Monday, March 23, 2026

घुसमट ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
घुसमट
राजकारणाला अध्यात्माची,
अध्यात्माला राजकारणाची खाज आहे.
दोन्हीकडेही ओसंडून वाहतो,
तो तर निव्वळ सत्तेचा माज आहे.
कुणाकडे आध्यात्मिक सत्ता,
कुणाकडे राजकीय सत्ता आहे.
दोघांना वेगळे करायचे कसे?
दोघांचाही मोठा जांगडगुत्ता आहे.
परस्परांच्या सहकार्यामुळे,
दोघांचेही समाजामध्ये वट आहेत !
खुर्ची सम्राटांच्या विळख्यामध्ये,
घुसमटलेले मंदिरं आणि मठ आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9225
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
23मार्च 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...