Sunday, September 29, 2019

मुका मार


वेडी आशा

आजची वात्रटिका
-------------------------------------
वेडी आशा
घ्यावे लागते,द्यावे लागते,
खावे लागते,प्यावे लागते.
कार्यकर्त्यांच्या अडचणींना
समजून घ्यावे लागते.
त म्हटले की, ताकभात,
अशी इलेक्षणची भाषा आहे !
खा आणि खाऊ द्या,
कार्यकर्त्यांची वेडी आशा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5583
दैनिक पुण्यनगरी
29सप्टेंबर2019

Thursday, September 26, 2019

हाऊज दॅट?

आजची वात्रटिका
-------------------------------------
हाऊज दॅट?
परंपरेप्रमाणे इम्रानखान
युद्धाची गरळ ओकतो आहे.
तिकडे फुलटॉस तर,
इकडे बाऊन्सर टाकतो आहे.
काल कुणाची बॅटींग होती,
आज इम्रानची बॉलिंग आहे !
ज्याचे शेपूट वाकडे,
त्याची विनाशाला कॉलिंग आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5580
दैनिक पुण्यनगरी
26सप्टेंबर2019
---------------------------------------

Wednesday, September 25, 2019

डबल सीट

आजची वात्रटिका
-------------------------------------
डबल सीट
काही गोष्टी खोट्या वाटतात,
पण त्या खऱ्या आहेत.
एका एका नेत्याला,
दोन-दोन उमेदवाऱ्या आहेत.
जेवढे हे अनपेक्षित,
तेवढेच हे अनघटित आहे !
अविश्वासू नक्की बोलतील,
काहीच्या बाही छाटीत आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7076
दैनिक झुंजार नेता
24सप्टेंबर2019
---------------------------------------

चौकशीचे पिल्लू

आजची वात्रटिका
-------------------------------------
चौकशीचे पिल्लू
सगळे डाव कसे,
खूपच आखीव असतात.
योग्य संधीची वाट बघत,
चौकश्याही राखीव असतात.
ईडा पिडा टळो म्हणीत,
मानसिकरित्या पिडले जाते !
जास्तच फडफड केली की,
चौकशीचे पिल्लू सोडले जाते !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5579
दैनिक पुण्यनगरी
25सप्टेंबर2019

Tuesday, September 24, 2019

घोषणा युद्धआजच्या वात्रटिका
-------------------------------------
घोषणा युद्ध
आपला नेता अंगार असतो,
बाकीच्यांचा भंगार असतो.
आपला नेता तरुण तुर्क,
बाकीच्यांचा डंगार असतो.
कार्यकर्ते कुणाचेही असोत,
घोषणा सारख्याला वारख्या असतात !
आपल्या निष्ठादर्शनासाठी,
इतरांच्या फिरक्या असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7075
दैनिक झुंजार नेता
24सप्टेंबर2019
--------------------
नमस्कार..........
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------

रिसायकल

आजची वात्रटिका
-------------------------------------
रिसायकल
पूर्वी जे जे उभे होते,
आज उभे तेच सगळे आहेत.
जसे पक्ष वेगळे होते,
तसे त्यांचे चिन्ह वेगळे आहेत.
कुणासाठी चिन्ह चांगले,
कुणासाठी चिन्ह वाईट आहे !
कुणी झाला पंक्चर,
कुणी झाला बस्ट
कुणाची हवाच टाईट आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5578
दैनिक पुण्यनगरी
24सप्टेंबर2019
---------------------------------------------------
नमस्कार..........
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
https://suryakantdolase.blogspot.in

Monday, September 23, 2019

भरपाई


दुर्दैवी हालहवाल

आजची वात्रटिका
-------------------------------------
दुर्दैवी हालहवाल
कालपर्यंत फक्त नेते पळवायचे,
आता तर उमेदवार पळवू लागले.
इज्जतीलाच हात घालीत,
प्रतिस्पर्ध्याला खेळवू लागले.
राजकीय पक्षांच्या इज्जतीवर,
निवडणुकीत मोठा सवाल आहे !
अपहरणाबरोबर वस्त्रहरणही,
असा दुर्दैवी हाल-हवाल आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5577
दैनिक पुण्यनगरी
23सप्टेंबर2019

Sunday, September 22, 2019

आचारसंहिता चालू आहे


भाऊराव ते खाऊरावआ।ठ।व।णी।ती।ल
वा।त्र।टि।का
--------------------------------
भाऊराव ते खाऊराव
भाऊरावांचा महाराष्ट्र
खाऊरावांचा झाला आहे.
याचाच तर पडताळा
पटपडताळणीत आला आहे.
आम्हाला काय कुणाची भीती?
शिक्षणसम्राटांचा तोरा आहे!
शिकवा आणि कमवा
संस्थाचालकांचा नारा आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-923847269
----------------------------------------
चिमटा-2738
दैनिक पुण्यनगरी
24ऑक्टोबर2011
--------------------------
नमस्कार..........
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील पाच हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजचीवात्रटिका

निवडणूक संकेत

आजची वात्रटिका
-------------------------------------
निवडणूक संकेत
निवडणूक लागलेली,
तेंव्हा आले खोपडीत माझ्या.
पंगतीला एकजात सारे नेते,
जेंव्हा आले झोपडीत माझ्या.
कार्यकर्ते ढाब्या-ढाब्यावर,
नेते आले झोपडीत माझ्या.
चपटी आणि बोटीचे हिशोब,
कशास लिहू चोपडीत माझ्या ?
बेशुद्धास शुद्ध यावी एवढे,
सामर्थ्य कुठे झापडीत माझ्या?
वेड्यांनी सजवले सोंग,
आले आले सारे खोपडीत माझ्या !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5576
दैनिक पुण्यनगरी
22सप्टेंबर2019
---------------------------------------------------

Saturday, September 21, 2019

घोळात घोळआजची वात्रटिका
-------------------------------------
घोळात घोळ
कधी कधी मुद्दामच
चर्चेत वेळ घातला जातो.
डावपेचांचा भाग म्हणून,
मुद्दामच घोळ घातला जातो.
त्यांच्यासाठी डावपेच,
इतरांसाठी घोळात घोळ असतो !
जेवढे वातावरण तंग वाटते,
तेवढाच तिथे झोळ असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7072
दैनिक झुंजार नेता
21सप्टेंबर2019
----------------------------------------

Friday, September 20, 2019

मंदीची चर्चा

आजची वात्रटिका
-------------------------------------
मंदीची चर्चा
आर्थिक मंदीच्या संकटात
कुणीच वाली नाही.
निवडणूक मोसम सांगतो,
आर्थिक मंदी आली नाही.
इकडे आर्थिक मंदी,
तिकडे आर्थिक चंदी आहे !
ज्याचा त्याचा एकच नारा,
साधून घ्या,हीच संधी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5575
दैनिक पुण्यनगरी
21सप्टेंबर2019

आमदार झाल्यासारखं वाटतंय

आमदार झाल्यासारखं वाटतंय

कुणाकुणाच्या राजकीय स्वप्नांना
जरा जास्तच पंख फुटू लागले.
पक्षश्रेष्ठींनी आपल्याकडे बघताच,
आमदार झाल्यासारखे वाटू लागले.
पक्षश्रेष्ठींकडे बघत बघत,
सर्वांच्या ओठी हेच गाणे आहे !
लांडग्यांच्या पथ्यावरती,
सर्वच शेळ्यांनी हुरळून जाणे आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7071
दैनिक झुंजार नेता
20सप्टेंबर2019


नाशिकचा गौप्यस्फोट


Thursday, September 19, 2019

नो गॅरंटीआजची वात्रटिका
----------------------------------------
नो गॅरंटी
जसा आऊटगोईंगवाला दुःखी आहे,
तसा इनकमिंगवालाही दुःखी आहे.
गेलेला आणि आलेलाही,
सांगा कुठे खात्रीपूर्वक सुखी आहे?
गेलेला असो वा आलेला,
कुणाचे भविष्य सुरक्षित नाही !
जशी काल काही आरक्षित नव्हते,
तसे आजही काही आरक्षित नाही !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7070
दैनिक झुंजार नेता
19सप्टेंबर2019
---------------------------------------

वास्तवआजची वात्रटिका
----------------------------------------
वास्तव
कुठे कोंबाकोंबी आहे,
कुठे झोंबाझोंबी आहे.
हाऊस फुल्ल झाले तरी,
अजूनही लोंबलोंबी आहे.
पटत नसले तरी,
वास्तव मात्र झोंबणार आहे !
इधरका ना उधरका,
कुणी मध्येच लोंबणार आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5573
दैनिक पुण्यनगरी
19सप्टेंबर2019

Wednesday, September 18, 2019

खटके आणि झटके


बुजगावण्यांची डेअरींग


चढ-उतार

आजची वात्रटिका
----------------------------------------
चढ-उतार
टोमॅटोच्या वाट्याला
सध्या आर्थिक मंदी आहे.
कांद्याच्या नशिबात मात्र,
सध्या तरी चांदी आहे.
घसरला टॉमॅटो,
चिंतीत मात्र कांदा आहे !
टोमॅटोच्या चटणीचा,
युतीशिवाय वांधा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7068
दैनिक झुंजार नेता
17सप्टेंबर2019
---------------------------------------
। क । वि । ता ।
---------------------------------------
माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी
क्लिक करा
surykanti.blogspot.com
------------------------------------------
नमस्कार..........
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजार वात्रटिकापैकी
पाच हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
https://suryakantdolase.blogspot.in

Monday, September 16, 2019

पक्षांतराचे साईड इफेक्ट

आजची वात्रटिका
----------------------------------------
पक्षांतराचे साईड इफेक्ट
नेत्यांच्या पक्षांतराचे परिणाम
आता पितृपक्षातही होऊ लागले.
आजकाल कोणतेही कावळे,
कुणाच्याही पिंडाला शिवू लागले.
नव्या उकांड्यांची शोधाशोध,
हा तर कावळ्यांचा पिंड आहे !
केवळ उकांडा बदलला तरी,
त्यांना वाटते आपले बंड आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5571
दैनिक पुण्यनगरी
17सप्टेंबर2019

देख तमाशा देख

आजची वात्रटिका-
----------------------------------------
देख तमाशा देख
आज ज्यांची टिंगलटवाळी,
उद्या तेच आवडले जातील.
त्यांच्याशिवाय आहेच कोण?
उद्या तेच निवडले जातील.
लोकशाहीच्या तमाशाची कारणे,
अगदी समजण्याजोगे आहेत !
जेवढे नव नवे तमाशे आहेत,
तेवढे नव नवे बघे आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7067
दैनिक झुंजार नेता
16सप्टेंबर2019

दुसरी बाजू

आजची वात्रटिका
----------------------------------------
दुसरी बाजू
बघा काल कुठे होते?
आणि आज कुठे आहेत?
कुणी म्हणाले, डेअरींगबाज;
कुणी म्हणाले,पळकुटे आहेत.
कुणाचे काय चाललेय?
सध्या तरी कुणाला कळत नाही !
पक्षांतराचं समीकरण,
दोन बाजूशिवाय जुळत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5570
दैनिक पुण्यनगरी

Sunday, September 15, 2019

खुले परवाना पत्र

खुले परवाना पत्र
------------------------
मा. सर्व संपादक
दिवाळी अंक 2019
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
हे खुले परवाना पत्र
देण्यास कारण की,
आपण सर्व जण दिवाळी अंक 2019च्या कामात आहात.
मला माझ्या वात्रटिका मागणी साठी अनेक संपादक मित्रांचे फोन येत आहेत.मानधनाच्या अपेक्षेसह विचारणा होत आहे.
या साठी सर्वांचे प्रथम आभार.
त्यानुसार दरवर्षी प्रमाणे
मी आज आपण सर्वांना अर्थात ज्यांना वात्रटिका छापायच्या आहेत त्यांच्यासाठी नम्र खुलासा असा की, आपल्याला आवड़तील त्या अणि आवड़तील तेवढया वात्रटिका आपण विना मानधन छापू शकता.
मात्र काही माफक अटी-
1) पानपुरक म्हणून वात्रटिका
अजिबातच छापू नयेत.
2)स्वतंत्र जागा आणि वेटेज द्यावे.
3) वात्रटिका त अजिबात बदल करू नयेत.
4)आहे त्या डिझाइनसह छापल्या गेल्या तर उत्तमच
5)ह्या वात्रटिका मागणीसाठी कृपया मला फोन करू नयेत.
6) ह्या वात्रटिका whats app,facebook,twiter,hike,ebooks,epaper,दैनिक झुंजार नेता,दैनिक पुण्यनगरी
आणि
ब्लॉग्ज व इतर मार्गांनी जिथून उपलब्ध होतील तिथून घ्या,मात्र तसा साभार म्हणून उल्लेख करा.
7) माझ्या वात्रटिकांचा खजिना हवा असेल तर क्लिक करा
8)आपल्याला शक्य असेल तर दिवाळी अंकाची एक प्रत मला पोस्ट किंवा कुरियर ने पाठवा.
माझा पत्ता-
सूर्यकांत डोळसे
मु.पो.ता.पाटोदा
जि. बीड
पिन-414204
मोबा.9923847269
कळावे,
आपला स्नेहांकित
सूर्यकांत डोळसे

चेकमेट

आजची वात्रटिका
----------------------------------------
चेकमेट
हत्ती आणि उंटासोबत,
आपोआपच प्याद्या गेल्या.
राजे गेले,महाराजे गेले,
आश्रयाला त्यांच्या गाद्या गेल्या
एकाच राजकीय माळेत,
आज सगळेच मणी आहेत !
ज्यांना कळते पण वळत नाही,
असेच आज ज्ञानी आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7066
दैनिक झुंजार नेता
15सप्टेंबर2019

दुश्चिन्ह

आजची वात्रटिका
----------------------------------------
दुश्चिन्ह
काल वेगळे चिन्ह होते,
आज वेगळे चिन्ह आहे.
बाकी फरक काहीच नाही,
म्हणूनच डोके सुन्न आहे.
जसे सारेच संधीसाधू,
तसे खूप परिस्थितीजन्य आहे !
ज्यांनी नाकाला गुंडाळली,
त्यांची खरोखरच धन्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5569
दैनिक पुण्यनगरी
14सप्टेंबर2019

Saturday, September 14, 2019

दुश्मन ना करे.....

आजची वात्रटिका
----------------------------------------
दुश्मन ना करे.....
नेते गेले,कार्यकर्ते गेले,
बघा अजून काय काय रे गेले?
आपले गेले,परके गेले,
सग्याबरोबर सोयरे गेले.
काल काय शान होती,
बघा आज काय अवस्था आहे !
आपल्या आपल्या सोयीने,
आपली आपली व्यवस्था आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5568
दैनिक पुण्यनगरी
14सप्टेंबर2019

Thursday, September 12, 2019

हास्यपुराण

आजची वात्रटिका
----------------------------------------
हास्यपुराण
गणपतीच्या डोक्यातला प्रकाश
उंदराच्या डोक्यात घुसला नाही.
चांद्रयान2 मोहिमेकडे बघून
गणपती मुळीच हसला नाही.
त्यामुळेच गणपतीकडे उंदीर,
मोठ्या नवलाने बघतो आहे !
एकदाच हसल्याचा परिणाम,
गणपती दर चतुर्थीला भोगतो आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7065
दैनिक झुंजार नेता
12सप्टेंबर2019

सुटकेचा निःश्वास

आजची वात्रटिका
----------------------------------------
सुटकेचा निःश्वास
यंदा दहा दिवस गणपती
भलतेच टेन्शनमध्ये बसले होते.
विघ्नाची वार्ता येईल म्हणून
रोखण्याच्या पवित्र्यात
सुखकर्ता दुःखहर्ता दिसले होते.
गणपतीचा चिंताग्रस्त चेहरा,
उंदराने नजर अंदाज केला नाही !
गणराया म्हणाले उंदराला,
बरे झाले,तूही भाजपात गेला नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5567
दैनिक पुण्यनगरी
12सप्टेंबर2019

Wednesday, September 11, 2019

वाटाघाटीआजची वात्रटिका
--------------------------------------
'वाटा'घाटी
कुणी जुटू लागले,
कुणी फुटू लागले.
नको त्या बाता मारीत,
कुणी नटू लागले.
जशी जुटाजुटी आहे,
फुटाफुटी आहे,
तशीच नटा-नटी आहे !
राजकारणाचे नावच
वाटाघाटी एके वाटाघाटी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7064
दैनिक झुंजार नेता
11सप्टेंबर2019

मतदारांची अंधश्रद्धाआजची वात्रटिका
----------------------------------------
मतदारांची अंधश्रद्धा
दगडापेक्षा वीट मऊ,
हा अविचार रूढ होत आहे.
नसता मतदान वाया जाईल,
ही अंधश्रध्दा दृढ होत आहे.
लोकशाहीवर श्रद्धा हवी,
लोकशाहीवर अंधश्रद्धा नको आहे !
लोकशाहीवरती आंधळी भक्ती,
'नोटा'पुढे चुकूनसुद्धा नको आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5566
दैनिक पुण्यनगरी
11सप्टेंबर2019
------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
-----------------------------------------
साप्ताहिक सूर्यकांती
वात्रटिकांचा नजराणा
वात्रटिका विषयी सर्व काही...
एकाच वेळी एकाच ठिकाणी ...!
वात्रटिका नव्याने समजून घेण्यासाठी....
वात्रटिका विषयी गैरसमज दूर
होण्यासाठी....
वात्रटिका नव्याने लिहिणाऱ्यांसाठी ...
खास मराठी वात्रटिकांसाठी
वाहिलेले मराठीतील.....
पहिले आणि एकमेव ऑनलाईन
साप्ताहिक....
साप्ताहिक सूर्यकांती
https://weeklysuryakanti.blogspot.com/
संपादक-सूर्यकांत डोळसे

Tuesday, September 10, 2019

पोटोबा प्रसन्न

आजची वात्रटिका
----------------------------------------
पोटोबा प्रसन्न
गुत्तेदार झाले कार्यकर्ते,
कार्यकर्तेच गुत्तेदार आहेत,
धंदेवाईक राजकारणाचे,
एवढेच काय ते सार आहेत.
आधी पोटोबा,मगही पोटोबा,
हेच राजकीय पथ्य आहे !
जगा आणि जगू द्या,
हेच राजकीय सत्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7063
दैनिक झुंजार नेता
10सप्टेंबर2019

कॉमन अजेंडा

आजची वात्रटिका
----------------------------------------
कॉमन अजेंडा
पक्षासाठी कार्यकर्ते,
मन मारून खपले जातात.
कार्यकर्त्यांची आवक-जावक,
नेते मात्र माथी थापले जातात.
नेत्यांची ही थापालॉजी,
सर्वच पक्षात चालू असते !
कार्यकर्त्यांनी आपली निष्ठा,
उठता बसता तोलू नसते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5565
दैनिक पुण्यनगरी
10सप्टेंबर2019

Monday, September 9, 2019

सूचक प्रश्न

आजची वात्रटिका
----------------------------------------
सूचक प्रश्न
कुणाच्या आलटी-पलटी,
कुणा-कुणाचा गोता आहे?
कोण कुणाचा कार्यकर्ता?
कोण कुणाचा नेता आहे?
प्रश्न आपल्याला पडतात,
त्यांची उत्तरे पाठ असतात ?
त्यांचे काही खरे नसते,
ज्यांचे राजकीय थाट असतात !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7062
दैनिक झुंजार नेता
9सप्टेंबर2019
------------------------------------

कोंबडीचोर

आजची वात्रटिका
----------------------------------------
कोंबडीचोर
अंडी-पिल्ली निघतील म्हणून,
ज्याच्या त्याच्या जीवाला घोर आहेत.
कडकनाथ कोंबडा ओरडला,
सगळीकडेच कोंबडीचोर आहेत.
आत आणि बाहेरसुद्धा,
सगळीकडेच काळेबेरे वाटते आहे !
दोस्त दोस्त ना रहा.....
एवढेच काय ते खरे वाटते आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5564
दैनिक पुण्यनगरी
9सप्टेंबर2019

Sunday, September 8, 2019

मगरमिठी

आजची वात्रटिका
----------------------------------------
मगरमिठी
तुमच्या अपयशाचे
कुणीही भांडवल करू शकते.
तुमचे सांत्वन करण्यासाठी,
कुणी मिठी मारू शकते.
सांत्वनासाठी मारलेली मिठी,
ही मगरमिठी ठरू शकते !
तुमच्या डोळ्यातल्या पाणी,
मोठी आणिबाणी ठरू शकते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7061
दैनिक झुंजार नेता
8सप्टेंबर2019
---------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
-----------------------------------------
साप्ताहिक सूर्यकांती
वात्रटिकांचा नजराणा
वात्रटिका विषयी सर्व काही...
एकाच वेळी एकाच ठिकाणी ...!
वात्रटिका नव्याने समजून घेण्यासाठी....
वात्रटिका विषयी गैरसमज दूर
होण्यासाठी....
वात्रटिका नव्याने लिहिणाऱ्यांसाठी ...
खास मराठी वात्रटिकांसाठी
वाहिलेले मराठीतील.....
पहिले आणि एकमेव ऑनलाईन
साप्ताहिक....
साप्ताहिक सूर्यकांती
https://weeklysuryakanti.blogspot.com/

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...