Monday, March 16, 2026

गॉड प्लॅन .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
गॉड प्लॅन
टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्याचा,
आनंद नकली की असली आहे?
टीम इंडिया जिंकली असली तरी,
सांघिक भावना कुठे दिसली आहे ?
कुणाकडे केला कानाडोळा,
कुणाकुणाचा तर विसर आहे.
वर्ल्ड कप विजयाच्या नशेमध्ये,
आतले चित्र धुसर धुसर आहे.
सगळे प्रकरण गंभीर असूनही,
सगळे गुडी गुडी आणि छान आहे !
शेवट गोड तर सगळेच गोड,
म्हणून तर सगळा गॉड प्लॅन आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9218
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
16 मार्च 2026

 

No comments:

राजकीय किडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- राजकीय किडा टोकरत राहतो;पोखरत राहतो, असा राजकीय किडा असतो. कधी अंतर्गत, कधी बाहेर, त्याचा राडा एके...