Thursday, December 10, 2020

लाचखोर जिंदाबाद !

आजची वात्रटिका
-------------------

लाचखोर जिंदाबाद !

जर लाचखोर नसते तर,
किती विचित्र घडले असते?
प्रत्येक सरकारी काम,
नक्की अडून पडले असते.

भलेही प्रामाणिकतेबरोबर,
त्यांचा इमानदारीला फाटा आहे.
प्रशासन गतीमान करण्यात,
त्यांचा लाखमोलाचा वाटा आहे.

भ्रष्टाचारी आणि लाचखोरांचे,
महत्त्व आपण जाणू या !
कोरड्या हातांनी नको,
ओल्या हातांनी आभार मानू या !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------------
फेरफटका-7475
दैनिक झुंजार नेता
10डिसेंबर2020
---------------------------

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...