आजची वात्रटिका
------------------------
आपले 'प्राणी' जीवन
एक एक प्रकार बघा,
किती नव-नवा होत आहे.
जंगलातले शहरात येताच,
त्याचा गव-गवा होत आहे.
शहरातले जंगलात गेले,
तरीही जंगल शांत आहे.
जंगलातल्या सहनशीतेचा,
आता मात्र नक्की अंत आहे.
शहरातले जसे वागले तसे,
जंगलातल्यांना वागू द्या !
शेवटी एक सत्य जाणा,
जगा आणि जगू द्या !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5996
दैनिक पुण्यनगरी
10डिसेंबर2020
----------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा. माझ्या दैनिक पुण्यनगरीतील 'चिमटा' आणि दैनिक झुंजार नेता तील 'फेरफटका' या सदरातील आणि दैनिक वात्रटिका तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील सतरा हजारांपैकी, सहा हजारांहून जास्त वात्रटिका वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !! https://suryakantdolase.blogspot.com---------------------------
No comments:
Post a Comment