Friday, March 6, 2026

विरोधाभासाचे धक्के...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
विरोधाभासाचे धक्के
असंगाशीच संग आहे,
जो तो सत्तेसाठी दंग आहे.
आजचे राजकारण म्हणजे,
बीभत्स राजकीय व्यंग आहे.
परस्परांची टवाळी आहे,
लोकशाहीची टिंगल आहे.
अत्यंत हास्यास्पद अशी,
राजकारणाची दंगल आहे.
विरोधाभासाचे धक्के तर,
सगळीकडूनच बसत आहेत !
याचा उलगडा न केलेला बरा,
कोण कुणावर हसत आहेत?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9208
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
6 मार्च 2026

 

No comments:

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...