Saturday, March 14, 2026

युद्ध प्रसंग... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका


साप्ताहिक
वात्रटिका 
--------------------------------

युद्ध प्रसंग

असंगाशी संग आहे,
त्यामुळेच वातावरण तंग आहे.
संपूर्ण जगावर ओढावलेला , 
बाका असा युद्ध प्रसंग आहे. 

खेळणारे खेळत आहेत, 
लोळणारेही लोळत आहेत.
ज्यांचा प्रत्यक्ष संबंध नाही, 
तेसुद्धा युद्धामुळे पोळत आहेत.

युद्ध नको बुद्ध हवा म्हणताना,
तिसऱ्या महायुद्धाचीही शंका आहे !
युद्ध कुणालाच पचणारे नसते,
गॅस ट्रबलचा पहिला दणका आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
वात्रटिका - 78
वर्ष- दुसरे 
14 मार्च 2026

No comments:

सक्ती आणि भक्ती ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ सक्ती आणि भक्ती प्रत्येक भाषा वाढली पाहिजे, प्रत्येक भाषा टिकली पाहिजे. जिथे राहायचे,जिथले खाय...