Friday, March 13, 2026

पॉलिटिकल स्टॉक....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
पॉलिटिकल स्टॉक
तिकडे रंगलेले युद्ध,
इकडे राजकारण रंगले आहे.
राजकारणासाठी नवा विषय,
एवढे मात्र चांगले आहे.
महागाईने आवळला फास,
महागलेला आटा आहे !
तेलाबरोबर गॅस सिलेंडरचाही,
राजकारणासाठी नवा साठा आहे!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 103
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
13 मार्च 2026

 

No comments:

नामांतराची टूम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- नामांतराची टूम कुठे नामविस्ताराचा तोडगा, कुठे नामांतराचे खुसपट आहे. ज्याचे दिले गेले नाव, त्याची हकनाक घ...