********************

निकालाची प्रतिक्षा

१३ ला पडल्या अक्षता,
२२ ची वाट आहे.
खोळंबलेल्या मधुचंद्राला
आयोगाचा नाट आहे.

कुणाच्या चेह‍र्‍यावर उत्सुकता,
कुणी धास्तावलेले आहेत !
मधुचंद्राच्या अगोदरच
कुंणी पस्तावलेले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, October 18, 2009

लक्ष्मीपूजन

***** आजची वात्रटिका *****
**********************

लक्ष्मीपूजन

बारा महिने,तेरा त्रिकाळ
लक्ष्मीलाच भजले जाते.
मुहूर्त असो वा नसो
लक्ष्मीलाच पूजले जाते.

लक्ष्मी हे काही
साधेसुधे दैवत नाही !
सरस्वतीही लक्ष्मीशिवाय
आजकाल पावत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, October 17, 2009

फसवा आनंद

***** आजची वात्रटिका *****
**********************

फसवा आनंद

जो सरळ सरळ डोळयात
इथे धूळ फेकतो आहे.
अशा फेकेबाजांपूढेच
आज जमाना झुकतो आहे.

आम्हीही त्याचाच भाग आहोत
याचीच लज्जा वाटते आहे !
फसवून घेण्यातही
लोकांना मज्जा वाटते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, October 16, 2009

काजव्यांची धडपड

***** आजची वात्रटिका ****
*********************

काजव्यांची धडपड

स्वयंघोषित समाजसेवक
गल्लोगल्ली जन्मास येऊ लागले.
आजकाल काजवेही स्वत:ला
क्रांतीसूर्य म्हणवून घ्रेऊ लागले.

एकाचे बघून दुसर्‍याची
उगीचच चमकाचमकी असते !
टीचभर असते कार्य,
त्याची हातभर टिमकी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, October 15, 2009

बी.टी.वांगी

***** आजची वात्रटिका *****
**********************

बी.टी.वांगी

संकरीत बीजे
नको तिथे घुसू लागले.
बी.टी.च्या तंत्रज्ञानाने
वांगे वासु लागले.

बी.टी.चा अनुभव तरी
कुठे सांगी-वांगी आहे ?
फटका बसल्यावर कळेल
ही विषारी नांगी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

दिपावली शुभेच्छा

Wednesday, October 14, 2009

राजकीय टेंभे

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय टेंभे

गावात गाव ठेवला नाही
माणसात माणूस ठेवला नाही.
असे एकही घर नसेल
जिथे त्यांनी टॆंभा लावला नाही.

राजकीय नैतिकतेचे
पुन्हा तेच ठेंभे मिरवू लागले !
ज्याचा त्याचा राजकीय कंड
बरोबर जिरवू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, October 12, 2009

राजकीय रक्तपात

***** आजच्या वात्रटिका *****
**********************

राजकीय रक्तपात

ह्या प्रचारकांच्या नाहीत तर
गुंडांच्याच टोळ्या आहेत.
शाब्दिक हल्ल्याऐवजी
थेट बंदूकीच्याच गोळ्या आहेत.

आपण झाले गेले विसरून जातो
हिंसाचारावर पडदा पडतो !
राजकीय रक्तपातात
बिचार्‍या लोकशाहीचा मुडदा पडतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, October 11, 2009

सरड्यांचा रंगोत्सव

***** आजची वात्रटिका *****
***********************

सरड्यांचा रंगोत्सव

निवडणूकीचा मोसमच खरा
सरड्यांना मानवला जातो.
रंगबदलाचा उत्सव तर
दररोजच जाणवला जातो.

कुंपणापर्यंत धाव तरी,
सरड्यांना चांगलाच भाव येतो !
हा मोसम असा की,
अंगातल्या गुणांना वाव देतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, October 10, 2009

आपले गैरसमज

***** आजची वात्रटिका *****
***********************

आपले गैरसमज

ते खुपसती पाठीत त्यांच्या
तरी आम्ही त्याला डावपेच म्हणतो.
जरी सोडली राजकीय पातळी
तरी आम्ही पुन्हा तेच म्हणतो

ते उडविती लोकशाहीची खिल्ली
आम्ही त्याला तडजोड म्हणतो.
महाठकापेक्षा ठक भेटला की,
पुन्हा आम्हीच त्याला गोड म्हणतो.

ते होती बेईमान तत्वाशी
बंडखोरांस स्वाभिमानी म्हणतो !
त्यांनी मांडला लिलाव लोकशाहीचा
आम्हीच खुळे,स्वत:स ज्ञानी म्हणतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

बळीचे बकरे

***** आजची वात्रटिका *****
***********************

बळीचे बकरे

नेत्यांची होते तडजोड
कार्यकर्त्यांचा बळी जातो.
कुणाचा फास बघा
कुणाच्या गळी येतो.

नेत्यांच्या स्वार्थासाठी
कार्यकर्त्यांचा त्याग असतो !
दबावाचीच निष्ठा होते
हा राजकारणाचाच भाग असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

प्रश्नांकीत राजकारण

****** आजची वात्रटिका *****
************************

प्रश्नांकीत राजकारण

नवे प्रश्न बाजूला ठेवुन
जुनेच प्रश्न उगळीत असतात.
पाहिजे तेंव्हा,पाहिजे ते
प्रश्न नव्याने चिघळीत असतात.

एकदा प्रश्न चिघळला की,
लोकनायक ठरणे सोपे जाते !
लोक अस्थिर असले की,
लोकांवर राज्य करणे सोपे जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

राजकीय टेंभे

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय टेंभे

गावात गाव ठेवला नाही
माणसात माणूस ठेवला नाही.
असे एकही घर नसेल
जिथे त्यांनी टॆंभा लावला नाही.

राजकीय नैतिकतेचे
पुन्हा तेच ठेंभे मिरवू लागले !
ज्याचा त्याचा राजकीय कंड
बरोबर जिरवू लागले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, October 9, 2009

पोल-खोल

***** आजची वात्रटिका *****
***********************

पोल-खोल

मतदारांच्या मनाची
कधीच पोल खोलता येत नाही.
सारे अंदाज गोल गोल
खात्रीने काही बोलता येत नाही.

कुठे ग्रहस्थिती मांडतात,
कुठे आकड्यांचा पुरावा असतो!
अंदाज आणि वास्तवात
म्हणूनच तर दूरावा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

वारसा हक्क

***** आजची वात्रटिका *****
*********************

वारसा हक्क

पूर्वी नेते घडायचे
आता नेते जन्माला येत आहेत.
झिजलेल्या कार्यकर्त्यांना
पुन्हा पुन्हा वापरून घेत आहेत.

नेत्याचा पोरगा नेता
हे धोरण तर पक्कं आहे !
सर्वपक्षीय सत्य हे की,
जसा काय हा वारसा हक्क आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

प्रिंटींग मिस्टेक

***** आजची वात्रटिका *****
*********************

प्रिंटींग मिस्टेक

सर्वांचेच जाहिरनामे
डोळ्याखालून घालुन घ्या.
काही शंका आलीच तर
देणार्‍यांशी बोलून घ्या.

तसे तुम्हांला जाणवेलच
जाहिरनाम्यात एकवाक्यता आहे !
हे सांगण्यास कारण की,
पुन्हा ’प्रिंटींग मिस्टेक’ सुद्धा
होण्याची शक्यता आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, October 8, 2009

नक्षलवादी मित्रांनो

नक्षलवादी मित्रांनो.....

***** आजची वात्रटिका*****
*********************


नक्षलवादी मित्रांनो.....

निष्पाप माणसं मारून
कधीच क्रांती होत नाही.
रक्ताची चटक लागली की,
मन:शांती होत नाही.

फक्त बंदुकीची गोळीच
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नाही !
कळतेच पण वळेना
तुमचे काळीज पत्थर नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

प्रचारसंहिता

****** आजची वात्रटिका ******
***********************

प्रचारसंहिता

प्रचार असावा प्रचारासारखा
उगीच कुणाच्या नकला नको.
मुद्दयापुरता मुद्दा काढावा,
उगीच कुणाच्या अकला नको.

प्रचार असावा प्रचारासारखा
उगीच कुणावर गरळ नको.
उचलली जीभ लावली टाळ्याला
उगीच लोकांवर भुरळ नको.

प्रचार असावा प्रचारासारखा
त्यात कोणतीही तेढ नको !
प्रचारकांना कळते सारे
उगीच पांघरलेले वेड नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, October 7, 2009

कार्यकर्त्यांचे पक्षांतर

***** आजची वात्रटिका *****
**********************

कार्यकर्त्यांचे पक्षांतर

जशी एक मेंढी
सगळ्या मेंढ्यांना घेवुन जाते.
तसे नेत्याच्या पक्षांतरातच
कार्यकर्त्यांचे पक्षांतर होवून जाते.

नेत्याचे शेपूट धरणे
एवढीच एक मात्रा असते !
नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची
अशी बिनबोभाट यात्रा असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

पक्षांतराची स्कीम

***** आजची वात्रटिका *****
**********************

पक्षांतराची स्कीम

नेत्यांच्या पक्षांतरामुळे
कार्यकर्त्यांची अवस्था बिकट असते.
म्हणून नेत्यांच्या सोबत
कार्यकर्त्यांची फौज फुकट असते.

नेत्यांसोबत कार्यकर्ते फ्री
ही पक्षांतराची स्कीम झाली आहे !
नेता पक्षात आला की समजावे,
सोबत त्याची टीम आली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, October 6, 2009

चार पर्याय

प्रचाराचे भाषाशास्त्र

***** आजची वात्रटिका *****
**********************

प्रचाराचे भाषाशास्त्र

भाषणांच्या नावाखाली
जीभा लवलवू लागल्या.
बोलता बोलता जीभा
जाहिर दगा देवू लागल्या.

उचलली जीभ लावली टाळ्याला
जणू जीभेला हाड नाही !
प्रचाराच्या भाषेला
सभ्य-असभ्यतेची चाड नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, October 5, 2009

राजकीय भूमिका

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय भूमिका

राजकीय पटलावरती
अशा काही भूमिका घ्याव्या लागतात.
काल ज्यांना शिव्या दिल्या
आज त्यांच्याच ओव्या गाव्या लागतात.

राजकीय मूर्खपणाही मग
मोठ्या दिमाखात सादर केला जातो !
राजकीय दारिद्र्य फिटण्यासाठी
नवा गॉडफादर केला जातो !!

-सूर्यकांत डॊळस,पाटोदा (बीड)

पावसाचा निषॆध

***** आजची वात्रटिका *****
**********************

पावसाचा निषॆध

नेत्यांचे गरजणे,
आश्वासनांचे बरसणे,
पावसालाही पाहवले नाही.
जाता-जाता मान्सूनला
आल्याशिवाय राहवले नाही.

म्हणूनच प्रचारसभांवरती
पाऊस पाणी फेरतो आहे !
पाऊस लोकशाही मार्गानेच
फेकाफेकीचा निषेध करतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, October 4, 2009

पक्षीय स्थलांतर

***** आजची वात्रटिका *****
*************************

पक्षीय स्थलांतर

एवढे आले,तेवढे गेले
असे नुसतेच बोलले जाते.
कार्यकर्त्यांच्या आवक-जावकीमुळे
पक्षीय पारडे तोलले जाते.

कुठेच खिंडार पडत नाही,
कुठे डॊंगर उभा राहत नसतो !
हे असले स्थलांतर तर
दर मोसमात पाहत असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटॊदा (बीड)

Saturday, October 3, 2009

विजयी पराभव

***** आजची वात्रटिका *****
*********************

विजयी पराभव

कुठे भावाविरुद्ध भाऊ
कुठे आजोबाविरुद्ध नातु आहे.
नात्या-गोत्याचा मुडदा पाडून
केवळ सत्ता हाच हेतू आहे.

सत्तेचे राजकारण असे
घराण्यांभोवती फिरत आहे !
कुणीही जिंकले तरी
घराणेशाहीच मुरत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Friday, October 2, 2009

कच्चे-बच्चे

***** आजची वात्रटिका ******
***********************

कच्चे-बच्चे

कसा भरवसा ठेवावा
राजकारणी सच्चे आहेत ?
जिथे जिथे त्यांचे बच्चे
विरोधी उमेदवार कच्चे आहेत.

आपल्या कच्च्या-बच्च्यांसाठी
हे बेरजेचे राजकारण आहे !
पक्षीय विरोधसुद्धा
कच्च्या-बच्च्यांसाठी तारण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, October 1, 2009

लोकशाहीचे मारेकरी

***** आजची वात्रटिका *****
**********************

लोकशाहीचे मारेकरी

प्रचाराच्या नावाखाली
चक्क दुकानं थाटले जातात.
व्होट के बदले नोट
अगदी सर्रास वाटले जातात.

वाटणारे आणि लाटणारे
लोकशाहीचे मारेकरी आहेत !
डॊळ्यावर पट्ट्या बांधलेले
लोकशाहीचे पहारेकरी आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, September 30, 2009

बंडखोरीचा आढावा

***** आजची वात्रटिका *****
*********************

बंडखोरीचा आढावा

कुणाला चुचकारले,
कुणाला बोचकारले,
कुणाला समजून घेतले गेले.
काही बंडोबांकडून मात्र
ऐनवेळी शेपूट घातले गेले.

खरे बंडोबा,खोटे बंडोबा
अखेरच्या क्षणी दिसून गेले !
कुणाच्या हाती लॉटरी,
कुणाचे बंड फसून गेले !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, September 29, 2009

स्वप्नाळू जाहिरनामे

****** आजची वात्रटिका ******
************************

स्वप्नाळू जाहिरनामे

सर्वांच्याच जाहिरनाम्यात
अगदी स्वप्नाळू चित्र असते.
जसे प्रियकर-प्रेयसीने
एकमेंकास लिहिलेले पत्र असते.

वचने,आणाभाका,शपथा
देताना प्रेमात आंधळे होतात !
जाहिरनामे पेलणारे नसतात
पण सत्तेपोटी वेंधळे होतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

रावण दहन

***** आजची वात्रटिका ****
********************

रावण दहन

एवढे सारे जाळले तरी
पुन्हा रावण कुठुन येतात?
पुढ्च्या विजयादशमीला
पुन्हा नव्याने त्रास देतात.


देखावा म्हणून आपण
सारेच रावण जाळत असतो !
आपापल्या मनात एकेक
सारेच रावण पाळत असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, September 28, 2009

रावण दहन

दसरा शुभेच्छा

गॉडफादर ते गॉडमदर

***** आजची वात्रटिका *****
***********************

गॉडफादर ते गॉडमदर

घराणेशाहीचे नमुने तर
सर्वांकडूनच सादर आहेत.
लेकरांसाठी तळमळलेले
राजकीय ’गॉडफादर’ आहेत.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत
त्यांच्याच पिलावळी घुसल्या आहेत !
गॉडफादर माहीत होते,
गॉडमदरही दिसल्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Sunday, September 27, 2009

चंद्रावर पाणी !

****** आजची वात्रटिका ******
***********************

चंद्रावर पाणी !

विज्ञानाच्या प्रगतीशीलतेची
ही एक नवी कहाणी आहे.
त्यांनी हे समजून घ्यावे,
ज्यांच्या डोक्यातच पाणी आहे.

टॅंकर सम्राटांचे डोके चालले
आता खोर्‍याने पैसा ऒढता येईल !
यापुढे टॅंकरचे बिल तर
थेट चंद्रापासून काढता येईल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

प्रचारातील मुडदे

***** आजची वात्रटिका *****
***********************

प्रचारातील मुडदे

शब्दांनी लढायचे सोडून
शस्त्रांनी लढायला लागले.
आचारसंहितेसोबत कार्यकर्त्यांचे
मुडदे पडायला लागले.

हे उमेदवारांचे नाहीतच
हिंसेचेच प्रचार आहेत !
विरोध नाहीतर विरोधकच
संपविण्याचे विचार आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, September 26, 2009

पक्षांतराचा खो-खो

***** आजची वात्रटिका *****
**********************

पक्षांतराचा खो-खो

पक्षांतराच्या नावाखाली
राजकीय खो-खो रंगला आहे.
याचा अर्थ असा नाही,
पहिल्यापेक्षा दुसरा चांगला आहे.

लोकांनी खो-खो हसावे
असा हा पक्षांतराचा खो-खो आहे !
कुणाकुणाचा खेळ तर
’पैसा फेको तमाशा देखो’ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

बंडखोरीचा प्रचार

***** आजची वात्रटिका *****
**********************

बंडखोरीचा प्रचार

प्रचाराचे मुद्दे तरी
बघा किती मस्त् आहेत.
आपसात तुलना करू लागले
कुणात बंडखोर जास्त आहेत ?

बंडखोरीच्या दुखण्यावरती
असे उपचार योजायला लागले !
एकमेकांच्या नाकाची उंची
सगळे नकटे मोजायला लागले !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, September 25, 2009

राजकीय फिक्सिंग

***** आजची वात्रटिका *****
***************************

राजकीय फिक्सिंग

कार्यकर्त्यांना आपसांत झुंजवुन
त्यांचे उगीच हाल केले जातात.
राजकीय साट्या-लोट्यापोटी
मतदारसंघ बहाल केले जातात.

लढवायची म्हणून लढवितात,
उमेदवार मात्र कच्चे असतात !
ज्यांच्यावरती विश्वास ठेवला
नेमके तेच तर लुच्चे असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

वैचारिक क्रांती

***** आजची वात्रटिका *****
**********************

वैचारिक क्रांती

पक्षांतर झाले म्हणजे
एका दिवसात वैचारिक क्रांती होते.
कुणाकडून तरी उभे राहिले की,
राजकारण्यांची शांती होते.

अश्या राजकीय क्रांतीकारकांची फौज
निवडणूकीला उभी ठाकली आहे !
आज त्यांचेच गुणगाण,
ज्यांच्यावरती कालपर्यंत
फक्त गरळच ओकली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटॊदा (बीड)

Thursday, September 24, 2009

गरीबीचे प्रदर्शन

***** आजची वात्रटिका *****
*********************

गरीबीचे प्रदर्शन

कुणाकडे घर नाही,
कुणाकडे गाडी नाही.
नेत्यांची गरीबी
काही थोडीथिडी नाही.

उमेदवारांच्या संपत्तीचा
असा लेखाजोखा आहे !
आपली गरीबी दाखविण्यावरच
सगळ्यांचा ठोका आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

खरेदी-विक्री

***** आजची वात्रटिका *****
*********************

खरेदी-विक्री

निवडणूक लढविणे म्हणजे
तो राजकीय कंड असतो.
उमेदवारी फुकट नाही
त्यासाठी पक्षाला फंड असतो.

’आहे रे’ असो नाहीतर ’नाही रे’
निवडणूक फंड चूकत नाही !
तरीही सगळेच म्हणतात,
आम्ही उमेदवारी विकत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, September 23, 2009

सत्संगाचे चंदन

***** आजची वात्रटिका *****
***********************

सत्संगाचे चंदन

सत्संगावर सत्संग
सत्संगाचे डोस आहेत.
पालथ्या घड्यावर पाणी
तरी सत्संगाचे सोस आहेत.

नवा आधार,नवा गुरु
रोज नव्याला वंदन आहे !
आपल्याच हाताने
आपल्या कपाळी चंदन आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

बंडखोरीचा बेंडबाजा

***** आजची वात्रटिका *****
*********************

बंडखोरीचा बेंडबाजा

ठसठसणारे बेंड
रसरसून फुटले आहे.
बंडखोरीचे मोहळ तर
सगळीकडेच उठले आहे.

बंडखोरी सर्वव्यापी,सर्वपक्षी,
तिने कुणालाही सोडले नाही.
एकाचेही कार्यालय दाखवा
जे कार्यकर्त्यांनी फॊडले नाही.

बेंड तर फुटलेच
पण बेंडबाजाही वाजतो आहे !
बंडखोरीच्या तापल्या तव्यावर
कुणी पोळ्याही भाजतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, September 22, 2009

इच्छुक ते बंडखोर

****** आजची वात्रटिका *****
**********************

इच्छुक ते बंडखोर

काल जे इच्छुक होते
ते आज बंडखोर झाले.
कोण किती निष्ठावंत ?
ते सारेच समोर आले.

निष्ठावंत आणि बंडखोरात
एका तिकीटाचा भेद आहे !
ज्याला त्याला आपल्याच
भविष्य़ाचा वेध आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, September 21, 2009

आंधळे प्रेम

***** आजची वात्रटिका ****
********************

आंधळे प्रेम

लोकांची ती घराणेशाही
आपली ती लोकशाही होते.
लेकरांना पुढे करण्याची
ज्याला त्याला घाई होते.

लोकशाहीच्या नावाखाली
आपल्या रक्ताला संधी असते !
ज्याच्या त्याच्या डोळ्यांवरती
पितृप्रेमाची धुंदी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

पक्षांतराचा अर्थ

***** आजची वात्रटिका *****
*********************

पक्षांतराचा अर्थ

लोकसभेला पडलेले
विधानसभेला उभे आहेत.
पक्ष आणि चिन्हांबरोबर
बदलेले सुभे आहेत.

हे तर बाजारू पक्षांतर
हे काही स्थित्यंतर नाही !
राजकीय अस्तित्वासाठी
ह्याशिवाय गत्यंतर नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीद)

Sunday, September 20, 2009

राजकीय भविष्य़

***** आजची वात्रटिका *****
*********************

राजकीय भविष्य़

निवडणूका आल्या की,
कुडमुड्यांना भाव येतो.
भविष्य़ म्हनून ठोकलेल्या
त्यांच्या पुड्यांना भाव येतो.

याला तेच,त्याला तेच
सरळ सरळ टांग असते !
अशा कुडमुड्यांच्या दारात
राजकारण्यांची रांग असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, September 19, 2009

आधुनिक ’पंच’ तंत्र

कायदेशिर अपमान

***** आजची वात्रटिका *****
**********************

कायदेशिर अपमान..!!


वापरायचे तेव्हढे वापरून
सामानासकट फेकून दिले.
" दलित आहे म्हणून..."
यांनीही मग ठोकून दिले.

सोयीचे नियम असे
सोयीच्या वेळी लावले गेले !
अपप्रचार करणारांचे तर
आयतेच फावले गेले !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, September 18, 2009

राजकीय अंधश्रद्धा

***** आजची वात्रटिका *****
*********************

राजकीय अंधश्रद्धा

आचारसंहितेपेक्षाही कडक
पक्षांकडून पितृपक्ष पाळला गेला.
राजकीय चर्चेच्या नावाखाली
याद्यांचा घोळही टाळला गेला.

अंधश्रद्धेवर ठेवली तेवढी
लोकांवर श्रद्धा ठेवणार नाहीत !
खुर्ची दाखविल्याशिवाय
पिंडाला कावळेही शिवणार नाहीत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, September 17, 2009

धंदेवाईक बंडखोरी

***** आजची वात्रटिका *****
*********************

धंदेवाईक बंडखोरी

पक्षीय बंडखोरांमुळे
चांगलाच वांधा होतो आहे.
राजकीय बंडखोरी हा तर
मोसमी धंदा होतो आहे.

असे धंदेवाईक बंडखोर
सर्वच मतदार संघात आहेत !
बंडखोर नावाच्या विदुषकांमुळे
निवडणुकाही रंगात आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, September 16, 2009

अंदर की बात

***** आजची वात्रटिका *****
**********************

अंदर की बात

रात्रीच्या शिळ्या भाताला
सकाळी नवी फोडणी असते.
पक्षीय जाहिरनामे म्हणजे
निव्वळ पुड्या सोडणी असते.

सारे जाहिरनामे सारखेच
मुद्दयात खालीवरती असते !
आश्वासनांच्या लाटांअना तर
जणु उधाणाचीच भरती असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड

इकॉनॉमी फॅड

***** आजची वात्रटिका *****
*********************

इकॉनॉमी फॅड

साधी रहाणी,उच्च विचार
हे फार काळ झेपणार नाही.
काटकसरीचे सोंगही
लोकांपासून लपणार नाही.

एकाचे पाहून दुसर्‍याचे
इकॉनॉमीक फॅड आहेत !
हे गृहीत धरू नका
सामान्य माणसं मॅड आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, September 14, 2009

आघाड्यांचा शोध

बंडोबांची कथा

बंडोबांची कथा

***** आजची वात्रटिका *****
*********************

बंडोबांची कथा

ज्यांच्या राजकीय स्वप्नांचा
पुन्हा-पुन्हा खेळखंडोबा होतो.
त्यांच्याच पोटी जन्माला
राजकीय बंडॊबा येतो.

बंडोबांना थोपविता येईल
असे कुठलेच लिंपण नसते !
बंडोबांच्या पराक्रमाला
साधे पक्षाचेही कुंपण नसते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, September 12, 2009

सर्दी

राजकीय बहूरूपी

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय बहूरूपी

जातीयवाद्यांना रोखण्याचे
इरादे समजून येत नाहीत.
जात पाहिल्याशिवाय तर
कुणीच उमेदवारी देत नाहीत.

सारेच जातीयवादी
कुणी उघड,कुणी छुपे आहेत !
आतुन सारखे असले तरी
वरून वेगवेगळी रूपे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, September 11, 2009

बदलता दृष्टिकोन

***** आजची वात्रटिका *****
***********************

बदलता दृष्टिकोन

इकडे आले,तिकडे गेले,
यात काय मॊठे असते ?
निवडणूकांच्या तोंडावरती
असेच साटेलोटे असते.

जातो तो गद्दार,
येणाराचे हृदयपरिवर्तन होते !
एकाच्या नावाने तमाशा
दुसर्‍याचे मात्र किर्तन होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
http://suryakantdolase.blogspot.com/

पक्षांतरामागची भूमिका

***** आजची वात्रटिका *****
*********************

पक्षांतरामागची भूमिका

पक्षांतराच्या प्रक्रियेमागे
फरक फक्त लेबलाचा असतो.
खुर्चीसाठी सगळे काही
फरक फक्त टेबलाचा असतो.

दुकानाची पाटी बदलून
गिर्‍हाईकांना बनवले जाते !
ज्यांचे काल कौतुक केले
त्यांनाच आज हिणवले जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, September 10, 2009

पाडवणूका आणि अडवणूका

***** आजची वात्रटिका *****
**********************

पाडवणूका आणि अडवणूका

निवडणूका राहिल्यात कुठे ?
त्या पाडवणूका झाल्यात.
पायात पाय घालण्यामुळे
त्यांच्या अडवणूका झाल्यात.

निवडून आणण्यापेक्षा
पाडापाडीवरच भर आहे !
गॊंड घोळायचा झाला की,
प्रत्येकाचीच तंगडी वर आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

पोपट केला रे....

***** आजची वात्रटिका*****
********************

पोपट केला रे....

आघाड्या आणि युत्यांचे
पुन्हा जुनेच भारूड आहे.
कुणाचा ’पोपट’केला गेला,
कुणी स्वत:च गरूड आहे.

ज्याच्या त्याच्या ओठावरती
स्वबळाच्या पोपटपंच्या आहेत !
सावलीवरून ठरवू नका,
बुटक्यांच्या काय उंच्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, September 9, 2009

राजकीय प्लॅन

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय प्लॅन

आऊट्गोईंग,इनकमिंगचा
भलताच जोर आहे.
इनकमिंगचा आनंद तर
आऊट्गोईंगचा घोर आहे.

कुणाचे प्लॅन प्रिपेड,
कुणाचे प्लॅन पोस्ट्पेड आहेत !
मोबाईल कार्यकर्ते तर
सर्वत्रच रेडीमेड आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, September 8, 2009

दंगलखोरी

***** आजची वात्रटिका *****
*********************

दंगलखोरी

कधी धार्मिक,कधी जातीय
ठरवून थट्टा उडविल्या जातात.
दंगल काही अपघात नसतो.
दंगली तर घडविल्या जातात.

माणसं बेभान होतात,
कालचे नातेही आज तुटले जाते !
दंगल म्हणजे काय?
पिसाळलेल्या पाळीव कुत्र्यांना
स्वार्थापोटी छूss म्हटले जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दंगल में मंगल

***** आजची वात्रटिका *****
*********************

दंगल में मंगल


सारा हैदोस श्वापदांचा
वाटते हे तर जंगल आहे.
इरादे एवढे रानटी की,
दंगल में मंगल आहे.

कधी हा वणवा मिरजेत,
कधी तो सांगलीत असतो !
त्यांचा राजकीय स्वार्थ तर
धगधगत्या दंगलीत असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, September 7, 2009

मठीय राजकारण

***** आजची वात्रटिका *****
*********************

मठीय राजकारण

गटा-तटाचे राजकारण
आता मठामठात घुसू लागले.
भगव्या फेट्यावालेही
पांढर्‍या गोटात दिसू लागले.

भक्तांची वेडी भक्ती
उगीच गृहीत धरू नका !
भक्तांच्या भक्तीचाही
असा काळाबाजार करू नका !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

चीनचा नकटेपणा

चीनचा नकटेपणा

पाकड्यानंतर लाल माकडांची
घुसखोरीची चाल आहे.
खडकाखडकावर लिहून टाकले,
आपलीच कशी ’लाल’ आहे.

अंतर्गत असंतोषामुळे
चीनची खडकाला धडक आहे !
असंतोषाचा रंग कुठे हिरवा,
तर कुठे लालभडक आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

सूर्यकांती:सूर्यकांत डोळसे यांचा वात्रटिका आणि कवितांचा एक बहारदार कार्यक्रम...जाहिरात

Sunday, September 6, 2009

ऐतिहासिक प्रसंग

***** आजची वात्रटिका *****
*********************

ऐतिहासिक प्रसंग

भावना कशाने दुखावतील?
हे काही सांगता येत नाही.
खरा इतिहासही मग
खुले आम टांगता येत नाही.

इतिहास बदलता येत नाही
आपणच बद्लून घ्यायला हवे !
जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन
इतिहासाकडे पहायला हवे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Saturday, September 5, 2009

विद्यार्थ्यांची विनंती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

विद्यार्थ्यांची विनंती

आम्ही असे म्हणत नाही,
तुम्ही खाऊ-पिऊ नका.
आम्ही असेही म्हणत नाही,
तुम्ही राजकारणी होऊ नका.

काळाप्रमाणे बदलावेच लागते
आम्ही हे जाणतो आहोत.
छाटले जरी आमचे आंगठे,
तुम्हांला आदर्श मानतो आहोत.

आदर्श आहात,आदर्श रहा,
पुरस्कारांसाठी भांडू नका.
काखेत कळसा असताना
गावात वळसा देत हिंडू नका.

आम्ही काय बोलतो ?
याची आम्हांला सुध-बुध आहे !
रतीब कुणीही घालो,
शेवटी हे वाघिणीचे दुध आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-1981
दैनिक पुण्यनगरी
5सप्टेंबर 2009

Friday, September 4, 2009

गणपतीचा निरोप

***** आजची वात्रटिका *****
*********************

गणपतीचा निरोप

गणपती आले
गणपती गेले.
गणपतीपेक्षा उंदीरच
जास्त बे-चैन झाले.

उंदीर नाचले होते,
उंदीर पेलेही होते !
ते शुद्धीवर आले तेंव्हा
गणपती गेलेही होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, September 3, 2009

राजकीय प्रवास

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय प्रवास

उमेदवारी मिळविण्यासाठी
वाट्टेल ते मार्ग योजावे लागतात.
एकदा तिकीट म्हटले की,
त्याला पैसेच मोजावे लागतात.

जसा गाडीचा दर्जा असेल,
तसाच तिकीटाचा भाव आहे !
जनता एक्सप्रेसच ठरविते,
कुणाची कुठपर्यंत धाव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

जाहिरनाम्यांचा नकलीपणा

***** आजची वात्रटिका *****
**********************


जाहिरनाम्यांचा नकलीपणा

जाहिरनामे म्हणजे
सगळे छु मंतर असते.
जाहिरनामे कधीचेही काढा
त्यात फारसे अंतर नसते.

कधी यांचे ,कधी त्यांचे
कलमंही छापले जातात !
एकमेकांचे राजकीय दृष्टीकोनही
नकळत ढापले जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, September 2, 2009

अपशकूनी चेहरे

***** आजची वात्रटिका *****
**********************

अपशकूनी चेहरे

आचारसंहितेच्या बडग्यापुढे
सगळे झकत झुकले जातात.
डिजिटलवरचे नकोसे चेहरे
काही दिवस तरी झाकले जातात.

आचारसंहिता कायमची पाहिजे
तसे वठणीवर यायचे नाहीत !
अपशकूनी चेहरे हटवले की,
कुणाला अपशकून व्हायचे नाहीत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, September 1, 2009

आचारसंहिता

***** आजची वात्रटिका *****
**********************

आचारसंहिता

तुझ्या थापाबाजीची शिक्षा
मी चांगलीच भोगली आहे.
आश्वासनं बंद कर
आचारसंहिता लागली आहे.

तो एवढा थापाड्या असूनही
पुढे काहीच बोलला नाही !
तिच्या आचारसंहितेपुढे
त्याचा विलाज चालला नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, August 31, 2009

पुरस्कारांची उथळता

***** आजची वात्रटिका *****
**********************

पुरस्कारांची उथळता

ज्याला वाटेल तो
पुरस्कारांचे दुकान थाटून टाकतो.
आदर्शांचे पुरस्कार तर
सोम्या-गोम्याही वाटून टाकतो.

जिकडे पहावे तिकडे
आदर्शांचा सुळसुळाट आहे !
अधिक खोलात शिरले की कळते,
हा उथळ पाण्याचा खळखळाट आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, August 30, 2009

कर्जबाजारी नसणार्‍यांसाठी

***** आजची वात्रटिका *****
**********************

कर्जबाजारी नसणार्‍यांसाठी

होते नव्हते तेवढे पाप
टप्प्या-टप्प्याने साफ झाले.
कर्जबाजारी शेतकर्‍यांचे
थकीत कर्ज माफ झाले.

जे कर्जबाजारी नव्हते त्यांचा
थोडातरी विचार व्हायला पाहिजे !
अशा शेतकर्‍यांनाही
बक्षीस तरी द्यायला पाहिजे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

’रेशन’ल थिंकींग

***** आजची वात्रटिका *****
**********************

’रेशन’ल थिंकींग

महागाईचे जे व्हायचे
अखेर ते झालेच.
साखर म्हणाली तुरदाळीला,
तु हो पुढे;मी आलेच.

साखर तर गोडबोली,
दाळीची चालही तुरुतुरू आहे !
रेशनवर पोहचायच्या आधिच
वाटेत काळाबाजार सुरू आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, August 29, 2009

भाववाढ

***** आजची वात्रटिका *****
**********************

भाववाढ

डाळच शिजू द्यायची नाही
साक्षी द्यायला तुरी आहे.
कॉंग्रेसची राष्ट्रवादीवर
साखरेची सुरी आहे.

इकडे भाव वाढू लागला
तिकडे दबाब वाढतो आहे !
लोकसभेचा विधानसभेवर
असा प्रभाव पडतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

अरे रामा.....

***** आजची वात्रटिका *****
**********************

अरे रामा.....

भाजपा म्हणजे काही
लहान बालक नाही.
संघाने स्पष्ट केले,
आम्ही काही पालक नाही.

सांघिक जबाबदारी
सगळेच टाळू लागले !
ओलाव्या अभावी कमळ
जाग्यावरच वाळू लागले !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, August 28, 2009

फाळणीचे दिवस

***** आजची वात्रटिका *****
**********************

फाळणीचे दिवस

कुणी बोलून मोकळे झाले
कुणाच्या तोंडात गुळण्या आहेत.
हकालपट्टी,राजीनामे,शोकॉज,
ह्यासुद्धा नव्या फाळण्या आहेत.

फाळणीला जबाबदार कोण ?
मुद्दा तसा वादग्रस्त आहे !
जीना वैचारीक फाळणी करतोय
त्यामुळे भाजपा त्रस्त आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

कुत्तर-ओढ

***** आजची वात्रटिका *****
**********************

कुत्तर-ओढ

आंधळे दळीत असले की,
कुत्रे मुक्तपणे पीठ खातात.
बघणार्‍यांनीही दुर्लक्ष केले की,
कुत्रे अधिकच धीट होतात.

लहान तोंड असले तरी
कुत्रे भलामोठा घास घेतात.
सुगंधाचा परीचय नसल्याने
कुत्रे नको त्याचा वास घेतात.

नको तिथे कुत्रे
तंगडी वर करून बसतात !
खरा दोष वृत्तीचाच असतो
लोक शेपटीला धरून बसतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Thursday, August 27, 2009

पुरस्कारांचे गुपित

***** आजची वात्रटिका *****
**********************

पुरस्कारांचे गुपित

पुरस्कार मिळत नाहीत,
पुरस्कार मिळवावे लागतात.
न केलेल्या कामाचेही
पुरावे जुळवावे लागतात.

असे पुरावे जुळवलेकी,
पुरस्कारही मिळले जातात !
देणार्‍या घेणार्‍यांचे गुपितंही
सगळ्यांना कळले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

लढा गुरूजी लढा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
लढा गुरूजी लढा...
झिजले जरी नाक तरी
पाया त्यांच्याच पडा.
आदर्शांच्या पुरस्कारांसाठी
लढा गुरूजी लढा...
अशी ’शाळा’ जमली की,
पुढचे सगळे सोडा
निवडणूका जवळ आल्यात
लढा गुरूजी लढा...
बघा रेस सुरू झाली
नाचवा कागदी घोडा.
नगदी रक्कम हाती घेऊन
लढा गुरूजी लढा...
लढतो तो जिंकतोच,
फक्त लाज थोडी सोडा !
अब्राहम लिंकनचे काय ऎकता ?
लढा गुरूजी लढा !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-1973
दैनिक पुण्यनगरी
27ऑगस्ट 2009

Wednesday, August 26, 2009

तिसरा पर्याय

***** आजची वात्रटिका *****
**********************

तिसरा पर्याय

तिसर्‍या आघाडीतल्या भुजातले
चांगलेच बळ वाढ्ते आहे.
कितीही नाकारले तरी
पोटातली कळ वाढते आहे.

सोळा जण,सोळा विचार,
हे तर सोळा आणे सत्य आहे !
खंबीरपणे गंभीर होणे
एवढेच आघाडीचे पथ्य आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दुनिया वेड्यांचा बाजार

***** आजची वात्रटिका *****
**********************

दुनिया वेड्यांचा बाजार

दुनिया एवढी वेडी की,
ती वाट्टेल तशी वागू शकते.
सलमानच्या टॉवेलसाठीही
जाहिर बोली लागू शकते.

हजार काय ? लाख काय ?
त्याला कोटींचाही भाव येईल !
नट-नट्यांच्या अंतर्वस्त्रांचाही
उद्या कदाचित लिलाव होईल !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, August 25, 2009

जाहिर हरास (लिलाव)

जाहिर हरास (लिलाव)

गणपतीच्या पुढे
भक्तीचा आव असतो.
गणपतीच्या मागे
पत्त्यांचा डाव असतो.

पुढे उभा मंगेशा,
मागे असली आरास असते !
जुगाराच्या डावाची
जाहिरपणे हरास असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Monday, August 24, 2009

कुत्री म्हणाली कुत्र्याला

!!!!! गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

***** आजची वात्रटिका *****
**********************

कुत्री म्हणाली कुत्र्याला

जरा इमानदारी पाळ,
एवढे माजल्यासारखे वागू नको.
तुला किती वेळा सांगितले,
टि.व्ही.वरच्या मालिका बघू नको.

तु मालिकेतल्यासारखे चाळे
वर्षभर करत बसललेला असतो !
बाराही महिने तुझ्या अंगी
भाद्रपद घुसलेला असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
http://suryakantdolase.blogspot.com/
----------------------------------------------------------------------------------
वाचा नवा दिवस...नवी वात्रटिका...
अभिप्राय कळवा...आवडली तर नाव न गाळता मित्रांना पाठवा.

Friday, August 21, 2009

दुष्काळाची प्रतिक्षा

***** आजची वात्रटिका *****
**********************

दुष्काळाची प्रतिक्षा

पावसाची वाट बघत
लोक आशेवर जगत आहेत.
कुणी कुणी तर दुष्काळाची
वाटच बघत आहेत.

कुणाचे पावसाकडे,
कुणाचे दुष्काळाकडे
टक लावलेले डोळे आहेत !
ते कोण ? हे न समजायला
लोक थोडेच भोळे आहेत ?

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, August 20, 2009

बैलोबा

!!!!!! पोळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!!!

***** आजची वात्रटिका *****
**********************

बैलोबा

घरात आहेत,दारात आहेत,
वर-खाली,मागे-पुढे आहेत.
बैलोबांचे कळप बघा
अगदी सगळीकडे आहेत.

जिथे जिथे बैलोबा
तिथे सारे काही छान असते.
करायचे तर काहीच नाही,
हलवायची फक्त मान असते.

वेसन आणि चाबकाशिवाय
बैलोबा बैलपण जपू शकतात !
अधुनमधुन चेमटले की,
बैलोबा नेटाने खपू शकतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)


----------------------------------------------------------------------------------
वाचा नवा दिवस...नवी वात्रटिका...
अभिप्राय कळवा...आवडली तर नाव न गाळता मित्रांना पाठवा.

Wednesday, August 19, 2009

जीना,इसी का नाम है

***** आजची वात्रटिका*****
*********************

जीना,इसी का नाम है

मागचाच अध्याय
नव्याने पुन्हा आहे.
स्तुतीच्या लाटेवर
बॅरीस्टर जीना आहे.

लालकृष्ण ते जसवंत
एक समान धागा आहे !
जीना म्हणजे तर
घसरती जागा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

राजकीय पॅटर्न

***** आजची वात्रटिका *****
**********************

राजकीय पॅटर्न

पक्षीय त्रिकोण जोडण्यासाठी
स्वार्थाचा कर्ण ओढला जातो.
नैतिक पर्याय संपले की,
राजकीय पॅटर्न काढला जातो.

एका अपरिहार्य परिस्थितीत
असेच काहीतरी घडून जाते !
सत्तेचे अंडे घोळता घोळता
पॅटर्नचे पिल्लू उडून जाते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, August 18, 2009

स्ट्राईक रोटेट

***** आजची वात्रटिका *****
**********************

स्ट्राईक रोटेट

त्याचा ट्वेंटी-२० चा खेळ
ती ’कसोटी’ मागते.
पिचवर टिकताना
त्याची कसोटी लागते.

कधी तो,कधी ती,
सामना सांभाळुन नेतात !
स्ट्राईक रोटेट केल्यावर
आपोआप धावा होतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, August 17, 2009

आडपडदा

***** आजची वात्रटिका ******
***********************

आडपडदा

पडद्यावरच्या नट्यांना
कुठलाच आडपडदा राहिला नाही.
असा एकही अवयव नाही
जो कुणीच पाहिला नाही.

चित्रपटाच्या मायेपोटी
त्या काया तोलीत होत्या !
भविष्य़ाला ओरडून सांगावे लागेल
एके काळी नट्यासुद्धा
इथे कपडे घालीत होत्या !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, August 16, 2009

नारायणाष्टक

***** आजची वात्रटिका *****
**********************

नारायणाष्टक

तिकडे काय होते?
इकडे मंत्रीपदाची मज्जा आहे.
झुणका भाकरीपेक्षा मस्त
इटालियन पिझ्झा आहे.

उड्डाण पूलाखालुन पाणी वाहिले
तरी अंगी मावळेपणा होता !
मी कडवट सैनिक होतो
हाच माझा बावळेपणा होता !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, August 14, 2009

तिरंग्याचे मनोगत

***** आजची वात्रटिका *****
**********************

तिरंग्याचे मनोगत

हल्ली झेंडे एवढे झालेत की,
मलाही फडकावे वाटत नाही.
तुम्ही एवढे मोकाट झालात की,
मलाही अडकावे वाटत नाही.

" झंडा ऊंचा रहे हमारा "
हे फक्त गाण्यातच राहू लागले !
दुश्मनांची गरजच काय?
आपलेच पाण्यात पाहू लागले.

त्या नि:स्वार्थी क्रांतीवीरांची
ती सलामीच खरी होती !
आजचा स्वैराचार पाहून वाटते,
ती गुलामीच बरी होती !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

दैनिक वात्रटिका19मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -286वा

दैनिक वात्रटिका 19मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -286वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1-fbx6QEScldHj2QiABT650...