Sunday, December 13, 2020

शक्कल आणि नक्कल

आजची वात्रटिका
------------------------

शक्कल आणि नक्कल

कुणी इकडून पिल्लू सोडतो आहे, कुणी तिकडून पिल्लू सोडतो आहे. कुणी शकलेवर शक्कल लढवून आपल्या अकलेचे तारे तोडतो आहे .

सगळीच खाजवा-खाजवी, सगळा घायट्यावर घायटा आहे ! ज्याची खाज कधीच थांबत नाही, त्याचेच तर नाव नायटा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5999 दैनिक पुण्यनगरी 13डिसेंबर2020

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...