आजची वात्रटिका
----------------------------
कळपाचा विजय असो !
एकदा मेंदू गहाण ठेवला गेला की,
मग विचार करायचेच राहिले जाते.
विषय कोणताही असला तरी,
जाती धर्माच्या नजरेतून पाहिले जाते.
एकदा जाती-धर्माचा चष्मा लागला की,
त्याच्या पलीकडचे काही दिसत नाही.
एकदा मेंढराची भूमिका घेतली की,
तिथे स्वतंत्र विचार काही असत नाही.
जो आपला कळप निर्णय घेईल,
त्यालाच निमुटपणे होय म्हणावे लागते !
कळप ज्याचा जयजयकार म्हणील,
त्याचेच निमुटपणे जय म्हणावे लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9207
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
5मार्च 2026

No comments:
Post a Comment