Tuesday, December 22, 2020

संचार-बंदी

आजची वात्रटिका
------------------------

संचार-बंदी

विरोधकांची तक्रार, सगळीच अंदाधुंदी आहे. भूतं म्हणाली भूतांना, रात्रीची संचारबंदी आहे.

कोरोनाच्या नव्या आवृत्तीचे, संचारबंदीने स्वागत आहे. अख्ख्या जगाची परीक्षा, कोरोना नव्याने बघत आहे.

भूतांबरोबर हडळींचाही, एकच कल्ला आहे ! निशाचरांनी ठराव पास केले, हा स्वातंत्र्यावर हल्ला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 --------------------- चिमटा-6008 दैनिक पुण्यनगरी 22डिसेंबर2020

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...