Tuesday, March 17, 2026

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
-----------------------------
गोबेल्स नीती
जेवढा गंदा,तेवढाच अंधा,
असा युद्धाचा धंदा आहे.
दावे प्रतिदावे होऊ लागले,
कोण मेला?कोण जिंदा आहे?
गोबेल्स नीती हीच,
युद्धाची खरी ऊर्जा आहे !
वावड्या आणि अफवांनाच,
अधिकृत बातम्यांचा दर्जा आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 107
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
17मार्च 2026

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...