Wednesday, March 11, 2026

साठेबाजी...आजची वात्रटिका ....दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
----------------------------
साठेबाजी
युद्धाचे वाढते ढग बघून,
साठेबाज आनंदाने नाचू लागले.
कृत्रिम टंचाईचे पाढे,
बाजारा - बाजारात वाचू लागले.
दुष्काळात तेरावा आल्याने,
सामान्य नागरिक मात्र बेजार आहे !
संधीचे सोने करण्यासाठी,
साठेबाजाकडून उठवलेला बाजार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 101
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
11 मार्च 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...