Saturday, March 21, 2026

पुरोगामीत्वाचे वास्तव.......,आजची वात्रटिका, दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
-----------------------------
पुरोगामीत्वाचे वास्तव
महाराष्ट्राचे पुरोगामीत्व,
महाराष्ट्राची कसोटी बघते आहे.
महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वावर,
पुन्हा पुन्हा प्रश्नचिन्ह लागते आहे.
अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचा,
पुरोगामीत्वावर विस्तव आहे!
असून अडचण;नसून खोळंबा,
पुरोगामीत्वाचे खरे वास्तव आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 110
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
21मार्च 2026

 

No comments:

कठपुतळ्या....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- कठपुतळ्या ज्या शिकल्या सवरलेल्या नाहीत, देव्या त्यांच्या अंगात आहेत. शिकल्या सवरलेल्यांचे नखरे, ...