Showing posts with label खोके आणि धोके. Show all posts
Showing posts with label खोके आणि धोके. Show all posts

Thursday, June 18, 2026

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका



आजची वात्रटिका 
--------------------

खोके आणि धोके 

खोक्या आणि धोक्याच्या जीवावर,
राजकीय पक्षांची वाटणी आहे. 
खोक्या आणि धोक्याच्या मदतीने, 
राजकीय पक्षांची छाटणी आहे. 

खोक्या आणि धोक्याची भूल देत,
राजकीय ऑपरेशन ओके आहेत.
बिन टाक्याचे नाव जरी, 
सलणारे ऑपरेशनचे टाके आहेत.

खोक्याचे आणि धोक्याचे,
मोठे मायावी असे नाते आहे !
म्हणूनच डोळे मिटून  मांजर, 
पुन्हा पुन्हा दूध बिनधास्त पिते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9311
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
18 जून  2026

दैनिक वात्रटिका l 30सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 59 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...