Sunday, March 15, 2026

झुकेगा नही साला.....?...आजची वात्रटिका दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
----------------------------
झुकेगा नही साला.....?
पुष्पा चित्रपटाच्या डायलॉगचा,
बघा किती विरोधाभास झाला.
कचाकचा वाकणारेच म्हणतात,
झुकेगा नही साला.....
ऐकायला आणि बोलायला चांगली,
तिचेच नाव डायलॉगबाजी आहे !
भुकेला राजकीय कोल्हा तर,
इथे कधीही कशालाही राजी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 104
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
15 मार्च 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...