Thursday, March 12, 2026

चुलीवरचा ट्रेंड.....आजची वात्रटिका ....दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
----------------------------
चुलीवरचा ट्रेंड
गॅसवरचे की चुलीवरचे?
अव्यवहार्य अशी तुलना आहे.
चुलीवरच्या जुन्या ट्रेंडला,
युद्धामुळे पुन्हा चालना आहे.
कुणीच नाकारू शकत नाही,
घरोघरी मातीच्या चुली आहेत !
गॅसच्या कृत्रिम टंचाईमध्ये,
चुलीच आपल्या वाली आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 102
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
12 मार्च 2026

 

No comments:

नामांतराची टूम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- नामांतराची टूम कुठे नामविस्ताराचा तोडगा, कुठे नामांतराचे खुसपट आहे. ज्याचे दिले गेले नाव, त्याची हकनाक घ...