Friday, March 13, 2026

राजकारण रंगले युद्धात....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
राजकारण रंगले युद्धात
विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर,
आरोपांचा मोर्चावर मोर्चा आहे.
हल्ल्यावर हल्ले करताना,
फक्त युद्धाचीच चर्चा आहे.
राजकारण रंगले युद्धात,
अशीच काहीशी तऱ्हा आहे.
राष्ट्रीय मुद्द्यांचे काय?
सवाल न विचारलेलाच बरा आहे.
राष्ट्रीय राजकारणावरती,
आंतरराष्ट्रीय राजकारणाची छाप आहे !
युद्ध कुठलेही आणि कुणाचेही असो,
युद्ध जगासाठी फक्त शाप आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9215
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
13 मार्च 2026

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...