Monday, June 1, 2026

उपोषणास्त्र ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
उपोषणास्त्र
उपोषणामागे उपोषण,
उपोषणांची लाट आहे.
उपोषणाला उपोषणाचा,
दरवेळीच नाट आहे.
उपोषणाचे गांभीर्य,
उपोषणामुळे हरवते आहे.
उपोषणांचा धडा,
उपोषणच गिरवते आहे.
उपोषणांचे रामबाण अस्र,
प्रत्येकाच्याच भात्यात आहे!
आमरण हा शब्द,
उपोषणामुळे गोत्यात आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका- 9294
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
1 जून 2026

 

उपोषणास्त्र ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- उपोषणास्त्र उपोषणामागे उपोषण, उपोषणांची लाट आहे. उपोषणाला उपोषणाचा, दरवेळीच नाट आहे. उपोषणाचे गांभ...