Thursday, March 12, 2026

कृत्रिम टंचाई.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
कृत्रिम टंचाई
जिकडे बघावे तिकडे,
तुटवडा एके तुटवडा आहे.
सगळेच हातचे राखून,
सोयीनुसार बटवडा आहे.
कृत्रिम टंचाई केली की,
मागणीमध्ये वाढ होते.
महागाई नावाची चेटकीण,
आणखीनच द्वाड होते.
सामान्य जनतेवरती,
महागाईचा भुर्दंड पडला जातो !
कृत्रिम टंचाईच्या जीवावरच,
काळाबाजार वाढला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9214
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
12 मार्च 2026
--------------------------

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...