आजची वात्रटिका
-----------------------------
ज्वलंत विषय
सिलेंडर म्हणाले सिलेंडरला,
आपल्या नावाने मार्केट जाम झाले.
साठेबाजूंच्या सौजन्याने,
आपले नाव फुकट बदनाम झाले.
गॅसवरचे चुलीवर आले,
वितरण व्यवस्था नागड्या आहेत.
आपले अच्छे दिन आल्याचे बघून,
आनंदीत इंडक्शन शेगड्या आहेत.
ट्रम्प तात्याचे आडमुठे धोरण,
सगळ्या जगालाच नडले जाईल !
रॉकेल म्हणाले स्टोव्हला,
आपल्यालाही बाहेर काढले जाईल !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9231
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
29मार्च 2026

No comments:
Post a Comment