Monday, September 2, 2019

राजकीय नातीगोती

आजची वात्रटिका
------------------------------------------
राजकीय नातीगोती
मामा मामा उरला नाही,
भाच्चा भाच्चा उरला नाही.
पुतण्या सांगे काकाला,
कुणीच सच्चा उरला नाही.
दुरावले मेव्हणा-मेहुणी,
दुरावलेले साडू आहेत.
मावळे झाले बावळे,
तेच राजकीय भिडू आहेत.
रक्ताच्या नात्यागोत्यात
राजकारणाची मेख आहे !
सध्या तरी जिकडे बाप आहे,
तिकडेच लेक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-7055
दैनिक झुंजार नेता
2सप्टेंबर2019
----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
-----------------------------------------
साप्ताहिक सूर्यकांती
वात्रटिका विषयी सर्व काही...
एकाच वेळी एकाच ठिकाणी ...!
वात्रटिका नव्याने समजून घेण्यासाठी....
वात्रटिका विषयी गैरसमज दूर
होण्यासाठी....
वात्रटिका नव्याने लिहिणाऱ्यांसाठी ...
खास मराठी वात्रटिकांसाठी
वाहिलेले मराठीतील.....
पहिले आणि एकमेव ऑनलाईन
साप्ताहिक....
साप्ताहिक सूर्यकांती
https://weeklysuryakanti.blogspot.com/
संपादक-सूर्यकांत डोळसे

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...