Monday, September 14, 2026

जागतिक सत्य....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
----------------------------
जागतिक सत्य
लोकल पासून ग्लोबल पर्यंत,
पुरस्कारांना काही कमी नाही.
सगळे पुरस्कार खरे असतात,
जगात कुणालाच हमी नाही.
जसे पुरस्कार वाटले जातात,
तसे पुरस्कार लाटले जातात.
पुरस्कारांची किंमत मोजून,
सरळ पुरस्कार लुटले जातात.
सत्ता आणि संपत्तीने,
पुरस्कार बाधलेले असतात !
देणाऱ्यांनी आणि घेणाऱ्यांनी,
आपले स्वार्थ साधलेले असतात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9398
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
14 सप्टेंबर 2026

No comments:

अडथळ्यांची शर्यत....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- अडथळ्यांची शर्यत अशी कुणाचीच भावना नसते, समाजात नवीन काही होऊ नये. काही चांगले वाईट झाले तरी, आप...