Friday, March 20, 2026

दंभ स्फोट ..आजची वात्रटिका...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
-----------------------------
दंभ स्फोट
कोण चूक कोण बरोबर?
आपल्यासमोर प्रश्न उभा आहेत,
याचे नेमके उत्तर सांगायचे तर,
जसे भक्त तसे बाबा आहेत.
एकदा ऊस गोड लागला की,
तो मुळासकट खाल्ला जातो !
भोंदू भक्तांकडून मग,
बाबांच्या नावाने कल्ला होतो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 109
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
20मार्च 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...