Tuesday, March 3, 2026

राजकीय शिमगा.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
राजकीय शिमगा
राजकीय शिमग्यामुळेच,
लोकांना बोंबा माराव्या लागतात.
आपल्या स्वप्नांच्या होळ्या,
डोळ्यादेखत कराव्या लागतात.
राजकीय घोषणांच्या सोबतीला,
सर्वांचेच राजकीय दंभ आहे!
सत्तेवरती कुणी असले तरी,
सगळ्यांची सारखीच बोंब आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 96
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
3 मार्च 2026

 

No comments:

नामांतराची टूम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- नामांतराची टूम कुठे नामविस्ताराचा तोडगा, कुठे नामांतराचे खुसपट आहे. ज्याचे दिले गेले नाव, त्याची हकनाक घ...