Sunday, July 12, 2020

कोरोनाचा झेंडा

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाचा झेंडा
जसा आमचा वेगळा आहे,
तसा तुमचाही वेगळा आहे.
आजकालचा लॉकडाऊन,
पहिल्यापेक्षा आगळा आहे.
आरोग्याबरोबर मानसिकतेचा,
क्षणोक्षणी गंडा आहे !
अनलॉक आणि लॉकडाऊनमध्ये,
कोरोनाचाच झेंडा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7341
दैनिक झुंजार नेता
12जुलै 2020
--------------------------------
#कोरोना

योगायोग

आजची वात्रटिका
----------------------------
योगायोग
जेंव्हा सोयीच्या प्रश्नांना,
सोयीचेच उत्तर येते.
तेंव्हा गटारगंगेचे पाणीही,
आपोआप अत्तर होते.
गटारगंगेच्या पाण्याचा,
कानोकानी फाया असतो !
खऱ्याच्या बुडाखाली,
खोट्याचाच पाया असतो !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5856
दैनिक पुण्यनगरी
12जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Saturday, July 11, 2020

नाविलाज

आजची वात्रटिका
----------------------------
नाविलाज
कोरोनाने नवा विचार,
पचवायला शिकवले आहे.
जे जे रुचत नाही,
ते रुचवायला शिकवले आहे.
कोरोनाचे हे रूप,
बरेच काही सूचक आहे !
कोरोना पचनी पडतोय,
जरी कोरोना जाचक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7340
दैनिक झुंजार नेता
11जुलै 2020
--------------------------------

एन्काऊंटर

आजची वात्रटिका
----------------------------
एन्काऊंटर
एन्काऊंटर म्हटले की,
संशयाचे ढग दाटून येतात.
हाच खरा न्याय आहे,
असेही लोक वाटून घेतात.
न्याय त्वरीत मिळावा,
पण एन्काऊंटरचे नाटक नको !
बंदुकीच्या गोळीला,
एन्काऊंटरची चटक नको !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5855
दैनिक पुण्यनगरी
11जुलै2020
----------------------------------------
#कोरोना

Friday, July 10, 2020

मुस्कटदाबी

आजची वात्रटिका
----------------------------
मुस्कटदाबी
ना दवा, ना दुवा आहे,
सर्वत्र कोरोनाची हवा आहे.
कोरोना हवेतून पसरतो,
पुराव्यानिशी दावा आहे.
नाहीतरी कोरोनामुले,
रोज नवी समस्या उभी आहे !
नाहीतरी कोरोनाकडून,
शब्दशः मुस्कटदाबी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7339
दैनिक झुंजार नेता
10जुलै 2020
----------------------------------------
#कोरोना

देवाक काळजी...

आजची वात्रटिका
----------------------------
देवाक काळजी...
कोरोनाच्या धक्केबाजीला,
आपण कुठे विसरू शकतो?
यावरही शिक्कामोर्तब झाले,
तो हवेतूनही पसरू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेचाही,
हवाई संसर्गाला हवाला आहे !
आता नास्तिकही म्हणू नयेत,
आपली काळजी देवाला आहे !
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5854
दैनिक पुण्यनगरी
10जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Thursday, July 9, 2020

अशास्त्रीय विचार

आजची वात्रटिका
------------------------------
अशास्त्रीय विचार
एखादा प्रश्नव मुळात,
आपल्या बौद्धिक सत्त्वाचा असतो.
अभ्यासक्रमातील एखादा धडा म्हणे,
कमी-अधिक महत्त्वाचा असतो.
फक्त एखादा धडाच नाही,
विषयलाही कमी लेखले जाते !
सुजाण नागरीक घडवायचे,
शास्त्रही अडगळीत टाकले जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7338
दैनिक झुंजार नेता
9जुलै 2020

तहनामा

आजची वात्रटिका
----------------------------
तहनामा
राजकीय पक्षांतराचे,
कुणाला काहीच वाटत नाही.
बाटा-बाटी कालबाह्य झाली,
त्यामुळे कुणीच बाटत नाही.
जे पदरी पडतात,
ते पवित्र केले जातात !
राजकीय तह झाले की,
गुलाम परत दिले जातात !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5853
दैनिक पुण्यनगरी
9जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Wednesday, July 8, 2020

हवाई सफर

आजची वात्रटिका
----------------------------
हवाई सफर
कोरोनामुळे अगोदरच,
सगळी अफरातफर आहे.
तोपर्यंत नवी बातमी आली,
कोरोनाची हवाई सफर आहे.
कोरोनामुळे अगोदरच,
पळता भुई थोडी आहे !
कुणीतरी दिलासा द्यारे,
ही बातमी खरी नाही,
ही चक्क पुडी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7337
दैनिक झुंजार नेता
8जुलै 2020
--------------------------------
#कोरोना

संतापाचा भावार्थ

आजची वात्रटिका
----------------------------
संतापाचा भावार्थ
पेट्रोलकडे बघून,
डिझेलही पेटले आहे.
पेट्रोलच्या भावाला,
डिझेलने गाठले आहे.
कसला कसला कर,
ग्राहकाच्या गळी आहे !
आता पेट्रोल-डिझेल,
गाडीमध्ये नाही;
गाडीवर ओतायची पाळी आहे !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5852
दैनिक पुण्यनगरी
8जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Tuesday, July 7, 2020

टेक केअर

आजची वात्रटिका
----------------------------
टेक केअर
कोरोनाच्या व्हायरसचा,
एकच ठोकताळा आहे.
कोरोनाचा व्हायरस,
खूपच निमताळा आहे.
कोरोनाच्या निमित्ताला,
आयते कारण होवू नका !
उतावळेपणा दाखवून,
कोरोनाला निमंत्रण देऊ नका !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7336
दैनिक झुंजार नेता
7जुलै 2020
--------------------------------
#कोरोना

कोरोनाच्या नावानं..

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाच्या नावानं..
जशी कोरोनाच्या संकटाची,
बाजार बसवाबसवी आहे.
तशी कोरोनाच्या नावावर,
लोकांची फसवाफसवी आहे.
फसवे असो वा बाजारबसवे,
त्यांची एकच नाळ आहे !
जिकडे तिकडे सुतक,
त्यांना मात्र सुगीचा काळ आहे !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5851
दैनिक पुण्यनगरी
7जुलै2020
-----------------------------
#कोरोना

Monday, July 6, 2020

विरोधकांची धडाडी

आजची वात्रटिका
-----------------------------
विरोधकांची धडाडी
कालचे सत्ताधारी,
आज कडक भासू लागतात.
विरोधी बाकावर बसले की,
खरे धडाडीचे दिसू लागतात.
विरोधकांची धडाडी बघून,
लोकसुद्धा थक्क होतात !
जबाबदारीपेक्षाही श्रेष्ठ,
मागण्या आणि हक्क होतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7335
दैनिक झुंजार नेता
6जुलै 2020

राजकीय हंगाम

आजची वात्रटिका
------------------------------------
राजकीय हंगाम
कुणाची चिखलफेक चालू,
कुणाकडून मी..मी,तू..तू आहे.
राजकारणाचे असे नाही की,
त्याचा ठराविक एक ऋतू आहे?
ना देणे घेणे;ना सुख दुःख,
दुष्काळ वा सुकाळ असतो !
राजकारणाचा हंगाम तर,
बारा महिने तेरा त्रिकाळ असतो !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5850
दैनिक पुण्यनगरी
6जुलै2020

Sunday, July 5, 2020

कॉमन अजेंडा

आजची वात्रटिका
------------------------------------
कॉमन अजेंडा
गोष्ट जशी गंभीर असते,
गोष्ट तशी 'फुट'कळ असते.
मित्राने मित्राचे घर फोडू नये,
अशी आपली अटकळ असते.
आपल्या राजकीय मैत्रीवर,
आपल्या हाताने धोंडा असतो !
कारण आणि राजकारण हे की,
पक्षवाढ हा कॉमन अजेंडा असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7334
दैनिक झुंजार नेता
5जुलै 2020

मोबाईल गुरु

आजची वात्रटिका
------------------------------------
मोबाईल गुरु
ऑनलाईन गुरू आहेत,
ऑनलाईन शिष्य आहेत.
कोरोनाच्या धास्तीने,
हीच मोबाईल दृष्य आहेत.
अकल्पित असा बदल,
गुरू-शिष्याच्या नात्यात आहे !
नाते चिरंजीव राहील,
पण शैक्षणिक वर्ष धोक्यात आहे!!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5849
दैनिक पुण्यनगरी
5जुलै2020

Saturday, July 4, 2020

गुरुत्वाकर्षण

आ।ठ।व।णी।ती।ल
वा।त्र।टि।का
------------------------------
गुरुत्वाकर्षण
गिर्हाईकांची गर्दी बघून,
वाट्टेल ते धंदे सुरु झाले.
ज्यांची शिष्य व्हायची
लायकी नाही,
असेसुद्धा गुरु झाले.
आपण कितीही डोळे उघडा,
शिष्याची गुरूवर भक्ती असते !
शिषयांचा वेडपटपणा,
गुरूंची गुरुत्वाकर्षण शक्ती असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा-3067
दैनिक पुण्यनगरी
3जुलै2012

पक्षीय धोरण

आजची वात्रटिका
------------------------------------
क्षीय धोरण
काही कार्यकर्ते रुजवले जातात,
काही कार्यकर्ते जोजवले जातात.
बंडाची भाषा करणारे,
डावपेच करून कुजवले जातात.
जो झिजला जातो,कुजला जायो
तो कार्यकर्त्यांचा त्याग असतो !
न्याय-अन्यायाचे एकच उत्तर,
तो पक्षीय धोरणाचा भाग असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7333
दैनिक झुंजार नेता
4जुलै 2020
आजची वात्रटिका
------------------------------------
चमत्कारिक बोधामृत
प्रबोधनाच्या नावाखाली,
थापा मारल्या जातात.
सगळ्या चमत्कारिक गोष्टी,
हळूच पेरल्या जातात.
तर्कहीन चमत्कार,
पुन्हा पुन्हा बोधले जातात !
पोटपूजेच्या साधनाबरोबर,
जुने डावही साधले जातात !
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5848
दैनिक पुण्यनगरी
4जुलै2020

Thursday, July 2, 2020

नेतृत्त्वाची जातकुळी

आजची वात्रटिका
------------------------------------
नेतृत्त्वाची जातकुळी
जातीयवादाचे चटके,
लोक रोज सोसायला लागले.
जाती-जातीचे नेतेच,
जातीयवाद रोज पोसायला लागले.
नेते दाखवित सुटतात,
त्यांना काळजी किती आहे?
जातीयवाद संपला तर.
त्यांना संपण्याची भीती आहे.
समाजहिताच्या आड दडलेला,
नेतृत्त्वाचा छुपा स्वार्थ असतो !
समाजहित साधले तरच,
कोणत्याही संघटनाला अर्थ असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7331
दैनिक झुंजार नेता
2 जुलै 2020
--------------------------------
#कोरोना
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
----------------------------------------
https://suryakantdolase.blogspot.com
विशेष सूचना-माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी
-सूर्यकांत डोळसे
2जुलै2020

कोरोनील

आजची वात्रटिका
---------------------------------

कोरोनील
कोरोनीलच्या शोधावरून
गदारोळ माजला आहे.
रोगाइतकाच विलाजही,
भरपूर गाजला आहे.
लोक मात्र औषधासाठी,
नको तेवढे त्रस्त आहेत !
योगायोगाने गुरू- शिष्य,
नेहमीच वादग्रस्त आहेत !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5846
दैनिक पुण्यनगरी
2जुलै2020
-----------------------------
----------------------------
#कोरोना

Wednesday, July 1, 2020

कोरोनाचे अभंग

आजची वात्रटिका
------------------------------------
कोरोनाचे अभंग
सगुण भक्ती
झाली निर्गुण ।
कोरोनाची कुणकुण,
कानोकानी ।। १।।
आवरली दिंडी,
आवरली वारी।
देवाचिया द्वारी,
मनोमन ।।२।।
टाळ आणि चिपळी,
झाले भजनात दंग।
कोरोनाचे अभंग,
ठायठायी ।।३।।
भक्त सारे भोळे,
कोरोना अट्टल।
आरोग्य विठ्ठल,
भजूयात ।।४।।
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7330
दैनिक झुंजार नेता
1जुलै 2020
----------------------------
#कोरोना

उपास-तपास

आ।ठ।व।णी।ती।ल
वा।त्र।टि।का
---------------------------
उपास-तपास
उपवासाच्या दिवशीच
नवनवे मेनू स्फूरू लागतात.
साबुदाण्याने उसळी मारताच
बिच्चारे चिप्स कुरकुरू लागतात.
वड्याचे तेल असे
वांग्यावरती काढले जाते !
नायलॉनच्या जाळीने
पुण्य पदरी पाडले जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------
चिमटा-888
दैनिक पुण्यनगरी
25ऑगस्ट2006

ट्रेड मार्क

आजची वात्रटिका
---------------------------------------
ट्रेड मार्क
फोर व्हीलर आणि टू व्हिलरवर,
जाती धर्माचे चिन्ह असतात.
आपापल्या जाती-पातीचेच
संत त्यावरती प्रसन्न असतात.
जातीपातीचा उदोउदो,
जातीपातीचाच स्पार्क असतो !
श्रद्धा आणि भक्तीपेक्षाही,
तो जाती-धर्माचा ट्रेडमार्क असतो !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5845
दैनिक पुण्यनगरी
1जुलैन2020
--------------------------------------
#कोरोना

Tuesday, June 30, 2020

चमत्कार

आठवणीतील
वात्रटिका
----------------------------------
चमत्कार
लेकरांच्या प्रेमापोटी,
भलेभले खुळे होतात.
राजकारणात दुधी दात
अचानक 'सुळे' होतात.
बिचाऱ्या लोकशाहीवर,
घराणेशाहीचा तोरा आहे !
'मुलगा मुलगी एकसमान'
त्यांच्याच तोंडी नारा आहे !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा।दैनिक पुण्यनगरी2006
--------------------------------
#कोरोना

पावसाचा राग


थांबला तो संपला

आजची वात्रटिका
---------------------------------------
थांबला तो संपला
आमच्यावेळी असे होते,
आमच्यावेळी तसे होते.
हे सांगत थांबू नका,
केंव्हा काय अन कसे होते?
कोरोना जुन्या परंपरा,
मोडायला शिकवतो आहे.
कोरोना नव्या परंपरा,
पाडायला शिकवतो आहे.
जुने ते सोने असेल तर,
नवेही खणखणीत नाणे आहे!
जो थांबला तो संपला,
त्याच्याशी कुठे देणे-घेणे आहे !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5844
दैनिक पुण्यनगरी
30जून2020
--------------------------------------
#कोरोना

Monday, June 29, 2020

बॅट म्हणाली बॉलला

आजची वात्रटिका
----------------------------
बॅट म्हणाली बॉलला
ना ग्राउंड नाही,
ना नेट नाही.
कोरोनाच्या छायेत,
आपली भेट नाही.
मी करते बॅटींग,
तू बॉलिंग कर.
सोशल डिस्टनसिंगचे,
तू फिलिंग कर.
लॉक डाऊन पाळू,
सारे अनलॉक होईल !
कसोटीच्या रिप्लेने,
कोरोनाही शॉक होईल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7328
दैनिक झुंजार नेता
29जून2020
-------------------------

जातीवंत विचार

आजची वात्रटिका
----------------------------
जातीवंत विचार
जसा जातीचा पंथ लागतो,
तसा जातीचा संत लागतो.
फक्त एवढेच नाहीतर,
जातीचाच विचारवंत लागतो.
वरवर जाती अंत आहे,
आत जाती-जातीचा जंत आहे !
चळवळीपासून वळवळीकडे,
या प्रवासाची खरी खंत आहे !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5843
दैनिक पुण्यनगरी
29जून2020

Sunday, June 28, 2020

कोरोना ची केस स्टडी

कोरोनाची केस स्टडी

कुणी झिंजाळे झाले आहेत,
तर कुणी पारच टकले आहेत.
कुणाचा मिशांवर ताव आहे,
कुणी कुणी मिशांना मुकले आहेत.

कोरोनाच्या कात्रीत अडकल्याने,
ज्याची त्याची वेगळी केस आहे !
आमदानीच नसल्याने,
गरीबांच्या तोंडाला फेस आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-99238472692
-------------------------
फेरफटका-7324
दैनिक झुंजार नेता
25जून2020

कोरोना का इशारा

आजची वात्रटिका
-----------------------------
कोरोना का इशारा
कोरोना बोला कोरोनाको,
उनका चल्या पॉंलिटिक्स,
आपून फिकर करना मत,
किधर भी घुसो लेकीन,
पॉंलिटिक्स मे शिरना मत.
वो पॉलिटिक्स करते रहेंगे,
उनका तो पेट भरने धंदा है !
वोच साबित करते रहेंगे,
कौन सबसे जादा गंदा हैं ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7325
दैनिक झुंजार नेता
26जून2020
--------------------------------
#कोरोना

लव्हली निर्णय

आजची वात्रटिका
----------------------------
लव्हली निर्णय
फेअर अँड लव्हलीची गोष्ट ,
त्यांना त्यांना कुठे ठावी आहे?
ज्यांना ज्यांना अजूनही,
गोरी बायको हवी आहे.
लव्हलीमागचे फेअर गेले,
पोहचायचा तो संदेश पोचला आहे!
हिंदुस्थान लिव्हर चे हार्टली थँक्स,
अखेर योग्य निर्णय सुचला आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7327
दैनिक झुंजार नेता
28जून2020
--------------------------------
#कोरोना

कोरोनाचा तिढा

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाचा तिढा
जसे कुठे सुरळीत होत आहे,
तसे कुठे बिघडत चालले आहे.
अनलॉकच्या मार्गाने,
लॉक डाऊन उघडत चालले आहे.
माकडांच्या हाती कोलीत द्यावे,
असेसुद्धा घडते आहे !
सरकारी जबाबदारीबरोबर,
सामाजिक जबाबदारी वाढते आहे !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5842
दैनिक पुण्यनगरी
28जून2020
-----------------------------
#कोरोना

गोपीचंद आणि बुक्का

आजची वात्रटिका
----------------------------
गोपीचंद आणि बुक्का
कोरोना अस्सल ओवी झाला,
कोरोना अस्सल शिवी झाला.
तोंडाला लागलेल्या कुलुपाची,
कोरोना मास्टर चावी झाला.
नको तसे तोंड उघडल्याने,
वाचाळतेचा शिक्का लागला !
लावायला गेले गोपीचंद,
पण स्वतः लाच बुक्का लागला !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-5840
दैनिक पुण्यनगरी
26जून2020
-----------------------------
-----------------
#कोरोना

सलाम गुरुजी सलाम

आजची वात्रटिका
------------------------
सलाम गुरुजी सलाम
टेलर होते,सेलर होते,
सह्याजीराव अन स्वयंपाकी होते.
कोरोनाने गुरुजींना काम लावले,
जे जे अद्याप करायचे बाकी होते.
रेशनवाले झाले,पोलिसमित्र झाले,
आरोग्यसेवकाबरोबर
अजून बरेच काय काय झाले.
दारूपासून किराणा दुकानापर्यंत,
गुरुजी डिलिव्हरी बॉय झाले.
चोवीस तास चेक पोस्टवरसुद्धा,
गुरुर्जीचीच नाकाबंदी होती !
गुरुजी खरे कोरोनायोद्धे शोभले,
कोरोना जणू देशसेवेची संधी होती !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-99238472692
---------------------------------------
चिमटा-5839
दैनिक पुण्यनगरी
25जून2020
-----------------------------
-----------------------
#कोरोना

Saturday, June 27, 2020

अफवांचे बळी

आजची वात्रटिका
---------------------------------------
अफवांचे बळी
टोमॅटो खाऊ नका,
अफवांचे पिल्लु सोडू लागले.
रागाने लालबुंद व्हायचे तर,
टोमॅटो भीतीने पांढरे पडू लागले.
विकृत मनोवृत्तीकडून,
ही अफवांची खेळी आहे !
कोरोनाच्या अफवांमध्ये,
निरापराध्यांचा नाहक बळी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5801
दैनिक पुण्यनगरी
18मे2020
--------------------------------------
#कोरोना

आंधळी कोशिंबीर

आजची वात्रटिका
----------------------------
आंधळी कोशिंबीर
आपल्या त्या ओव्व्या असतात,
लोकांच्या त्या शिव्या असतात.
देणारा आणि घेणारांनाही,
या गोष्टी पक्क्या ठाव्या असतात.
जो जास्त स्टंट करू शकतो,
त्याचीच बाजू खरी वाटू लागते !
इतरांकडून झालेली चूकही,
स्टंटबाजीसाठी बरी वाटू लागते !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-5841
दैनिक पुण्यनगरी
27जून2020
-----------------------------
#कोरोना

साथ रोग

आजची वात्रटिका
----------------------------
साथ रोग
टीका-प्रतिटीकेसाठी,
उपमाही सुपर आहेत.
पशू आणि पक्षांनंतर,
रोगांचे वापर आहेत.
सध्या तरी सर्वत्र,
हीच साथ जोरात आहे !
नेत्यांपेक्षाही कार्यकर्ता,
एकदमच भरात आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7326
दैनिक झुंजार नेता
27जून2020
--
#कोरोना

Wednesday, June 24, 2020

जगबुडी आलीच नाही

आठवणीतीलआठवणीतील
वात्रटिका
----------------------------
जगबुडी आलीच नाही
तुम्ही आम्ही जिवंत म्हणजे,
जगबुडी काही आली नाही.
नतद्रष्ट भविष्यवेत्त्यांची,
वाणी काही खरी झाली नाही.
जगाचे आणि तुमचे आमचे,
सर्वांचे आयुष्य चिक्कार असो !
ज्यांनी ज्यांनी अशुभ चिंतले,
त्या सर्वांचा धिक्कार असो !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-99238472692
----------------------------------------
चिमटा-3224
दैनिक पुण्यनगरी
13डिसेंबर2012
-------------------------
#कोरोना
वात्रटिका
----------------------------
जगबुडी आलीच नाही
तुम्ही आम्ही जिवंत म्हणजे,
जगबुडी काही आली नाही.
नतद्रष्ट भविष्यवेत्त्यांची,
वाणी काही खरी झाली नाही.
जगाचे आणि तुमचे आमचे,
सर्वांचे आयुष्य चिक्कार असो !
ज्यांनी ज्यांनी अशुभ चिंतले,
त्या सर्वांचा धिक्कार असो !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-99238472692
----------------------------------------
चिमटा-3224
दैनिक पुण्यनगरी
13डिसेंबर2012
-------------------------
#कोरोना

ड्रीम प्रोजेक्ट

आजची वात्रटिका
----------------------------
ड्रीम प्रोजेक्ट
राखी सावंतचा नवा फंडा,
जगासमोर आला आहे.
सुशांतसिंग राजपूत म्हणे,
तीच्या थेट स्वप्नात गेला आहे.
राखी सावंतच्या पोटी,
सुशांतसिंग पुनर्जन्म घेणार !
हे जर खरे ठरले तर,
अगदी नक्कीच जगबुडी येणार !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7321
दैनिक झुंजार नेता
22जून2020
----------------------------
#कोरोना

कोरोनाचा इतिहास

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाचा इतिहास
कोरोना गेल्यासारखा,
आपला थाटमाट आहे.
तोपर्यंत कोरोनाची,
जगात दुसरी लाट आहे.
उतावळेपणा झाला असेल,
पण आपण बावरलो नाहीत.
दुसरी लाट आली असली तरी,
पहिलीतून सावरलो नाहीत.
घरी राहिलो,सुरक्षित राहिलो,
आपली सुरक्षा सर्वश्रेष्ठ होती !
उद्या इतिहास लिहिला जावा,
भारतातली कोरोनाची लाट
फर्स्ट अँड लास्ट होती !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-99238472692
----------------------------------------
चिमटा-5837
दैनिक पुण्यनगरी
23जून2020
-----------------------------
--------------------------
#कोरोना

उलट्या बोंबा

आजची वात्रटिका
----------------------------
सगळीकडे बोंबाबोंब
जे पाठीशी उभे राहतात,
त्यांच्याकडूनच धोके होतात.
सगळेच विरोधी पक्ष,
शेतकऱ्यांचे पाठीराखे होतात.
विरोधक सत्ताधारी झाले की,
शेतकऱ्यांना टोप्या असतात !
काही करण्यापेक्षा,
फक्त बोंबाच सोप्या असतात !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-99238472692
-------------------------
फेरफटका-7322
दैनिक झुंजार नेता
23जून2020
----------------------------
#कोरोना

कोरोना युग