Thursday, September 5, 2019

शिक्षक आदर्श

आजची वात्रटिका
----------------------------------------
शिक्षक आदर्श
गुरू साक्षात परब्रम्ह,
अशी शिक्षकांची ख्याती आहे.
शिक्षक आणि शिक्षणाचाही दर्जा,
शिक्षकांच्याच हाती आहे.
शिक्षकांनी कृतीतून दाखवावे,
आदर्श शिक्षक कसा पाहिजे?
विद्यार्थी कसाही असो,
त्याच्यावर आपला ठसा पाहिजे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5560
दैनिक पुण्यनगरी
5सप्टेंबर2019

No comments:

निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...